---Advertisement---

ससून रुग्णालय, पुणे येथे गट-ड पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! (Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025)

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025

पुण्यातील प्रतिष्ठित ससून सर्वोपचार रुग्णालयात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागांतर्गत, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील ३५४ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

ही पदे सरळसेवेने (Computer Based Test) भरली जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे.

Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025

ससून रुग्णालयात भरली जाणारी प्रमुख पदे आणि त्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

  • गॅस प्लँट ऑपरेटर – १
  • भांडार सेवक – १
  • प्रयोगशाळा परिचर – १
  • दवाखाना सेवक – ४
  • संदेशवाहक – २
  • बटलर – ४
  • माळी – ३
  • प्रयोगशाळा सेवक – ८
  • स्वयंपाकी सेवक – ८
  • नाभिक – ८
  • सहाय्यक स्वयंपाकी – ९
  • हमाल – १३
  • रुग्णपटवाहक – १०
  • क्षकिरण सेवक – १५
  • शिपाई – २
  • पहारेकरी – २३
  • चतुर्थश्रेणी सेवक – ३६
  • आया – ३८
  • कक्षसेवक – १६८

Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025 आवश्यक शैक्षणिक पात्रता:

बहुतेक पदांसाठी उमेदवाराने शासनमान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा (१०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही विशिष्ट पदांसाठी अतिरिक्त शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव अनिवार्य आहे.

  • प्रयोगशाळा परिचर/क्षकिरण सेवक/प्रयोगशाळा सेवक: १०वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.माळी: १०वी आणि कृषी शाळेचा माळी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • माळी: १०वी आणि कृषी शाळेचा माळी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • नाभिक: १०वी आणि ITI चे केश कर्तनालय प्रमाणपत्र पूर्ण केलेले असावे
  • सहाय्यक स्वयंपाकी: १०वी आणि कमीत कमी एक वर्षाचा नोंदणीकृत स्वयंपाकाचा अनुभव अनिवार्य आहे
  • आया: हे पद फक्त महिला उमेदवारांसाठी असून, १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा:Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025 online application

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने

https://bjgmcpune.com या अधिकृत संकेतस्थळावरून करता येईल. उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी आणि परीक्षांच्या तारखांसाठी, उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी.ही एक चांगली संधी आहे, म्हणून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

Sassoon Hospital Pune Job Vacancy 2025 official PDF notification click below

---Advertisement---

Leave a Comment