---Advertisement---

महाराष्ट्रात लर्निंग लायसन्स ऑनलाइन अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती. driving license online application 2025

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
driving license online application 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

driving license online application 2025

तुमचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स ( driving license online application 2025) काढणं आता खूप सोपं झालं आहे. RTO ऑफिसमध्ये न जाता, घरबसल्या तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी (Learning Licence) अर्ज करू शकता. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि कॉन्टॅक्टलेस आहे, जी आधार कार्डच्या मदतीने पूर्ण होते. जर तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.

Driving License online application 2025 मध्ये तुम्हाला काय काय कागदपत्रे लागणार आहेत, त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा. Learning licence application 2025 हेदेखील कसे करायचे आणि नंतर learning license नंतर ट्रायल ला rto office मध्ये जाण्यापर्यंत ची सर्व प्रक्रिया. तसेच हा अर्ज करण्यासाठी किती खरंच येइल. या सर्व गोष्टी्टींची अगदी स्टेप बाय स्टेप माहिती आपण या पोस्टच्या मध्ये पाहणार आहोत. तर चला मग सूरु करू Driving License online application 2025.

  • १६ वर्षांवरील व्यक्तींसाठी: तुम्ही गियर नसलेल्या दुचाकीसाठी (उदा. मोपेड) अर्ज करू शकता, ज्याची क्षमता ५० सीसीपेक्षा कमी आहे.
  • १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी: तुम्ही गियर असलेल्या दुचाकी (मोटरसायकल) आणि चारचाकी (कार) या दोन्हीसाठी अर्ज करू शकता.

लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात वाहन चालवू शकता. हा लायसन्स ६ महिन्यांसाठी वैध असतो आणि लर्निंग लायसन्स मिळाल्याच्या एका महिन्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी लायसन्ससाठी अर्ज करू शकता.

१. परिवहन पोर्टलवर जा:

सर्वप्रथम, भारत सरकारच्या अधिकृत ‘परिवहन’ (Parivahan) या वेबसाईटला भेट द्या. तिथे ‘ऑनलाइन सेवा’ (Online Services) मध्ये ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’ (Driving Licence Related Services) हा पर्याय निवडा आणि राज्यांच्या यादीतून ‘महाराष्ट्र’ निवडा.

या ठिकाणी क्लिक करून देखील तुम्ही थेट परिवाहन च्या अधिकृत संकेतस्थाळावर्ती जाऊ शकता.

आता तुमच्यासमोर विविध पर्यायांची यादी येईल, त्यातील ‘Apply for Learner’s Licence’ (लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करा) हा पर्याय निवडा. अर्ज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला RTO ला जावे लागणार नाही. यासाठी ‘Submit with Aadhaar Authentication’ हा पर्याय निवडा.

येथे तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला OTP (वन टाइम पासवर्ड) टाकून पडताळणी पूर्ण करा. तुमच्या आधार कार्डमधील बरीच माहिती आपोआप भरली जाईल.

  • आधारमधील पत्ता कायम ठेवा, कारण त्यामुळे तुम्हाला RTO ला जावे लागणार नाही.
  • तुमचा RTO ऑफिस आणि शैक्षणिक पात्रता निवडा.तुम्ही ज्या जिल्ह्याच्या RTO ऑफिस च्या अंतर्गत येता ते RTO office निवडा.
  • जर तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप (रक्तगट) माहीत असेल, तर तो भरा.

तुम्ही ज्या प्रकारच्या वाहनासाठी लायसन्स काढू इच्छिता, ते निवडा. उदाहरणार्थ, ‘Motorcycle with Gear’ आणि ‘Light Motor Vehicle (LMV)’. यामध्ये तुम्हाला कोणत्या वाहन प्रकारासाठी driving license काढायचे आहे तो पर्याय निवडा. तुम्ही दोन्ही एकत्र पण काढू शकता.परंतु तुम्हाला ते वाहन चालवता आले पाहिजे. नाहीतर मग learning license मुदत संपल्यावर तुम्हाला ट्रायल साठी RTO office ला जावे लागते तेव्हा तुम्हाला वाहन चालवता आले पाहिजे नाहीतर तुमचा driving license application रद्द होऊ शकतो.

