आत्ता सध्या दिवस चालू आहेत ते हिवाळ्याचे थंडीचे दिवस. यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण खूप काही काही उपाय योजना करत असाल. तसेच याच गुलाबी थंडीमुळे त्वचा ही उलते, स्किन स्क्रचेस येतात, त्वचा चेहरा , हात पाय पांढरे पडतात. मग ते स्वतःला हि आणि बघणाऱ्यालाही बरोबर नाही वाटत. मग त्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत, काय काय winter skin care routine फॉलो केला पाहिजे. कोण कोण कोणत्या winter skin care products , skin dry products बाजारात उपलब्ध आहेत. जेने करून तुमची त्वचा ही थंडीपासून सुरक्षित राहील आणि तुमच्या चेहऱ्यावरचा glow टिकून राहील. याबद्दलची माहिती आपण या आजच्या पोस्ट मधून घेणार आहोत. होम made स्किन केअर टिप्स पण पाहणार आहोत. तर चला मग पाहूया,
१. Winter स्किन केअर क्रीम्स मधे युरिया च प्रमाण असलेले प्रॉडक्ट्स वापरणे :-
आपली स्किन ड्राय होते म्हणजे यावर उपाय म्हणून आपली स्किन आपल्याला मऊ मऊ पाहिजे असते जेणेकरून आपल्या त्वचेवर ग्लो टिकून राहील आणि त्वचा चमकदार दिसेल. यासाठी सर्वात प्रमुख घटक म्हणजे विंटर स्किन केअर routine मधे युरिया चे प्रमाण असलेले प्रॉडक्ट्स वापरणे. यामुळं काय होत, युरिया हा humectant आहे जो की आपली त्वचा hydratet ठेवण्यात मदत करते. आपण पाहतो हिवाळ्यात पाण्याच्या संपर्कात सारखं राहिल्याने पायाच्या टाचा भेगाळतात, हातचे कोपरे काळे पडतात , नंतर अजून पायाचे गुडघे काळे पडणे, मानेवर काळा पट्टा तयार होणे यावर उपाय म्हणजे एकमेव युरिया कंटेंट असलेले स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरणे.
अशामध्ये तुम्हाला बाजारातून वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यात युरिया च प्रमाण वेगवेगळे असणारे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. तर याच करायचं काय आंघोळ केल्यानंतर त्वचा पुसून घ्यायची आणि लगेच हे मॉइश्चरायझर लाऊन घ्यायचं तुमची त्वचा यामुळे अगदी मुलायम आणि मऊ मऊ राहील.
२. चेहऱ्याची वेगळी काळजी घ्या. :-
आपल्या चेहऱ्याची स्किन हि शरीराच्या इतर स्किन पेक्षा खूप नाजूक असते. यामध्ये थंडीमध्ये होत काय तर गाल नाक हे उलून जात तर ते मऊ करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक म्हणजे moisturiseriser creams वापरणे ज्या की तुमच्या त्वचेच्या वरच्या भागाला hydrated करते आणि दुसरा म्हणजे hydrating creams ज्या की तुमच्या त्वचेच्या आतील भागापर्यंत जाऊन तुमच्या त्वचेला खुलून दिसायला मदत करतात. Oily skin, combination, dry skin , mature skin आणि sensetive skin यावर उत्तम उपाय म्हणून hydrates skin creams वापरा आणि तुमच्या चेहऱ्याच रक्षण करा.
३. आंघोळीसाठी साबण कोणता वापराल:-
आपल्याला थंडी चालू झाली याची चाहूल हि आपले हात पाय कोरडे पडलेले पाहूनच जाणवते. मग आपण खूप विचार करून साबण वापरतो . आपला एकही दिवस न आंघोळ करता जात नाही, त्यात साबण न लावता तर अजिबातच नाही. तुम्ही जर रोज अगदी घासून साबण लाऊन आंघोळ करत असाल तर ते हिवाळ्यात कीतीही स्किन केअर creams वापरले तरीही तुमची त्वचा हि कोरडीच राहणार. यासाठी एकच उपाय शरीराचा ph maintain राहील अश्या प्रकारची साबण वापरणे आणि जास्त घासून त्वचा न घासण.
४. हिवाळ्यात डोक्याचे केस कोरडे पडतात.:-
हिवाळ्यात आपल्याला अजून एका समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे डोक्याचे केस कोरडे कोरडे पडणे . आपल्याला आपले केस हे तितकेच आवडतात जितकी त्वचा मग त्याची पण काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी पण बाजारात खूप सारे hair care products उपलब्ध आहेत. तुम्ही बाजारातील anti hair freeze serums वापरू शकता. याचा वापर कसा करायचा तर हे फक्त केसाच्या टोकाला लावयच हातात घेऊन केसाच्या मुळाला लावायच नाही. यामुळे तुमचे केस कोरडे होण्यापासून दूर राहतील.
५. ओठ उलने.:-
थंडी चालू झाली का हे ओळखण्याच अजून एक पर्याय म्हणजे आपले ओठ. ते फुटले की ओळखून जायचं की थंडी सुरू झाली यामुळं तुम्हाला खूप त्रास होतो. जेवताना, बोलताना , हसताना जर का तुमचे ओठ फुटलेले असतील तर तुम्हाला याचा खूप त्रास होतो. तर यावर उपाय म्हणजे तुम्हाला दोन प्रकारचे lips care products वापरायचे आहेत. एक म्हणजे रात्री झोपताना लावायचे आणि अजून एक म्हणजे दिवस बाहेर फिरताना. रात्री झोपताना लीप मास्क म्हनून प्रॉडक्ट्स मिळतात ते झोपायच्या अगोदर आपल्या ओठांना लाऊन झोपायच. सकाळपर्यंत तुमचे ओठ हे अगदी मुलायम होऊन जातील आणि फुटण्यापासून वाचतील. आणि आंघोळीनंतर बाहेर जाताना ओठांना लिप बाम लावणे हा अगदी छान पर्याय तुमच्यासमोर आहे तुमच्या ओठांची थंडीपासून काळजी घेण्यासाठी.
रोजच्या दैनंदिन जीवनात काय टिप्स वापराल तर दररोज अंघोळीला जाताना हाताला पायाला नारळाचं तेल लाऊन १० ते १५ मिनिटांनी थांबून अंघोळीला जा. हे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा करा आणि आंघोळ करताना अगदी सौम्य साबण वापरा. आंघोळ करून झाल्यानंतर व्हिटॅमिन c हे ज्यामध्ये असते अशा क्रीम लावा. नंतर मॉइश्चरायझर आणि अगदी शेवटी घराबाहेर जाताना sunscreen लाऊन तुमची त्वचा नीट चांगली ठेवा.