Kunbi Caste Certificate
Kunbi Caste Certificate म्हणजे काय?
Kunbi Caste Certificate हे प्रमाणपत्र SC, ST, OBC यासारख्या आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील अनेक शासकीय योजनांमध्ये कुणबी जातीचा पुरावा आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ठराविक कागदपत्रे आणि शासकीय प्रक्रिया पार करावी लागते.
Kunbi Caste Certificate साठी आवश्यक कागदपत्रे
1967 पूर्वीचे कोणतेही खालील पुरावे आवश्यक:
ज्यामध्ये स्पष्टपणे “कुणबी” अशी जातीची नोंद असावी.
- खासरापत्रक, पाहणीपत्रक, क-पत्रक, कुळ नोंदवही
- नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर 1951 (जनगणना पत्रक)
- नमुना क्र. 1 किंवा 2 – हक्क नोंद पत्रक
- 7/12 उतारा (कुणबी नोंद असलेला)
- जन्म/मृत्यू नोंद रजिस्टर (गाव नमुना 14)
- प्रवेश-निर्गम नोंदवही (शाळेचा जनरल रजिस्टर)
- राज्य उत्पादन शुल्क रजिस्टर (मळी/ताडी/अनुजप्ती नोंदवही)
- पोलीस खात्याची गाववारी, FIR नोंदी, पंचनामा इ.
- भूमी अभिलेख विभागाचे पक्काबुक, शेतवाऱ्याचे पत्रक, हक्क नोंदणी पत्रक
- सह जिल्हा निबंधक कार्यालयातील नोंदणी दस्तावेज
टीप: मोडी, उर्दू भाषेतील दस्तावेज असल्यास भाषांतर करून अटेस्टेड करणे आवश्यक.
इतर आवश्यक कागदपत्रे
- 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर वंशावळ प्रतिज्ञापत्र
- अर्ज करणारा व लाभार्थ्याचे:
- आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (TC)
- वडील / आजोबा / काकांचे शैक्षणिक किंवा ओळख पुरावे
Kunbi Caste Certificate ची शासकीय प्रक्रिया
- सर्व पुरावे गोळा करून आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करा.
👉 https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ - अर्ज संबंधित तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो.
- दिलेल्या कागदपत्रांची खातरजमा त्या विभागातून शासकीय पातळीवर होते.
- सर्व कागदपत्रे योग्य असल्यास SDO (Sub Divisional Officer) कडून अंतिम Kunbi Caste Certificate दिले जाते.
1967 पूर्वीचे पुरावे कुठून मिळतात?
➤ महसुली विभाग:
- तालुका कार्यालय / तहसील कार्यालय / जिल्हाधिकारी कार्यालय
- भूमी अभिलेख कार्यालय – खासरापत्रक, पाहणी, 7/12 उतारे
➤ पोलीस स्टेशन:
- गाववारी, FIR रजिस्टर, अटक पंचनामे इ.
➤ शाळा:
- जुनी शाळेची प्रवेश नोंद वही / जनरल रजिस्टर
➤ जिल्हा निबंधक कार्यालय:
- संपत्ती दस्त, इसार पावत्या, मृत्यू पत्र, तडजोड पत्र इ.
➤ राज्य उत्पादन शुल्क व कारागृह विभाग:
- अनुजप्ती व मळी नोंदवह्या, कैद्यांचे नोंद रजिस्टर
➤ नगरपरिषद / महापालिका:
- वसूल नोंदी, शेतवार तक्ता, मालमत्ता नोंदी
उपयुक्त लिंक (Backlinks)
- आपले सरकार पोर्टल – ऑनलाइन अर्ज करा
- महाऑनलाइन – प्रमाणपत्र अर्ज मार्गदर्शक
- राज्य शासनाचा अधिकृत संकेतस्थळ
Kunbi Caste Certificate मिळवण्यासाठी पुराव्यांची सत्यता, वंशावळीची साखळी, आणि 1967 पूर्वीच्या कागदपत्रांची नोंद महत्त्वाची आहे. योग्य त्या विभागातून कागदपत्रे मिळवून सुसंगतपणे अर्ज केल्यास प्रमाणपत्र सहज मिळू शकते.
YouTube Monetization Policy 2025: नवीन धोरणामुळे कंटेंट क्रिएटर्ससाठी मोठे बदल