---Advertisement---

India mock drill एक सुरक्षेची पूर्व तयारी भारताकडून देशभरात ठिकठिकाणी mock drill

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
India mock drill
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

आपत्ती कोणतीही सांगून येत नाही. ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, अशा आपत्तीच्या काळात योग्य प्रकारची तयारी आणि प्रशिक्षण असणे अत्यावश्यक असते. या दृष्टीने India Mock Drill ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, जी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने देशभरात वेळोवेळी राबवली जाते. पाकिस्तानने केलेल्या पहलगाम येथील निष्पाप भारतीय पर्यटकांवरच्या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला देखील त्यास भाषेमध्ये प्रतिउत्तर देण्याची तयारी सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांमधून आपण पाहिले. याच अनुषंगाने पाकिस्तान वरती हल्ला करण्याच्या तयारीत असलेली भारतीय लष्कर परंतु समोरून देखील हल्ला होऊ शकतो आणि झाल्यास काय करावे याची काळजी घेण्यासाठी ही मॉक ड्रिल घेण्यात येत आहे.

India Mock Drill म्हणजे काय?
Mock Drill म्हणजे एक प्रकारचा “प्रात्यक्षिक सराव”. यामध्ये कोणत्याही आपत्तीची (जसे की भूकंप, आग, पूर, सायबर हल्ला, अण्वस्त्र हल्ला इत्यादी) कृत्रिम परिस्थिती निर्माण केली जाते आणि त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणा, कर्मचारी, नागरिक यांना प्रशिक्षित केले जाते की त्या वेळी नेमकी काय कृती करावी. या mock drill च्या माध्यमातून देशभरातील जनतेचे युद्धादरम्यान होणारे हाल आणि होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पूर्णपणे सराव करून घेतला जातो. अचानक एखाद्या ठिकाणावरती क्षेत्र कडून हल्ला झाल्यास तेथील जनतेने कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या त्या परिस्थितीमध्ये काय करावे याबाबतची संपूर्ण सराव हा या Mock drill मध्ये करून घेतला जातो. अशा प्रकारचा मॉडल हा युद्ध परिस्थितीमध्ये किंवा कोणत्या नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप सुनामी अशा हाय अलर्ट गोष्टींसाठी घेण्यात येतो.

India Mock Drill या मोहिमेचा उद्देश आपत्ती येण्याआधीच यंत्रणांना सज्ज ठेवणे हा असतो. हे सराव विविध शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांच्या समन्वयातून पार पडतात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, नागरी संरक्षण यंत्रणा या सर्व यामध्ये भाग घेतात.

India Mock Drill चे प्रकार:

  1. Fire Mock Drill:
    शाळा, कार्यालये, कारखाने येथे अचानक आग लागल्यास काय करावे याचा सराव. सर्व व्यक्तींना सुरक्षित बाहेर कसे काढावे, फायर अलार्म कसा वाजवावा, अग्निशमन उपकरणांचा वापर कसा करावा याचा अभ्यास.
  2. Earthquake Mock Drill:
    भूकंपाच्या वेळी ‘Drop, Cover and Hold’ या कृतींचा सराव. सुरक्षित जागा ओळखणे, आपत्तीच्या वेळी घराबाहेर पडण्याची पद्धत इत्यादी शिकवले जाते.
  3. Flood and Cyclone Mock Drill:
    पुराचा धोका असलेल्या भागांमध्ये सुरक्षित स्थलांतर, अन्न व पाण्याचा साठा, मदत केंद्रांशी संपर्क ठेवण्याची प्रक्रिया समजावली जाते.
  4. Terror Attack Mock Drill:
    शस्त्रसज्ज दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीस, लष्कर, आणि इतर सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद, नागरीकांचे संरक्षण कसे करावे याचा अभ्यास घेतला जातो.
  5. Chemical/Biological Disaster Mock Drill:
    रासायनिक किंवा जैविक हल्ल्याच्या वेळी बचाव उपाय, सुरक्षात्मक पोशाख, वैद्यकीय सेवा, विलगीकरण अशा बाबी शिकवल्या जातात.

India Mock Drill चे फायदे:

  • यंत्रणांची तयारी: आपत्तीच्या वेळी कशी प्रतिक्रिया द्यावी याचा अनुभव मिळतो. आपत्तीच्या वेळी कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होत नाही सर्व गोष्टींची तयारी अगोदरपासूनच असल्यामुळे सर्व काही नियोजनबद्ध होते.
  • जनजागृती: सामान्य नागरिकही अशा सरावांमुळे सजग होतात. सुरक्षा यंत्रणांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर ती चर्चा आणि कोणती निर्णय घेतले याबद्दल सामान्य नागरिकांना कल्पना नसते परंतु अशा या mock drill मुळे सामान्य जनता देखील सुसज्ज होते.
  • दोष ओळखणे: सरावादरम्यान काय चुका होत आहेत, काय सुधारणा गरजेच्या आहेत हे लक्षात येते. झालेल्या चुकांमध्ये काय बदल करायचे हे देखील लक्षात येते आणि प्रत्यक्षात तशी परिस्थिती आल्यास या चुका टाळल्या जातात.
  • समन्वय वाढतो: विविध यंत्रणांमधील सहकार्य सुधारते.

India Mock Drill चे अलीकडील उदाहरण:

संपूर्ण भारतभर 2024 मध्ये National Disaster Management Authority (NDMA) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांच्या सहकार्याने एक व्यापक India Mock Drill राबवली गेली. यात लाखो लोकांनी भाग घेतला आणि भूकंप, पूर, सायबर अटॅक यासारख्या विविध परिस्थितींचा सराव करण्यात आला.

निष्कर्ष:

India Mock Drill केवळ एक औपचारिकता नाही तर ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक अशी कृती आहे. आपत्तीच्या वेळेस घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्यासाठी आणि जीवित हानी टाळण्यासाठी अशा सरावांचे महत्त्व खूप आहे. शासनाने अशा सरावाचे आयोजन अधिक ठिकाणी, अधिक वेळा आणि अधिक नागरिकांच्या सहभागाने करावे, ही काळाची गरज आहे. तर अशाप्रकारे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये आणि नागरिक ह्याच्या ग्रुप रहावेत त्यांच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती राहू नये यासाठी अशा प्रकारच्या मॉक ड्रिल्स ह्या घेण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहेत की जर मॉकटेल चे सायरन वाजले तर घाबरून जाण्याची गरज नाही आणि त्यामध्ये काय काय करावे याबद्दलच्या सूचना देखील जारी केलेले आहेत.

---Advertisement---

Leave a Comment