---Advertisement---

Medical Education Recruitment 2025: महाराष्ट्रात 1107 पदांसाठी मोठी भरती

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
Medical Education Requirement 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Medical Education Recruitment 2025

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि औषधी द्रव्य विभागात. मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष्य यांच्या मधे शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व संलगनीत रुग्णालयातील गट क तांत्रिक / आतांत्रिक संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवा्रांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील. सदर भरती प्रक्रिये बाबत उमेदवारांशी कोणताही स्वतंत्रपणे पत्र व्यवहार करण्यात येणार नसून सदर संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी. कोणत्याही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाचा संकेतस्थळावरील जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष विभागांतर्गत विविध तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या भरतीसाठी Medical Education Recruitment 2025 अंतर्गत मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 1107 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून, ही एक सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी.

Medical Education Recruitment 2025 अर्ज प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा

टप्पातारीख
अर्ज सुरू19 जून 2025
अंतिम तारीख9 जुलै 2025 (रात्री 11.55 पर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख9 जुलै 2025 (रात्री 11.55 पर्यंत)

भरती प्रक्रिया परीक्षा खगीत करणे किंवा रद्द करणे ,त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण पदसंख्या मध्ये वाढ करणे, किंवा घट करण्याचे सामाजिक आरक्षणामध्ये पदनिहाय बदल करण्याचे सर्व सेवा भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तींचे बदल करण्याचे नवीन अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांनी राखून ठेवले असेल त्यांचा निर्णय अंतिम राहील. तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्यांना राहतील त्याबाबत उमेदवारांना कोणताही हक्क सांगता येणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

भरती अंतर्गत पदांचे तपशील

या भरतीअंतर्गत 1058 तांत्रिक पदे आणि 49 अतांत्रिक पदे, असे एकूण 1107 पदे भरली जाणार आहेत.

Medical Education Recruitment 2025 तांत्रिक पदे:

  • प्रयोगशाळा सहाय्यक – 170 पदे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 181 पदे
  • इ.सी.जी. तंत्रज्ञ – 84 पदे
  • क्ष-किरण तंत्रज्ञ – 94 पदे
  • समाजसेवा अधीक्षक (MSW) – 135 पदे
  • औषधनिर्माता – 207 पदे
  • ग्रंथपाल व सहाय्यक – 35 पदे
  • इतर विविध पदे – ग्रंथसंचालक, प्रलेखक, इत्यादी.

टीप : गटक तांत्रिक संवर्गातील प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष किरण सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ,ईसीजी तंत्रज्ञ या पदाकरिता महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अॅक्ट 2011 नुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील. तसेच भौतिक उपचार तज्ञ, दंत तंत्रज्ञ व औषध निर्माता या पदाकरिता त्या त्या परिषदांची कायद्यानुसार नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

Medical Education Recruitment 2025 अतांत्रिक पदे:

  • उच्च श्रेणी लघुलेखक – 12 पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक – 37 पदे

MHT CET 2025 Expected Cutoff: CET नंतरचे सर्वोत्तम पर्याय आणि परीक्षेतील उपस्थिती

वेतनश्रेणी

वेतनश्रेणी ही पदानुसार ₹19,900/- पासून सुरू होऊन ₹1,42,400/- पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता व अनुभव

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित आहे. काही ठळक पात्रता पुढीलप्रमाणे:

  • प्रयोगशाळा सहाय्यक/तंत्रज्ञ – B.Sc (Physics/Chemistry/Biology) + डिप्लोमा/प्रमाणपत्र
  • औषधनिर्माता – HSC + फार्मसी डिप्लोमा/डिग्री + नोंदणी
  • इ.सी.जी. तंत्रज्ञ – B.Sc in Cardiology किंवा संबंधित डिप्लोमा
  • समाजसेवा अधीक्षक – पूर्णवेळ MSW (Field Work सह)
  • लघुलेखक – S.S.C + टायपिंग व शॉर्टहँड स्पीड आवश्यक

विशेष नोंद: संबंधित नोंदणी (महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल / फार्मसी कौन्सिल / DCI) आवश्यक आहे.

वयोमर्यादा

  • सामान्य प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
  • विशेष प्रवर्ग (दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त) – नियमांनुसार सूट उपलब्ध.

