---Advertisement---

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र (Ladaki Bahin Yojana Maharashtra) जुलैचा हप्ता न मिळाल्याची 7 कारणे

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
Ladaki Bahin Yojana Maharashtra
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ladaki Bahin Yojana Maharashtra

मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता झालेल्या रक्षाबंधन दिवसापर्यंत महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचा जुलै चा हप्ता खात्यामध्ये जमा झालेला असून. काही महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला नाही तर या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा न होण्याची काही विशेष कारणे आहेत. तर हप्ता न मिळालेल्या लाडक्या बहिणींना या गोष्टी तपासाव्या लागणार.लाडक्या बहिणींना जुलै चा हप्ता रक्षाबंधनापर्यंत का मिळाला नाही या बद्दलची सर्व कारणे आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Ladaki Bahin Yojana Maharashtra म्हणजे काय?

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु केलेली विशेष योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब, निराधार, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता तसेच एक अविवाहित महिलांना आर्थिक मदत देणे आणि आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करणे आहे.

Ladaki Bahin Yojana Maharashtra या योजनेचे लाभ

  • दरमहिना १,५०० रुपये थेट लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतात.
  • वार्षिक म्हणून १८,००० रुपये लाभ मिळतो.
  • महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य, पोषण आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मदत.

Ladaki Bahin Yojana Maharashtra पात्रता (Eligibility)

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
  • वयोगट २१ ते ६५ वर्षांदरम्यान.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार किंवा कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असावी.
  • आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल

लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
  • स्वरोजगार आणि स्वावलंबनासाठी महिला सबलीकरण.
  • महिलांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणात सुधारणा करणे.

Ladaki Bahin Yojana Maharashtra काही सामान्य प्रश्न FAQ

Q: लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार?
A: योजना १ जुलै २०२४ पासून सुरू आहे. दरमहा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो. राखी पौर्णिमेनिमित्त ८ ऑगस्ट २०२५ या दिवशी देखील हप्ता मिळतो.

Q: माझे अर्जाचे स्टेटस कसे बघावे?
A: वेबसाईटवर लॉग इन करून किंवा जवळच्या केंद्रात भेट देऊन अर्ज स्टेटस तपासता येते.

Q: कॉन्टॅक्ट नंबर कोणता?
A: हेल्पलाइन – १८१

Ladaki Bahin Yojana Maharashtra: जुलै महिन्याचा हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळतो. मात्र, काही महिलांना या योजनेतील जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यांनी या ७ कारणांची विशेषतः तपासणी करावी.

१. महत्वाची कागदपत्रे अपूर्ण

बहुतांश वेळा महिलांनी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपूर्ण किंवा चुकीची दिल्याने निधी रोखला जातो.

२. वयोमर्यादा

या योजनेसाठी महिलांचे वय २१ ते ६५ वर्षे असणे बंधनकारक आहे. या वयोगटाबाहेरील अर्जदारांना हप्ता मिळत नाही.

३. उत्पन्न मर्यादा ओलांडली

परिवाराचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल, तर ते पात्र मानले जात नाहीत.

४. बँक खाते आधारशी लिंक नाही

लाभार्थीचे बँक खाते आधारशी संलग्न (लिंक) असणे आवश्यक आहे. लिंक नसल्यास हप्ता जमा होत नाही.

५. सरकारी नोकरी किंवा इतर सरकारी लाभ

सरकारी नोकरी करणाऱ्या किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अर्थसहाय्य हप्ता मिळत नाही.

६. अर्ज मंजूर न झालेला

अर्जाची प्रोसेस अद्याप सुरू आहे किंवा कागदपत्र पडताळणी सुरू आहे, त्यामुळेदेखील पैसे थांबू शकतात.

७. तांत्रिक अडचण

कधी कधी बँकिंग प्रणालीतील किंवा DBTमध्ये तांत्रिक अडचणीमुळे हप्ता विलंबाने जमा होतो.

Ladaki Bahin Yojana Maharashtra जुलैचा हप्ता न मिळाल्यास काय करावे?

  • सर्वप्रथम आपल्या अर्जाची स्थिती आणि कागदपत्रे तपासा.
  • आपल्या बँक खात्याची आधारशी लिंक आहे का याची खात्री करा.
  • जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात किंवा अधिकृत योजनेच्या हेल्पलाईनवर (१८१) संपर्क साधा.
  • कोणतीही त्रुटी असल्यास त्वरित दुरुस्त करा.

पुढील हप्त्याबाबत अपडेट्स

सरकारकडून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल असे सांगण्यात येते. तरीही तुमच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील, तर पुढील हप्ता मिळण्यातदेखील अडचण येऊ शकते.

लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी योग्य पात्रता, कागदपत्रे आणि बँक तपशील योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. वरील सात कारणांपैकी कुठलंही कारण असेल, तर त्वरित दुरुस्ती करून सरकारच्या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Check in MAHADBT : लाडकी बहीण योजना पात्रता, लाडकी बहीण योजना रक्कम का आली नाही, महिलांसाठी योजना, DBT हप्ता, सरकारी मदत, योजना स्टेटस तपासा.

मराठी तरुण तरुणींसाठी व्यवसाय उभारण्यासाठी 15 लाख रुपये पर्यंत मिळू शकते बिनव्याजी कर्ज फक्त असा करा अर्ज

---Advertisement---

Leave a Comment