Jago Grahak Jago
आजच्या डिजिटल युगात Jago Grahak Jago ही ग्राहक जागरूकता मोहिम अधिकच महत्त्वाची ठरत आहे. भारतात लाखो लोक दररोज ऑनलाईन खरेदी करत आहेत, पण यामध्ये फसवणुकीची शक्यता देखील तितकीच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘जागो ग्राहक जागो’ (Jago Grahak Jago) मोहिमेच्या माध्यमातून सरकारने ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
ऑनलाइन एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यामध्ये काही फसवणूक होते आणि अशा घटना दररोज वारंवार घडत असतात. मग प्रश्न उरतो तो म्हणजे एक तर आपण ऑनलाईन वस्तू मागवलेली असते त्याचा पत्ता कुठे आहे त्यांचे दुकान कुठे आहे याची आपल्याला कल्पना नसते मग डिलिव्हरी देणारा हा वेगळ्या कंपनीचा असतो आणि आपण मागवलेली वस्तू ही दुसऱ्याच कंपनीचे असते तर अशांमध्ये फसवणूक झाल्यास जागो ग्राहक जागो या मार्फत तुम्ही आपली तक्रार देऊ शकता.
Jago Grahak Jago मोहिम म्हणजे काय?
‘जागो ग्राहक जागो’ ही केंद्र सरकारची ग्राहक जागरूकता मोहिम आहे, जी ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्राहकांना योग्य माहिती दिली जाते – जसे की फसवणूक झाल्यास काय करावे, कुठे तक्रार करावी, कायदेशीर आधार काय आहे इ.
ही मोहिम ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत राबवली जाते आणि यामध्ये विविध माध्यमांचा वापर केला जातो – टीव्ही जाहिराती, वृत्तपत्र, सोशल मीडिया, वेब पोर्टल्स, तसेच शैक्षणिक कार्यशाळा.
Jago Grahak Jago आणि ऑनलाईन फसवणूक – २ महिन्यात ७ कोटींची परतफेड!
लोकमतमनी डॉट कॉमवरील बातमीनुसार, फक्त २ महिन्यांत National Consumer Helpline (NCH) कडे दाखल झालेल्या तक्रारींवर कारवाई करून ४.१४ लाख ग्राहकांना ७.०७ कोटी रुपये परत मिळाले आहेत!
यामध्ये मुख्यतः ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित तक्रारी होत्या – उदा. चुकीचा प्रॉडक्ट, वेळेवर डिलिव्हरी न होणे, परतफेड न मिळणे इत्यादी.
हे यश केवळ Jago Grahak Jago मोहिमेमुळेच शक्य झाले आहे.
ALSO READ: शेतात बोर घेण्यासाठी सरकारकडून 50 हजार अनुदान – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
तुमची फसवणूक झाल्यास काय कराल?
जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करताना फसवले गेलात, तर खालील मार्गांनी तक्रार नोंदवता येते:
- टोल-फ्री नंबर १९१५ वर कॉल करा
- SMS पाठवा: ८७१६८००९८९
- वेबसाइट: consumerhelpline.gov.in
- NCH App किंवा UMANG App गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा त्यामध्ये विचारले गेलेल्या माहितीच्या आधारे तुमचे लॉगिन करा आणि या दोन्ही ॲप्स च्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या सोबत झालेल्या ऑनलाईन फसवणुकीबद्दल तक्रार देऊ शकता आणि तुमच्या तक्रारीचे निरासरण करून घेऊ शकता.
- INGRAM पोर्टलवर तक्रार नोंदवा – यामध्ये ट्रॅकिंग सुद्धा करता येते. या पोर्टल वरती तुम्हाला तुम्ही ऑनलाईन मागवलेल्या वस्तूचा आयडी क्रमांक टाकून तुम्ही केलेली तक्रार ट्रॅक सुद्धा करता येते की तुमच्या तक्रारी वरती काही ॲक्शन घेतले आहे का नाही हे पाहता येते.
ई-कॉमर्समधील सर्वाधिक तक्रारी आणि Jago Grahak Jago ची भूमिका
बातमीनुसार, एकट्या ई-कॉमर्स क्षेत्रातील तक्रारींचा आकडा १,५५६४९ पर्यंत गेला आहे. यामध्ये सर्वाधिक रक्कम परतफेड करण्यात आली आहे.यामुळे जागो ग्राहक जागो चा भूमिकेमुळे बऱ्याचशा ग्राहकांना फसवणुकीपासून दिलासा मिळालेला आहे आणि जागो ग्राहक जागो या सरकारच्या मोहिमेवर विश्वास देखील बसलेला आहे.
ग्राहकांनी वेळेत तक्रार केली तर त्यांना कायदेशीर संरक्षण मिळते, आणि यामध्ये ‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेचा मोठा वाटा आहे.
कायदेशीर आधार – ग्राहक संरक्षण कायदा २०१९
ग्राहक तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ लागू आहे. या कायद्यानुसार ग्राहकांना फसवणुकीपासून संरक्षण, परतफेड, दंड आणि नुकसानभरपाई यासाठी अर्ज करता येतो.
जर स्थानिक स्तरावर तक्रार न सुटली, तर ग्राहक राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग (NCDRC) कडेही अर्ज करू शकतात.
Jago Grahak Jago मोहिमेतून करिअर संधी – Job Vacancy
या मोहिमेमुळे केवळ ग्राहक जागरूक होत नाहीत, तर यातून अनेक Job Vacancy सुद्धा निर्माण होत आहेत:
- ग्राहक सहाय्य अधिकारी (Customer Support)
- डेटा एंट्री ऑपरेटर
- INGRAM Portal Analysts
- App Support Executive (UMANG/NCH)
- Consumer Rights Advocate
जर तुम्हाला समाजसेवा, तंत्रज्ञान, आणि कायदेशीर बाबींचा अनुभव असेल तर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्तम संधी आहे.
Jago Grahak Jago ही ग्राहकांची ढाल
जागो ग्राहक जागो ही केवळ एक सरकारी मोहिम नाही, तर ती ग्राहकांची सुरक्षा कवच आहे. ऑनलाईन फसवणूक, चुकीचा माल, चुकीची सेवा यासारख्या बाबींवर यामुळे तात्काळ कारवाई शक्य होते.
तुम्हीही जर अशा अनुभवातून गेलात असाल, तर थांबू नका – Jago Grahak Jago मोहिमेचा लाभ घ्या, आणि इतरांनाही जागरूक करा.