BHEL Artisan Recruitment 2025
BHEL Artisan Recruitment 2025 अंतर्गत फिटर, वेल्डर, टर्नर, इलेक्ट्रीशियन इत्यादी पदांसाठी संधी!
BHEL Artisan Recruitment 2025 ही भारतातील नामवंत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशभरातील 11 युनिट्समध्ये ARTISAN GRADE-IV पदांसाठी एकूण 515 पदांची भरती होणार आहे.
रिक्त पदांचा तपशील (एकूण – 515 जागा)
ट्रेड | एकूण पदसंख्या |
---|---|
फिटर | 176 |
वेल्डर | 97 |
टर्नर | 51 |
मशीनिस्ट | 104 |
इलेक्ट्रीशियन | 65 |
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 18 |
फाउंड्रीमॅन | 4 |

नोकरीचे ठिकाण – हरिद्वार, भोपाल, तिरुचिरापल्ली, हैदराबाद, रानीपेट, बंगलोर, झांसी, वाराणसी, विशाखापट्टणम, जगदीशपूर इत्यादी.
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
- शिक्षण:
- 10वी + ITI (NTC) + National Apprenticeship Certificate (NAC)
- 60% गुण (OBC/General) व 55% गुण (SC/ST) आवश्यक
- वयोमर्यादा (1 जुलै 2025 रोजी):
- सामान्य/ईडब्ल्यूएस: 27 वर्षे
- ओबीसी (NCL): 30 वर्षे
- SC/ST: 32 वर्षे
- PWD, Ex-Servicemen – शासनाच्या नियमांनुसार सवलत
पगार आणि फायदे
- सुरुवातीला 1 वर्षाचे कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती
- यानंतर कंपनीच्या नियमांनुसार ARTISAN GRADE-IV पदावर नियमित नियुक्ती
- पे स्केल: ₹29,500 – ₹65,000 + भत्ते
निवड प्रक्रिया (Selection Process
- Computer Based Test (CBE)
- Skill Test आणि Document Verification
Skill Test हा Qualifying असेल. अंतिम मेरिट फक्त CBE स्कोअरवर आधारित असेल.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू: 16 जुलै 2025 (सकाळी 10:00 वाजता)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2025 (रात्री 11:45 वाजता)
- CBE परीक्षा (अनु. तारखेचा उल्लेख प्रवेशपत्रात): सप्टेंबर 2025
OFFICIAL PDF DOWNLOAD
अर्ज कसा करावा?
अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातूनच करावा:
🔗 https://careers.bhel.in
एक उमेदवार फक्त एका युनिट व एका ट्रेडसाठीच अर्ज करू शकतो.
महत्वाच्या सूचना
- BEST APPRENTICE / RUNNER-UP ला थेट Skill Test साठी बोलावले जाईल
- सर्व पात्रता निकषांचे पालन करणे गरजेचे
- परीक्षा बहुभाषिक (हिंदी / इंग्रजी / प्रादेशिक भाषा) असणार
- सर्व दस्तऐवज ऑनलाईन अर्जासोबत सादर करणे आवश्यक