यामध्ये तुमच्या आरोग्याबद्दल काही प्रश्न विचारले जातात. तुम्हाला कोणतीही शारीरिक समस्या नसल्यास, बहुतेक प्रश्नांसाठी ‘नाही’ निवडा. जर तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल, तर ‘होय’ निवडा.सर्व माहिती अचूक भरा. अर्ज यशस्वी आणि driving license मिळण्याची शक्यता वाढते.

तुम्ही निवडलेल्या वाहनांच्या प्रकारानुसार तुम्हाला शुल्क भरावे लागेल. दुचाकी आणि चारचाकी या दोन्हीसाठी अर्ज केल्यास साधारणतः ३५० रुपये शुल्क लागू शकते. पेमेंट पूर्ण झाल्यावर त्याची पावती डाउनलोड करून ठेवा.

अर्ज आणि शुल्क भरल्यानंतर, तुम्हाला एक रोड सेफ्टी ट्यूटोरियल व्हिडिओ बघावा लागेल. तो पाहिल्यावर तुमच्या मोबाइल नंबरवर ऑनलाइन टेस्टसाठी एक पासवर्ड येईल. हा पासवर्ड वापरून तुम्ही ऑनलाइन टेस्ट देऊ शकता.

ऑनलाइन टेस्टमध्ये रोड सेफ्टी आणि वाहतुकीच्या नियमांवर आधारित प्रश्न विचारले जातात. चाचणी यशस्वीरीत्या पास केल्यावर तुम्हाला लर्निंग लायसन्स लगेच मिळेल, जे तुम्ही डाउनलोड करू शकता.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी तयारी करताना तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही महत्त्वाचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि वाहतूक चिन्हे दिली आहेत.

1.प्रश्न: हे चिन्ह काय दर्शवते?

उत्तर: प्रवेश बंद (Entry Prohibited). या रस्त्यावर कोणत्याही वाहनाला प्रवेश नाही.

driving license online application 2025

2.प्रश्न: हे चिन्ह काय दर्शवते?

उत्तर: पुढे रस्ता अरुंद आहे (Road Narrows Ahead).

driving license online application 2025

3.प्रश्न: हे चिन्ह काय दर्शवते?

 driving license online application 2025

उत्तर: जंक्शन किंवा क्रॉसरोड (Cross Road / Intersection). पुढे दोन रस्ते मिळतात.

4.प्रश्न: हे चिन्ह काय दर्शवते?

 driving license online application 2025

उत्तर: सायकलींसाठी अनिवार्य मार्ग (Mandatory for Bicycles). या रस्त्यावर फक्त सायकलींना परवानगी आहे.

5. प्रश्न: हे चिन्ह काय दर्शवते?

 driving license online application 2025

उत्तर: डावीकडे वळणे अनिवार्य आहे (Mandatory Turn Left).

6. प्रश्न: तुम्ही रस्ता क्रॉसिंगजवळ पादचाऱ्यांसाठी (pedestrian) असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवावे का?

उत्तर: होय. पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडू देण्यासाठी वाहन थांबवणे बंधनकारक आहे.

7. प्रश्न: वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करणे कायद्याने योग्य आहे का?

उत्तर: नाही. वाहन चालवताना मोबाइल फोनवर बोलणे किंवा त्याचा वापर करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

8. प्रश्न: अपघात घडल्यानंतर तुम्ही काय कराल?

उत्तर: त्वरित अपघातग्रस्तांना मदत करावी आणि तातडीने पोलिसांना व जवळच्या हॉस्पिटलला कळवावे.

9. प्रश्न: तुम्ही दुचाकी चालवत असताना काय घालणे अनिवार्य आहे?

