लाडकी बहीण योजना :-
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकार म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना 2024 ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेचा प्रमुख हेतू सांगायचा झाला तर राज्यातील गरीब आणि होतकरू महिलांसाठी दरमहा दीड हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट महाराष्ट्र सरकारकडून जमा करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांमध्ये एक आनंदाचे वातावरण झालेले आहे.
कारण की अशा खूप सारी सरकारी योजना असतात ज्या की फक्त कागदोपत्री आणि घोषणेपुरत्याच मर्यादित असतात. परंतु लाडकी बहीण योजना ही योजना फक्त कागदोपत्री किंवा घोषणेपूर्ती मर्यादित नसून ती अगदी सत्यात अमलात आणण्याचा विक्रम हा माहिती सरकारने करून दाखवला आहे. या सरकारने आतापर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक हप्त्यामध्ये दीड हजार रुपये त्यामानाने 7500 हे आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी भाई योजना या योजनेमार्फत थेट जमा केलेले आहेत. या योजनेचा पहिला हप्ता हा रक्षाबंधन या पवित्र सणाच्या शुभमुहूर्तावरती मुख्यमंत्र्यांनी जमा केलेला होता.
तसेच आत्ताच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुती सरकारने याच लाडकी बहीण योजनेमध्ये काही बदल करण्याच्या घोषणा देखील प्रचारादरम्यान ठिकाणी केलेले आहेत. तसेच माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांवरून 21 रुपये करण्याची ग्वाही देखील महायुती सरकारच्या घोषणा पत्रामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यभारामध्ये ठिकठिकाणी घेण्यात येणाऱ्या प्रचार सभांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांमधील रकमेच्या वाढीबाबत देखील माहिती सरकारच्या अनेक प्रमुख नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
योजनेबद्दल अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/
माझी लाडकी बहीण योजना निकष
तर महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी चालू करण्यात आलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील कोणकोणत्या महिला पात्र आहेत? या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांसाठी कोणकोणते निकष काढण्यात आलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया.
- तर महाराष्ट्र राज्यातील गरीब गरजवंत तसेच विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या खर्च भागण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून त्यांच्या लाडक्या बहिणींना एक मदत म्हणून दरमहा दीड हजार रुपये रक्कम देण्यात येत आहे.
- या योजनेसाठी वय वर्ष 21 ते वय वर्ष 60 या वयोमर्यादेतील सर्व महिला ऑनलाईन रित्या या योजनेसाठी अर्ज केलेला आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना ज्या महिलांना अर्ज करताना काही अडचणी येत आहेत त्या महिलांनी त्यांच्या जवळपास असणाऱ्या अंगणवाडी मध्ये भेट देऊन अंगणवाडी सेविकेला तुमचे कागदपत्रे ऑनलाइन अर्ज भरण्याची पूर्ण जबाबदारी ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे.
- लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करताना महिलांना त्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असलेल्या चा पुरावा द्यावा लागणार आहे.
- तसेच लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करताना लाभार्थी महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव असलेले एक बँक अकाउंट असणे गरजेचे आहे.
महायुती सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी बनवलेल्या लाडकी बहिण योजना यामार्फत राज्यसरकार दरमहा १५०० रुपये आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी देतोय. आत्तापर्यंत राज्यसरकारने ५ हप्त्यामध्ये पैसे थेट महिलांच्या खात्यामध्ये पाठवलेत. आत्ताच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता मिळवता आली याच प्रमुख कारण म्हणून या योजनेकडे पाहिलं जातंय.
तर महायुती सरकारने निवडणुका जाहीर होताच लाडकी बहिण योजनेचा हप्ता १५०० वरून २१०० रुपये प्रति माह करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे या सरकारने तो दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री शपथ विधी झाल्याच्या नंतर विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल.
महाराष्ट्र राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठीचे दीड हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट जमा करण्यात येतात. तसेच माझी लाडकी बहीण योजनेच्या दीड हजार वरून 2100 रुपये हप्ता वाढीबाबत सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेवर कधी अंमलबजावणी होणार असा प्रश्न सर्व महाराष्ट्रातील महिलांच्या मनामध्ये निर्माण झालेला असणार. तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढीबाबत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि संपूर्णपणे सरकार स्थापन झाल्यानंतर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लवकरच या हप्तेवाडी बाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अशाप्रकारे राज्य सरकारने चालू केलेले लाडके बहिण योजनेचा सहावा हप्ता हा राज्यातील सरकार पूर्णपणे स्थापन होऊन मुख्यमंत्री शपथविधी वगैरे होऊन अधिवेशन झाल्यानंतर जमा होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
लाडकी बहीण योजनेमधील निकषांमध्ये बदल होण्याच्या चर्चा
मुख्यमंत्री माझी लाडकी भाई योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय जोरामध्ये काम करत असून या योजनेमार्फत सर्व महिलांच्या खात्यांमध्ये म्हणजेच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यांमध्ये सरकार करून दरमहा दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत परंतु इथून पुढे या योजनेचा हप्ता पंधराशे वरून 21 रुपये करण्याबाबत राज्यांमधील सरकारने आश्वासन दिलेले होते आणि आता तेच राज्यांमध्ये सरकार स्थापन झालेले आहे त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या सरकारने या योजनेमध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्याचे निर्णय घेणे येणार असल्याच्या चर्चांना उधाण उठले आहे. आता यामध्ये अगोदर पात्र असणाऱ्या महिला उमेदवार यांच्या काही प्रमाणात अर्ज बाद देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून लवकरच याबाबतची माहिती देण्यात येईल या आशेवर सर्व महाराष्ट्रातील महिलांचे लक्ष लागून आहे.
अर्ज केलेल्या महिला उमेदवाराचे वय मर्यादेचे कागदपत्र तसेच बँक खाते आणि अर्जदाराच्या कौटुंबिक उत्पन्नावर या योजनेसाठी ची पात्रता ठरविण्यात येणार आहे. म्हणजेच आतापर्यंत लाभ घेणाऱ्या महिलांना जर का राज्य सरकारने केलेल्या अटींमध्ये बदलांमध्ये त्यांचे निकष बसत नसतील तर त्या महिलांचे अर्ज बाद होऊन त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जदार महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अशा प्रकारची अट यामध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ज्या महिला उमेदवार आयकर विभागामध्ये कर भरतात त्या महिलांचे देखील अर्ज बाद होण्याची चर्चा आहेत.
त्याचप्रमाणे ज्या महिला उमेदवार या राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त होऊन पेन्शनचा लाभ घेत असल्यास त्या देखील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता या नवीन निकषांबद्दल सध्या तरी राज्य सरकारकडून कसल्याही प्रकारचे घोषणा करण्यात आलेली नाही परंतु हे निकष लाडकी बहीण योजनेसाठी लागू करण्यात येण्याची शक्यता सर्व प्रसार माध्यमातून वर्तवण्यात येत आहे.