---Advertisement---

गुढीपाडवा सण का साजरा केला जातो काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
गुढीपाडवा सण का साजरा केला जातो काय आहे या दिवसाचे विशेष महत्त्व
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Gudhipadwa Hindu Festival 2025 :

आज 30 मार्च 2025 या वर्षाचा गुढीपाडवा हा सण आजच्या दिवशी अगदी थाटामाटात संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय. आजच्याच दिवसापासून म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाला आणि मराठी नववर्षाला सुरुवात होते. म्हणजेच आपण जे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये महिन्यांची नावे जी वापरतो ती नावे ही इंग्रजी महिन्यांची नावे असून आपल्याला आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे हिंदू नववर्षांमध्ये वर्षभरामध्ये येणाऱ्या महिन्यांची नावे माहित आहेत का? आपल्या घरामध्ये जर का आजी असेल तर तिला जानेवारी फेब्रुवारी हे महिन्या जास्त करून माहिती नसतात परंतु तिला चैत्र वैशाख असे मराठी महिने अगदी तोंडपाठ असतात आणि त्यानुसारच ती आपल्या वर्षभराचे आणि महिन्याचे नियोजन घालून असते. कोणत्या मराठी महिन्यांमध्ये कोणता सण आहे हे देखील आपल्या या मराठी महिन्यांमधूनच समजते.

गुढीपाडवा या सणाबद्दल चा इतिहास आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊया. गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू संस्कृतीप्रमाणे खूप मोठा सण साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यभारासह देशभरामध्ये हिंदू समाज बांधवांच्या वतीने जागोजागी भव्य दिव्य अशा मिरवणुका काढल्या जातात, तसेच प्रत्येक घरासमोर गुढी उभा करून घरामध्ये गोड जेवण बनवले जाते पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. लहान चिमुकले गळ्यामध्ये साखरेचे तसेच खोबरा खरीप अशा प्रकारचे हार बनवून मिरवत फिरतात. सगळीकडे अगदी आनंदाचे वातावरण असते. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वजण नवीन कपडे परिधान करून घराला सजावट करतात. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा सण म्हणजे या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात.

गुढीपाडवा सण का साजरा केला जातो :

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे दोन्ही बाजूने कारणे आहेत पहिलं म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीनुसार आणि दुसरे म्हणजे वैज्ञानिक देखील. चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असे समजून नववर्षाचे अगदी थाटात स्वागत केले जाते त्यासाठी प्रत्येकाच्या दारासमोर काठी उभा करून त्यावरती गुढी उभा केली जाते. आता दारासमोर गुढी उभा करण्यामागे हिंदू धर्मशास्त्रानुसार कारण सांगायचे झाले तर गुढी उभा करणे म्हणजे विजयाचे, समृद्धी चे प्रतीक असे मानले जाते. ज्याच्या घरासमोर ही गुढी उभारली जाते त्याला त्याच्या आयुष्यामध्ये ठरवलेल्या गोष्टींमध्ये विजय मिळवता येतो म्हणजेच तुमच्याकडे जर का काही ध्येय असेल किंवा तुम्हाला कोणत्यातरी गोष्टी वरती विजय मिळवत असेल तर तो शक्य होतो.

वेदांग ज्योतिष नावाच्या ग्रंथात अस सांगितलेले आहे की संपूर्ण वर्षामधे साडेतीन मुहूर्त असतात. याच साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजेच “गुढीपाडवा “. म्हणूनच लोक या पवित्र दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करतात. सोन्याचे दागिने, वाहने देखील या आजच्या शुभ मुहूर्तावर खरेदी केली जातात. पाहिली गुढी कोणी आणि कधी उभा केली होती ते पाहूया,

गुढीपाडवा सणाचा इतिहास

पहिली गुढी कोणी उभा केली ही सांगायचं झालं तर याबद्दल एक कथा आहे. ज्या मध्ये असा सांगितलेल आहे की, शालिवाहन हा राजा एके काळी राज्य करत होता. त्याने त्याच्या राज्यावरती परकीय सैनिकांनी आक्रमण केल्यानंतर लढाईमध्ये युद्ध जिंकून आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभा केली. आपल्या इतिहासामध्ये त्या शालिवाहन राजाच्या कालखंडाला शक्य म्हणून ओळखले जाते. आणि तेव्हापासूनच हिंदू नववर्ष सुरुवात झाली. आता हे आपण पाहतो की आपल्या रोजच्या वापरामध्ये असलेले कॅलेंडर यामध्ये हिंदू वर्ष आणि इंग्रजी वर्ष असे दोन वर्ष दिलेले असतात. जे की दोन्ही कधीच समान नसतात. याचाच अर्थ असा की शालीवाहन या राजाच्या काळापासून मोजण्यात आलेल्या वर्षांना आपण हिंदू वर्ष म्हणतो.

तो काळ होता इसवी सन 78 चा. यामुळे आपण जर का चालू वर्षांमध्ये आणि हिंदू वर्षांमध्ये फरक बघितला तर तो 78 वर्षांचा येतो. याचबरोबर अशाही आख्यायिका सांगण्यात येतात की श्रीरामचंद्राने लंकेमधील रावणाचा वध करून त्या विजयानंतर आपल्या आयोध्या मध्ये परतल्यानंतर संपूर्ण जनतेने गुढी उभारून त्याच्या विजयाची प्रतीक म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला होता. आता हे झाले आपले ऐतिहासिक महत्त्व किंवा हिंदू धर्मिक महत्त्व. याचबरोबर हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून सुरू होणाऱ्या वर्षांमध्ये वसंत ऋतूचे आगमन होते आणि संपूर्ण निसर्गामध्ये झाडांना नवीन पालवी फुटतात यामुळे संपूर्ण निसर्ग हा अगदी हिरवाईने नटलेला असा दिसतो. यामुळेच असे हे म्हणलं जातं की निसर्ग देखील हिंदू नववर्षाचे जसे स्वागतच करतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण वर्षाचे पंचांग हे तयार केले जाते. आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असून पिढ्यानपिढ्या शेती आणि शेतीमधून पीक हे शेतकरी उत्पन्न करत आलेला आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो आणि गुढीपाडवा या सणापर्यंत शेतामधील सर्व सुगीची कामे पूर्ण होऊन शेतकरी हा पुढील वर्षासाठी शेतीची कामाला सुरुवात करतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्म संस्कृतीनुसार गुढीपाडवा आहे नव वर्ष मानले जात असले तरी देखील निसर्गामध्ये देखील तशा प्रकारचे बदल घडून येत असतात म्हणजेच हिंदू धर्म संस्कृती आणि निसर्ग या दोन्हीचा कुठेतरी संबंध असावाच.

---Advertisement---

Leave a Comment