उत्तर: हेल्मेट (Helmet). दुचाकीस्वारासाठी हेल्मेट घालणे अनिवार्य आहे.

10. प्रश्न: तुमच्या वाहनाचे इंधन संपले आहे, आणि तुम्ही जवळच्या पेट्रोल पंपावर जात आहात. अशा वेळी तुम्ही काय करावे?

उत्तर: शक्य असल्यास वाहन ढकलून न्यावे. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.

driving license online application 2025

लर्निंग लायसन्सची मुदत यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर, कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी खालील स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया फॉलो करावी:

स्टेप 1: अपॉइंटमेंट घ्या

  • लर्निंग लायसन्स मिळाल्याच्या एक महिन्यानंतर आणि सहा महिन्यांच्या आत तुम्हाला कायमस्वरूपी लायसन्ससाठी अर्ज करावा लागतो.
  • परिवहन सेवा (Parivahan Seva) या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • ‘ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा’ (Driving Licence Related Services) या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे ‘Apply for Driving Licence’ हा पर्याय निवडा.

स्टेप 2: अर्ज भरा

  • तुमचा लर्निंग लायसन्स नंबर आणि जन्मतारीख (date of birth) टाकून लॉग-इन करा.
  • लागणारी सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • तुम्ही लर्निंग लायसन्ससाठी निवडलेल्या वाहनाचा प्रकार (उदा. दुचाकी किंवा चारचाकी) आपोआप अर्जामध्ये दिसेल.

स्टेप 3: driving license online application 2025 आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • तुमचा पत्त्याचा पुरावा (Address Proof) आणि वयाचा पुरावा (Age Proof) अपलोड करा.
  • लर्निंग लायसन्स स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

स्टेप 4: ड्रायव्हिंग टेस्टसाठी फी भरा

  • तुम्ही भरलेल्या अर्जावर आधारित, तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी (Driving Test) ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
  • फी भरल्यावर त्याची पावती (receipt) डाउनलोड करून ठेवा.

स्टेप 5: स्लॉट बुक करा

  • फी भरल्यावर तुम्हाला RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठीची तारीख आणि वेळ (slot) बुक करावी लागेल.
  • तुमच्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडा. तुम्हाला या दिवशीच प्रत्यक्ष RTO मध्ये जाऊन टेस्ट द्यायची आहे.

स्टेप 6: driving license online application 2025 RTO मध्ये ड्रायव्हिंग टेस्ट द्या

  • तुम्ही निवडलेल्या तारखेला आणि वेळेनुसार, तुमच्या वाहनासह (उदा. दुचाकी किंवा कार) RTO कार्यालयात उपस्थित राहा.
  • तुमच्यासोबत लर्निंग लायसन्स, फीची पावती आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे घेऊन जा.
  • ही चाचणी दोन भागांमध्ये असते:
    1. वाहनाची प्रात्यक्षिक चाचणी: यात तुम्हाला वाहन चालवून दाखवावे लागते.
    2. मौखिक चाचणी: यात वाहतुकीच्या नियमांविषयी काही सोपे प्रश्न विचारले जातात.

स्टेप 7: driving license online application 2025 लायसन्स मिळवा

  • जर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्टमध्ये यशस्वी झालात, तर तुमचा कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स काही दिवसांत तुमच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवला जाईल.
  • तुम्ही RTO वेबसाइटवर तुमच्या अर्जाची स्थिती (status) तपासू शकता.

अशा प्रकारे तुम्ही तुमचे driving license online application 2025अगदी घरबसल्या वरील स्टेप्स च्या आधारे सोप्प्या पद्धतीने भरू शकता. माहिती आवडल्यास share करायला विसरू नका.

मराठी तरुण तरुणींसाठी व्यवसाय उभारण्यासाठी 15 लाख रुपये पर्यंत मिळू शकते बिनव्याजी कर्ज फक्त असा करा अर्ज

---Advertisement---

Leave a Comment