BSF Head Constable Requirement 2025
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ने हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती थेट आणि विभागीय अशा दोन्ही पद्धतीने होणार असून, एकूण ११२१ रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्ही देशसेवेसाठी उत्सुक असाल आणि तुमच्याकडे योग्य पात्रता असेल, तर ही संधी सोडू नका. या पदांसाठी पुरुष आणि महिला उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात.
BSF Head Constable Requirement 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा:
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर): एकूण ९१० जागा
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक): एकूण २११ जागा
शैक्षणिक पात्रता:हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) या दोन्ही पदांसाठी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रेडिओ ऑपरेटरसाठी: १२वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात एकूण ६०% गुण) किंवा १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र.
रेडिओ मेकॅनिकसाठी: १२वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात एकूण ६०% गुण) किंवा १०वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र.

BSF Head Constable Requirement 2025 वयोमर्यादा:
सर्वसाधारण (UR): १८ ते २५ वर्षे इतर मागासवर्गीय (OBC): १८ ते २८ वर्षे अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): १८ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: २४ ऑगस्ट २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२५
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी BSF च्या अधिकृत वेबसाइट https://rectt.bsf.gov.in/ ला भेट द्या.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), संगणक-आधारित चाचणी (CBT), दस्तऐवज पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) या टप्प्यांतून केली जाईल.