Ladaki Bahin Yojana
महाराष्ट्र मध्ये 2024 यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवसापासून महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्रातील सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयांची मदत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांचा कुटुंबातील गरजा भागवण्यासाठी दिले जातात. यास Ladaki Bahin Yojana मुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये आपले सरकार स्थापन करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे पुन्हा एकदा सरकार देखील स्थापन झाले. सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अशी आश्वासन दिले होते की लाडके बहिण योजना ही कधीही बंद होणार नाही आणि त्यांचा दरमहा हप्ता हा पंधराशे रुपये वरून एकशे रुपये इतका देखील केला जाईल.
परंतु अद्यापही हप्ता 2100 रुपये कधी केला जाईल याची कसलीही माहिती माहिती सरकारकडून देण्यात येत नाही. आता आलेल्या नवीन माहितीनुसार महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमार्फत दरमहा पैसे तर देतच आहे परंतु त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी त्यांना एखादा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी शून्य टक्के व्याजदरावर एक लाखापर्यंत कर्ज देखील देण्याची योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे चर्चा बाहेर येत आहेत.

MHT CET 2025 Expected Cutoff: CET नंतरचे सर्वोत्तम पर्याय आणि परीक्षेतील उपस्थिती
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि प्रेरणादायी योजना जाहीर करण्यात आली आहे. ladaki bahin yojana अंतर्गत आता महिलांना १ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार असल्याची माहिती आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
काय आहे Ladaki Bahin Yojana?
ladaki bahin yojana ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मुलींना शिक्षण, व्यवसाय किंवा कौटुंबिक गरजांसाठी आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवली जाते. विशेषतः कमी उत्पन्न गटातील महिलांना मदत करून त्यांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ:
- शून्य टक्के व्याजदराने कर्ज: महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार असून त्यावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
- स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी: या निधीचा वापर महिलांना छोटा व्यवसाय, हस्तकला, शेतीपूरक उद्योग, किराणा दुकान इत्यादी सुरू करण्यासाठी करता येतो.
- सुलभ अर्ज प्रक्रिया: अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक असून स्थानिक शासनाच्या कार्यालयात किंवा ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज करता येतो.
- गरीब व गरजू महिलांना प्राधान्य: उत्पन्नाची मर्यादा आणि इतर सामाजिक निकष लक्षात घेऊन पात्र महिलांना प्राधान्य दिले जाते.
या योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे
तर मुख्यमंत्री Ladaki Bahin Yojana या योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी भाई योजना या अंतर्गत शून्य टक्के व्याजदरावरती एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज भेटणार आहे. हे कर्ज मुंबई बँकेच्या मार्फत देण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणीसाठी त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्यासाठी एक मदत आणि आर्थिक पाठबळ म्हणून मुंबई बँकेच्या मार्फत एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाच्या मूलबजावणी ही लवकरच संपूर्ण राज्यभरामध्ये केली जाईल. त्याबाबतची माहिती वेळोवेळी दिली जाईल.
Medical Education Recruitment 2025: महाराष्ट्रात 1107 पदांसाठी मोठी भरती
एक लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारकडून नव्याने राबवण्यात येणाऱ्या शून्य टक्के व्याजदरावर एक लाख रुपये पर्यंत कर्जासाठी अर्ज करण्याची पद्धत ही अगदी सोपी असणार आहे याबाबतचे अद्यापही स्त्री ही माहिती समोर आलेली नसली तरी ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींचे अर्ज लाडके बहिणी योजनेसाठी मागवण्यात आले होते त्याच पद्धतीने ग्रामीण भागात गावोगावी अगदी घरापर्यंत या कर्ज योजनेसाठी अगदी सोप्या पद्धतीने लाडक्या बहिणींना अर्ज करता येतील अशी पद्धत निर्माण केली जाईल.
Ladaki Bahin Yojana साठी काय निकष असतील आणि कोणत्या गोष्टींची पडताळणी केली जाईल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे सक्षमीकरणासाठी आणि त्यांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये पर्यंत कर्ज या योजनेसाठी सरकारकडून कठोर तपासणी केली जाईल आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांनाच या कर्ज योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमध्ये कसे प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाईल. यासाठी अर्ज मागवले जातील आणि त्या अर्जातून ज्या महिलांना गरज आहे अशाच महिलांना कर्ज मिळेल आणि त्या अर्जांची पडताळणी देखील अतिशय कठोर पद्धतीने केली जाईल. त्यामध्ये कसलीही त्रुटी आढळल्यास त्या महिलेचा अर्ज तिथेच बाद केला जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले.