TRAFFIC RULES 2025
दरवर्षी मार्चच्या महिन्यामध्ये वाहन विभागाकडून सरकारी अधिकाऱ्यांकडून ठीक ठिकाणी नाकेबंदी करत रस्त्यावरून वाहणाऱ्या दुचाकी चार चाकी तसेच जड वाहनांची कागदपत्रे तसेच वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन या सर्व गोष्टी तपासल्या जातात. वर्षभर पेक्षा दरवर्षी मार्च महिन्यामध्येच या सर्व गोष्टींचा आढावा खूप बारकाईने घेतला जातो आणि तपासणी देखील कशा पद्धतीने केली जाते. खरंतर हे सर्व घडत असतं ते म्हणजेच 31 मार्च हा सरकारी कामकाजाचा वर्षाचा शेवटचा महिना असतो. 31 मार्चनंतर म्हणजेच एक एप्रिल नंतर सरकारी कामकाजासाठी नवीन वर्ष सुरू होते. यासाठीच म्हणून 31 मार्चपर्यंत मागील वर्षाचा संपूर्ण पाठपुरावा तसेच सर्व कागदपत्रे सरकारला संपूर्ण पुराव्या सहज जमा करावे लागतात त्यामुळेच सर्व सरकारी कामकाजांमध्ये 31 मार्च हे ध्येय मनामध्ये ठेवून अगदी युद्ध पातळीवर सर्व कामे तपासले जातात.

यामध्येच एक आपल्या दैनंदिन जीवनातील काम येते ते म्हणजे आपण कोणतेही काम असो दुचाकी वाहनाशिवाय ते संपूर्ण होणे थोडक्यात अशक्यच असते. मग आपण दुचाकी घेऊन रस्त्यावरून फिरत असताना ट्रॅफिक हवालदार आणि आपल्याला पकडल्यास आपल्याकडे सरकारने काही ठरवलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्यामध्ये जसे की वाहकाचे ड्रायव्हिंग लायसन, PUC सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग इन्शुरन्स अशा प्रकारची काही कागदपत्र वाहनचालकासोबत असायला हवीत. हे कागदपत्र वाहनचालकासोबत नसल्यास ट्रॅफिक हवालदार हा ठरलेल्या रकमेप्रमाणे वाहन चालकाकडून दंड आकारू शकतो. या दंडापासून वाचायचे असेल तर तुमच्याकडे ही कागदपत्रे असायलाच हवीत. जेणेकरून तुम्हाला या मार्च एन्डच्या दरम्यान होणाऱ्या चौकशी पासून तुमच्या खिशाला लागणारे कात्री ही वाचू शकते.
तर आपण आज या पोस्टच्या माध्यमातून पाहूयात की काय आहेत TRAFFIC RULES 2025 आणि या नियमांच्या आधारे ट्रॅफिक हवालदार कशाप्रकारे आपली चौकशी करू शकतो आणि आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे जेणेकरून तुम्हाला जर का ट्राफिक हवालदार आणि वाढवले तर तुम्ही तिथून कायदेशीर पद्धतीने कसे सुरक्षित वाचू शकतात.
FOLLOW THESE TRAFFIC RULES 2025
काय आहे ट्रॅफिक रूल्स 2025 साठी दुचाकी वाहनांसाठी चार चाकी वाहनांसाठी तसेच अवजड वाहनांसाठी वाहन नियमांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या नियमांचे तरतूद करण्यात आलेले आहे या सर्व गोष्टी आपण खालील प्रमाणे पाहूया.
- मद्यपान करून गाडी चालवणे – या अगोदर आतापर्यंत जर का वाहनचालक हा रस्त्यावरती मध्यमान करून वाहन चालवत असताना पकडल्यास TRAFFIC RULES नुसार वाहन चालकाला पहिल्यांदा मध्यपान करून वाहन चालवत असल्यास त्याला 1000 ते 1500 रुपये पर्यंत दंड आकारण्यात येत होता. परंतु आता नवीन TRAFFIC RULES 2025 नुसार वाहनचालक जर का मद्यपान करून वाहन चालवत असल्यास पहिल्यांदा आढळल्यास त्याला दंड म्हणून 10,000 रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली जाते तसेच सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो. त्याचबरोबर जर का वाहनचालक हा दुसऱ्यांदा मध्ये पान करून वाहन चालवत असताना आढळल्यास त्याला दंडात्मक रक्कम म्हणून तब्बल 15 हजार रुपये व दोन वर्ष तुरुंगवास होऊ शकतो.
- हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे – दुचाकी चालवत असताना वारंवार वाहतूक नियमांमध्ये हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या वाहतूक नियमानुसार विना हेल्मेट दुचाकी चालवताना आढळल्यास 100 रुपयापर्यंत दंड आकारण्यात येत होता. परंतु आता नवीन TRAFFIC RULES 2025 नुसार हेल्मेट शिवाय दुचाकी वाहन चालवताना आढळल्यास दहा हजार रुपयांपर्यंत दंड व तसेच तीन महिन्यांसाठी driving license सस्पेंड करण्यात येणार आहे. याचबरोबर सीट बेल्ट शिवाय चार चाकी वाहन चालवत असल्यास आतापर्यंत जुन्या ट्रॅफिक नियमानुसार 100 रुपये इतका दंड आकारण्यात येत होता परंतु आता TRAFFIC RULES 2025 नुसार या दंडाची रक्कम ही दहा हजार रुपये इतकी करण्यात आलेली आहे.
- गाडी चालवताना फोनचा वापर करणे – नवीन ट्रॅफिक नियमानुसार गाडी चालवताना जर का फोनचा वापर करत असल्यास असे आढळल्यास पाच हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. या अगोदर या दंडाची रक्कम ही पाचशे रुपये इतकी होती.
- valid driving license नसेल तर – जर का तुम्ही वाहन चालवत असताना तुमच्याकडे व्हॅली ड्रायव्हिंग लायसन नसेल तर जुन्या ट्रॅफिक नियमानुसार तुमच्याकडून पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येत होता परंतु आता TRAFFIC RULES 2025 नुसार जर का तुमच्याकडे व्हॅली ड्रायव्हर लायसन नसेल तर तुम्हाला पाच हजार रुपये इतका दंड भरावा लागणार आहे.
- गाडीचा इन्शुरन्स नसेल तर – आतापर्यंत तुमच्याकडे गाडीचा इन्शुरन्स नसेल तर जुन्या वाहतूक नियमानुसार 200 ते 400 रुपये इतका दंड भरावा लागत होता परंतु आता TRAFFIC RULES 2025 नुसार तुमच्याकडे जर का गाडीचा इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला दोन हजार रुपये इतका दंड भरावा लागणार आहे.
- प्रदूषण प्रमाणपत्र PUC शिवाय गाडी चालवणे – तुम्ही जर का गाडी चालवत असताना तुमच्याकडे प्रदूषण प्रमाणपत्र नसेल तर जुन्या वाहतूक नियमानुसार तुमच्याकडून हजार रुपये इतका दंड आकारण्यात येत होता परंतु आता जर का तुम्ही प्रदूषण प्रमाणपत्र शिवाय गाडी चालवत असताना आढळल्यास TRAFFIC RULES 2025 नुसार तुमच्याकडून दहा हजार रुपये इतका दंड आकारण्यात येत आणि त्याचबरोबर सहा महिन्याची तुरुंगावास देखील होण्याची शक्यता आहे.
- Tripple seat गाडी चालवताना पकडल्यास – आतापर्यंतच्या जुन्या वाहतूक नियमानुसार तुम्ही जर का ट्रिपल सीट गाडी चालवत असताना पकडल्यास तुमच्याकडून शंभर रुपये इतकी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती परंतु आता नवीन TRAFFIC RULES 2025 नुसार तुमच्याकडून एक हजार रुपये पर्यंतचा दंड आकारण्यात येईल.
यावरील नियमान शिवाय अजून काही नियम पाहुयात,
TRAFFIC RULES 2025 New Rules –
अनु. क्र. | नियम | दंड अगोदर | TRAFFIC RULES 2025 नुसार दंड |
1 | वेगमर्यादा ओलांडणे व तसेच सिग्नल तोडणे | 500 रुपये | 5000 रुपये |
2 | ॲम्बुलन्स, अग्निशमन दल व पोलीस वाहनांना वाट न दिल्यास | 1000 रुपये | 10,000 रुपये |
3 | वाहन क्षमतेपेक्षा अधिक सामान किंवा लोक वाहून नेणे | 2000 रुपये | 20,000 रुपये |
4 | अल्पवयीन वाहन चालकाकडून केलेल्या गुन्ह्यासाठी | 2500 रुपये | 25,000 रुपये तसेच 3 वर्ष करावासाची शिक्षा |
अशा प्रकारचे नवीन वाहतुकीचे नियम हे सरकारकडून बनवण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीने या नियमांमध्ये कोणी बसत नसल्यास या नियमांचे उल्लंघन करत असताना निदर्शनास आल्यास त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करत ठरवलेली दंडात्मक रक्कम ही आकारण्यात येत आहे.
पुढे दिलेल्या वाहतूक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही याबद्दलचे अधिक माहिती घेऊ शकता https://parivahan.gov.in/parivahan//en/content/act-rules-and-policies