Medical Education Recruitment 2025 परीक्षा पद्धत

  1. संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषांमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत.
  1. ज्या पदासाठी शारीरिक व व्यवसायिक चाचणी घेण्याच्या आवश्यकता नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारित परीक्षा घेण्याची येणारे ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी व संबंधित पदाच्या विषयांवरील शंभर प्रश्नांकरिता एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुनाच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे अनिवार्य राहील.
    3.ज्या पदांसाठी व्यवसायिक चाचणी घेणे आवश्यक आहे अशा पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची परीक्षा व 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार परीक्षेत किमान 45 टक्के गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांनाच व्यवसायिक चाचणी देण्यात येईल परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांचा आधारे निवड सूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
  2. चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांच्या प्राप्त करून मधून कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.

परीक्षा Computer-Based Test (CBT) पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा पॅटर्न खालीलप्रमाणे:

तांत्रिक पदांसाठी (Technical Cadre):

  • एकूण प्रश्न: 100
  • एकूण गुण: 200
  • कालावधी: 90 मिनिटे
  • विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, व तांत्रिक विषय

अतांत्रिक पदांसाठी (उदा. लघुलेखक, चालक):

  • एकूण प्रश्न: 60
  • गुण: 120 + 80 गुणांची व्यावसायिक चाचणी
  • कालावधी: 60 मिनिटे
  • टाइम-बाउंड विभागानुसार विभागलेली परीक्षा

Medical Education Recruitment 2025 परीक्षा शुल्क

प्रवर्गशुल्क
सामान्य प्रवर्ग₹1000/-
आरक्षित प्रवर्ग₹900/-

शुल्क परत न करता येण्याजोगे (Non-refundable) आहे.

Medical Education Requirement 2025

परीक्षा केंद्र

उमेदवारांनी तीन परीक्षा केंद्रांची प्राधान्यक्रमाने निवड करावी. केंद्रांची नेमणूक प्रशासनाच्या अधिकाराखाली राहील.

कागदपत्रे आणि पडताळणी

  • अर्हतेचे प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (असेल तर)
  • ओळखपत्र (Aadhar/PAN/Passport)
  • संबंधित नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (जर लागू असेल)
  • ईडब्ल्यूएस / दिव्यांग / माजी सैनिक / खेळाडू इत्यादी आरक्षणासाठी पुरावे

महत्वाच्या सूचना

1.उमेदवारांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 2005 मधील तरतुदीनुसार ते लहान कुटुंबाच्या व्याख्याची पूर्तता करण्यात याबाबतचे प्रतिज्ञापत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सादर करणे आवश्यक राहील.

  1. उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनी मराठी व हिंदी भाषा परीक्षा संदर्भात वेळोवेळी केलेल्या नियमानुसार विहित मुदतीत दोन्ही भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवणे आवश्यक राहील.
  2. शासकीय सेवेत नियुक्त केलेल्या उमेदवारास त्याच्या पदाशी संबंधित सेवा प्रवेश नियमातील सर्व नियमांची पूर्तता करणे बंधनकारक राहील.
  3. उमेदवारांची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी बाबतचे प्रमाणपत्र मुदतीस सादर करणे आवश्यक राहील.
  • Medical Education Recruitment 2025 साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • एकाच उमेदवाराने अनेक पदांसाठी अर्ज केला, तर प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक आहे.
  • चुकीची माहिती दिल्यास किंवा कागदपत्रे अपुरी असल्यास अर्ज फेटाळले जातील.
  • उमेदवारांनी www.med-edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन अपडेट्स तपासावेत.

संपर्क माहिती

राज्यातील Medical Education Recruitment 2025 ही भरती मोहीम म्हणजे सरकारी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी आहे. विविध पदांवरील भरतीमुळे पदवीधर, पदव्यूत्तर, डिप्लोमाधारक, तसेच अनुभवी उमेदवारांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.तरी वरील प्रकारे दिलेल्या संपूर्ण माहितीच्या आधारे उमेदवारांनी दिलेल्या सर्व कागदपत्रासहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.या शासकीय भरतीमध्ये कोणीही फसवणुकीचा प्रयत्न करत असल्यास त्याला बळी पडू नये आणि फक्त वरी दिलेल्या संकेतस्थळावरीलच दिलेल्या माहिती वरती पूर्णपणे विश्वास ठेवून आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा.

योग्य पात्रता, अनुभव व तयारीसह इच्छुक उमेदवारांनी 9 जुलै 2025 पूर्वी अर्ज नक्की करावा.

---Advertisement---

Leave a Comment