---Advertisement---

भारत पाकिस्तान सामन्यात भारताचा पाकिस्तानावर दणदणीत विजय INDIA VS PAKISTAN INDIA WIN

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
IND VS PAK championship 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

IND VS PAK championship 2025 :

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना म्हणलं की दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमिचा जिव्हाळ्याचा विषय. मग तो विश्वकप असो, आशिया कप किंवा कोणतीही टूर्नामेंट सामना असो, दोन्ही देशाकडून अगदी संपूर्ण टाकदीने हा सामना लढवला जातो. असाच एक भारत पाकिस्तान सामना हा चॅम्पियन ट्रॉफी 2025 (champion trophy 2025) च्या माध्यमातून काल म्हणजेच 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबई येथे खेळवला गेला होता. या सामान्यामध्ये परंपरेप्रमांणे भारताने पाकिस्तानावर दुबई येथील स्टेडियम वर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली. हा IND VS PAK सामना दुबई मधील DUBAI INTERNATIONAL CRICKET STADIUM DUBAI येथे भरवण्यात आला होता. या सामान्यामध्ये पाकिस्तान ने टॉस जिंकत पाकिस्तान संघाचा कॅप्टन मोहोम्मद रिझवान याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिल्यांदा फलंदाजी केली.

भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान च्या संघाला 49.4 इतक्या ओव्हर मधेंच सर्व खेळाडू बाद केले. भारतीय संघाणे पाकिस्तान चा डाव 241 धावामध्ये गुंडाळाला. 50 ओव्हर च्या या सामान्यामध्ये भारताला विजयी होण्यासाठी हा एक खुप मोठ्ठा turning point ठरला. खरं तर या चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे नेतृत्व पाकिस्तान संघाकडे आहे. परंतु भारताने पाकिस्तान मधे सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे फक्त भारतीय संघाच्या जेवढे सामने होतील ते संपूर्ण सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वरती खरलावले जाणार आहेत. हे क्रिकेट विश्वामध्ये इतिहासात पहिल्यांदाच होताना पाहायला मिळत आहे. पाकिस्तान संघाला क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच घरचे मैदान सोडून दुसरीकडे सामना खेळताना पाहायला मिळाले. भारतीय संघाने आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये जास्तीत जास्त विजय हर भारतीय संघाने च मिळवलेले आहेत. हा आत्तापर्यंत चा इतिहास आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी 2025(INDIA VS PAKISTAN CHAMPION TROPHY 2025)

भारत आणि पाकिस्तान या दोन संघामध्ये 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुबई येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वर हा सामना रंगला. या सामान्याला पाहण्यासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमिकडून भरपूर प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. या सामन्यासाठी स्टेडियम वरील तिकिटांची विक्री ही मॅच सुरू होण्यापूर्वीच संपूर्ण विकली गेलेली होती. आणि हा मॅच असा रंगमदार झाला की तेथील क्रिकेट प्रेमींना त्यांचे पैसे परत भेटण्याची जाणीव झाली. भारत विरुद्ध पाकिस्तान या मॅच मध्ये पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला गोलंदाजी करावी लागली. पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आजमी आला अक्षर पटेल यांनी 23 धावावरच केहल राहुलच्या हातामध्ये सहज कॅच देत विकेट मिळवला.

त्यानंतर सैद शाकेल याने 62 धावा तर रिझवान याने 46 धावा करत आपली विकेट गमावली. या दोघांच्या तसेच खुशडील याच्या 38 भावांच्या खेळीसह पाकिस्तान संघाला 49.4 ओव्हर मध्ये 241 धावा जमावत्या आल्या आणि त्या बदल्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण टीम बाद झाली. त्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानने दिलेल्या 241 धावांच्या लक्षात आकडे घोडदौड सुरू केले. यामध्ये रोहित शर्मा कर्णधार यांनी धमाकेदार सुरुवात करत 15 बॉल मध्ये 20 रन मिळवल्या याचबरोबर शुभम गिल याने देखील धमाकेदार खेळी केली आणि 46 धावा मिळवत आपली विकेट गमावली. भारतीय सलाम वीर रोहित शर्मा आणि सुमन गिल या दोघांच्या विकेट नंतर श्रेयस आर्यन आणि विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाचे धुरा आपल्या खांद्यावरती घेत लक्ष गाठण्याकडे सुरुवात केली.

विराट कोहली चे दमदार शतक virat kohli century

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या दरम्यान विराट कोहलीने 111 बॉल मध्ये आपले शतक पूर्ण करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. याचबरोबर विराट कोहली याला विजय मिळवण्यामध्ये विजयाचा वाटा दिला तो म्हणजे श्रेयस अय्याने. श्रेयस ने चौथ्या क्रमांकावर ती फलंदाजीला येत 67 बॉल मधे 56 राणांची दमदार खेळी करत भारतीय संघाला पाकिस्तान विरुद्ध एक ऐतिहासिक विजय मिळवण्यामध्ये मदत केली. अशाप्रकारे भारताने पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन ट्रॉफी सामना हा फक्त 42.2 इतक्या ओव्हर मध्येच जिंकला. या सामन्यादरम्यान विराट कोहली यांनी आपले शतक ठोकले. आणि भारताकडून सर्वाधिक शतके करणारा दुसरा क्रिकेट वीर ठरला. तसेच रोहित शर्मा हा कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला.

भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध चा हा सामना अगदी सहजरित्या जिंकत संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. हा विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरात विजय जल्लोष साजरा करण्यात आला आणि टीम इंडियाचे संपूर्ण देशभरामधून कौतुक करण्यात आले. आता सर्व क्रिकेट प्रेमींना याच गोष्टीची उत्सुकता आहे की भारत हा चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये अंतिम फेरीमध्ये कधी पोहोचतो आणि चॅम्पियन ट्रॉफी कधी एकदाचा जिंकतो.

---Advertisement---

Leave a Comment