MPSC Group C Bharti 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे Group C Bharti 2025 साठी मोठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 938 पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
महत्त्वाच्या तारखा (mpsc exam date 2025)
क्र. | विवरण | तारीख |
---|---|---|
1 | ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख | 7 Octomber 2025 |
2 | अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 Octomber 2025 |
3 | परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख (ऑनलाईन) | 27 Octomber 2025 |
4 | चालानद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 29 Octomber 2025 |
5 | प्राथमिक परीक्षा तारीख | 04 January 2026 |

उपलब्ध पदांची माहिती (MPSC Group C Bharti 2025 Vacancy Details)
MPSC Group C Bharti 2025 अंतर्गत खालील संवर्गांमध्ये भरती होणार आहे:
- उद्योग निरीक्षक, गट-क – 09 पदे
- कर सहायक – 73 पदे
- लिपिक-टंकलेखक – 852 पदे
- तांत्रिक सहाय्यक, निरीक्षक, लेखापाल इ. इतर पदे – विविध पदे
एकूण पदसंख्या: 938
वेतनश्रेणी (Pay Scale)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
उद्योग निरीक्षक | ₹35,400 – ₹1,12,400 + भत्ते |
कर सहायक | ₹25,500 – ₹81,100 + भत्ते |
लिपिक-टंकलेखक | ₹19,900 – ₹63,200 + भत्ते |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- उमेदवार भारताचा नागरिक असावा.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक.
- लिपिक-टंकलेखक पदासाठी मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा (Age Limit)
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीयांसाठी: 18 ते 43 वर्षे
- वयोमर्यादेतील सवलत शासन नियमांनुसार राहील.
निवड प्रक्रिया (Selection Process)
निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल:
- संयुक्त पूर्व परीक्षा (Preliminary Exam) – 100 गुण
- मुख्य परीक्षा (Main Exam) – 400 गुण
- टंकलेखन चाचणी (Typing Test) – केवळ लिपिक-टंकलेखक पदासाठी
परीक्षा शुल्क (MPSC Group C Bharti 2025 Application Fee)
प्रवर्ग | शुल्क |
---|---|
खुला प्रवर्ग | ₹394/- |
मागासवर्गीय | ₹294/- |
अर्ज प्रक्रिया (MPSC Group C Bharti 2025 How to Apply)
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज खालील संकेतस्थळावरून करावा:
👉 https://mpsconline.gov.in
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना नीट वाचावी. आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी निर्धारित आकारात अपलोड करावीत.
परीक्षा योजना (Exam Pattern)
पूर्व परीक्षा (Pre Exam): 100 गुणांची वस्तुनिष्ठ (Objective) प्रश्नपत्रिका असेल.
मुख्य परीक्षा (Main Exam): प्रत्येक पदासाठी स्वतंत्र विषयानुसार प्रश्नपत्रिका.
महत्त्वाच्या सूचना
- अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षा तारखेच्या 7 दिवस आधी डाउनलोड करावे.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाईल.
अधिकृत वेबसाइट्स
MPSC Group C Bharti 2025 ही महाराष्ट्रातील पदवीधर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी ही भरती नक्कीच गमावू नये. वेळेत अर्ज करा आणि तयारीला सुरुवात करा.