chess champion
इंटरनॅशनल चेस फेडरेशन कडून वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ही स्पर्धा सिंगापूर मधील एका नामांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये असा नियम आहे की मागच्या वर्षी जो चॅम्पियनशिप जिंकलेला असतो त्याच्यासोबत फायनल खेळण्यासाठी बाकीच्यांमध्ये स्पर्धा होते. तर अशा प्रकारचे सर्व स्पर्धा पार पाडत डी मुकेश हा फायनल पर्यंत पोहोचला. विश्वनाथ आनंद नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप चेस मध्ये फायनल पर्यंत पोहोचणारा डी मुकेश हा दुसरा स्पर्धक. सलग दोन वेळा चीन चॅम्पियनशिप मध्ये विजय मिळवणारा लिरेन फार मोठा तगडा स्पर्धक मुकेशच्या समोर होता. 25 नोव्हेंबर 2024 पासून सलग 14 दिवस हा सामना रंगणार होता. यामध्ये सात सामने ड्रॉ झाले काही मुकेशने जिंकले म्हणजेच मुकेशने काही वर आघाडी ठेवली तर काहींवर लिरेन आघाडीवर होता.
यातच दिवस सुजला तो 12 नोव्हेंबर चा आणि या दिवशी लेरेंना अगदी शेवटच्या क्षणी मुकेशने चेकमेट करत लिरेन पराभव केला आणि जगभरामध्ये सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन चा किताब मिळाला.हा जागतिक स्तरावरचा किताब मिळवणारा गुकेश डोमा राजू हा सर्वात तरुण विजेता म्हणून नवीन ओळख संपूर्ण जगभरामध्ये निर्माण केलेली आहे.
D Mukesh History :
तर चला जाणून घेऊया कोण आहे हा डी मुकेश आणि त्याने इतक्या कमी वयामध्ये कसा गाजवला जगभरामध्ये डंका. डोंगरावर मुकेश म्हणजेच डी मुकेश याचा जन्म 2006 वर्षी चेन्नई येथे झाला त्याचे वडील डी रजनीकांत त हे एक सर्जनिष्ठ होते. तर आई पद्मा हे एक मायक्रोवायलिस्ट आहे. घरचा कसलाही बुद्धिबळाशी संबंध नसताना डी गुकेश मधील बुद्धिबळाचे आकर्षण आणि त्याचे त्यामध्ये असलेला रस पाहून डी रजनीकांत यांनी गुकेशच्या वयाच्या सातव्या वर्षापासून त्याची आठवड्यातून तीन दिवस रोज एक तास बुद्धिबळाची प्रॅक्टिस चालू केली.
आठवडाभर प्रॅक्टिस आणि शनिवारी रविवारी जिथे कुठे स्पर्धा असतील बुद्धिबळासाठीच्या तिथे मुकेश चे वडील त्याला घेऊन जात. त्यामुळे गुकेश ला बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनवण्यासाठी गुकेश बरोबरच त्याच्या वडिलांनी देखील तितकेच कष्ट घेतले आहे त्याचबरोबर हे दोघे बाहेर स्पर्धेसाठी सतत बाहेर राहायचे तर गुकेशच्या आईने घर सांभाळले. त्यामुळे हा विजय फक्त एकट्या गुकेशचा नसून तर त्याच्यासोबत झटणाऱ्या त्याच्या आई वडिलांचा देखील आहे.
Financial condition behind world chess champion
तर चेन्नईच्या आसपास पर्यंत स्पर्धेसाठी जाणे इतपर्यंत ठीक होते परंतु आपल्या मुलाला जगाचा चॅम्पियन बनवण्यासाठी मोठमोठ्या जगभरात होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं खूप गरजेचे होते. आता बाहेर देशांमध्ये स्पर्धा म्हणजे तिथे जाणे आल आणि तिथे जाण्यासाठी लागणारा खर्च. आणि रजनीकांत यांची आर्थिक परिस्थिती एवढी पण चांगली नव्हती की ते गुकेशला प्रत्येक स्पर्धेसाठी प्रदेशात घेऊन आता यावे. त्यामुळे गुकेशला चॅम्पियन करण्यासाठी त्याच्या घरच्यांनी खूप मोठ्या आर्थिक संकटातून प्रवास केला आहे.
त्यांचा आर्थिक परिस्थितीचा किस्सा सांगताना त्याचे वडील म्हणतात की, ” आम्ही एकदा गुकेशला स्पर्धेसाठी डेन्मार्कला घेऊन गेलो होतो पण तिथे आम्हाला फिरण्यासाठी तेवढे पैसे नव्हते मग आम्ही यावर पर्याय म्हणून गुकेश ला सायकल वरून फिरवायचं यामुळे तो जास्तीत जास्त स्पर्धा जास्त पैसे न घालवता देऊ शकला”. त्यांनी असे सांगितले की गुकेशला चॅम्पियन बनवण्यासाठी मित्रमंडळींकडून तसेच अनेक नातेवाईकांकडून पैसे घेतले.
गुकेशशने जिंकलेल्या आतापर्यंतच्या स्पर्धा :
- गुकेश चे बुद्धिबळातील कौशल्य लहानपणापासून दिसत होते त्याने 2015 मध्ये अंडर नाईन एशियन स्कूल चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले होते.
- वर्ष 2018 मध्ये वर्ल्ड युथ चे चॅम्पियनशिप अंडर twelveया गटामध्ये तो जिंकला.
- त्याचबरोबर वर्ष 2018 मध्ये त्याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी आशियाचे चेस चॅम्पियनशिपमध्ये बारा मेडल मिळवली.
- गुकेश वयाच्या बाराव्या वर्षी देशातील देशाच्या इतिहासातील सगळ्यात तरुण ग्रँडमास्टर तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ग्रँडमास्टर बनण्याचा विश्वविक्रम गुकेश च्या नावावर आहे. हे सर्व मिळवण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले अहोरात्र मेहनत केली Left त्याचे फळ त्याला मिळालेच.
- गुकेश चा सर्वात मोठा विजय म्हणजे ज्यांना आयुष्यामध्ये गुरु असं समजून त्यांनी बुद्धिबळाच्या स्पर्धा चालू केल्या त्याच विश्वनाथ आनंद यांना त्याने रँकिंगमध्ये मागे टाकले.
- 2022 मध्ये मॅग्नस या तगड्या स्पर्धकाला हरवून तेव्हाही त्याने खूप मोठा विजय मिळवला.
- आणि लहानपणापासूनच जे स्वप्न बघून तो या स्पर्धेमध्ये उतरला होता ती स्पर्धा म्हणजे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप 12 डिसेंबर 2024 रोजी त्याने या दिवशी झालेल्या स्पर्धेमध्ये 14 पैकी नऊ गुण मिळवत वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा स्वप्न पूर्ण केलं.
तर गुकेशने विश्वनाथ आनंद यांच्या अकॅडमी मधून बुद्धिबळ खेळताना मानसिकता कशी असली पाहिजे कठोरातल्या कठोर परिस्थितीमध्ये कशाप्रकारे आपले मानसिक संतुलन विचलित होऊ न दिले पाहिजे प्रतिस्पर्ध्याच्या पुढच्या चाली कशा ओळखले पाहिजे या सर्वांचा अभ्यास त्याला या अकॅडमी मधून मिळाला. आणि अशाप्रकारे त्याच्या गुरु, आई वडील, आणि स्वतः घेतलेले कष्ट या सर्वांच्या जोरावर तो आज वर्ल्ड चॅम्पियन झाला.