Pushpa – the rise हा सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी चित्रपट रिलीज झाला होता. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून आणि अभिनेत्री रशमिका मंधना या दोघांच्या प्रमुख भूमिकेत दिसून आले होते. 2021 ला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा निर्माण केला होता. 179 मिनिटे चालणारा सिनेमा याने जवळपास 400 कोटी रुपयांची बॉक्सऑफिसवर कमाई केली होती . त्याचाच दुसरा भाग म्हणून Pushpa 2 – the rule हा पुढचा भाग 5 डिसेंबर 2024 ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने तर संपूर्ण देशात अगदी धुमाकूळ घातलाय. याने जवळपास सर्वच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडलेत.
pushpa 2 चित्रपटाच्या प्रीमियर साठी आलेल्या अल्लु अर्जून ने हैद्राबाद मधे एक चित्रपट गृहामध्ये एन्ट्री केली आणि त्याला पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकानी खूप गर्दी केली. त्यातच चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्याप्रकरणी शुक्रवारी चिक्कडपली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली .
अल्लू अर्जून ल नेमक कोणत्या कलमांच्या आधारे अटक करण्यात आली .
हैद्राबाद मधे संध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला . रेवती असं त्या मृत महीलेच नावं होत. तिचा मुलगा देखील गंभीर पने जखमी झाला होता. तर हि गर्दी झाली होती अललू अर्जुनाच्या प्रीमियर शो मूळ आणि याच गर्दीत हे दुर्घटना घडली. हैदराबाद पोलिसांनी त्याला अटक करत कारवाई केली. अल्लू अर्जून ला अटक हि BNS सेक्शन 105 आणि कलम 118(1) इतरांच्या जीवाला हानी पोहचवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.
BNS 105
या सेक्शन नुसार दोषी ने गुन्हा हा हेतू ठेवून किंवा कसलाही विचार न करता केलेला असतो परंतु त्याला दोषी ठरवता येईल असे पुरावे नसतात. दोषीला शिक्षा हत्ये एवढी नाही दिली जात. जन्म ठेप नाहीतर मग 5 ते 10 वर्ष काळकोठडी असा शिक्षेच स्वरूप असत. मृत्यूस कारणीभूत असल्याचे सिद्ध झाले असता परंतु मृत्यू कोणत्याही हेतूने किंवा ठरवून नाही केला असा समोर येत असल्यास 10 वर्ष कारागृह आणि दंडाची शिक्षा आहे .
कलम 118 (1)
एखादी गोष्ट करताना त्याचा अर्थ काहीही चुकीचं करण्याचा नसतो परंतु त्यामाध्यमातून काहीतरी दोष घडून येत असल्यास ती व्यक्ती त्या गुन्ह्यासाठी जबाब असेल. याचाच अर्थ स्वतः तो गुन्हा केलेला नसतो परंतु तो गुन्हा होण्यामागे जेव्हा आरोप करण्यात येत आहेत त्या व्यक्तीचा हात आहे असे सिद्ध होत असल्यास हे कलम त्या व्यक्तीवर ती लागू होते. अल्लू अर्जुन ने देखील स्वतःहून गुन्हा केलेला नाही परंतु त्याच्यामुळे झालेल्या गर्दीमुळे मृत व्यक्तींना आपले प्राण घालवावे लागले आणि एक प्रकारे अल्लू अर्जुन हा या कलमाच्या आधारे गुन्हेगार झाला असल्याचे या कलमाद्वारे सिद्ध होते.
अशा या २ कलमांच्या आधारे त्याला अटक केली. या सर्व गोष्टीमागे काय प्रकरण आहे नेमक कशामुळ आणि की घडल होत. तर झालं असं की 5 डिसेंबर रोजी बहुचर्चित पुष्पा 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यासाठी चाहत्यांची पाहण्यासाठी खूप गर्दी झाली होती. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे किती तरी प्रीमियर झाले. त्या प्रीमियर ची तिकिटे पैसे वाढवून ब्लॅक ने विकण्यात आली होती. हैदराबाद येथील संध्या थिएटर येथे पुष्पा या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. त्या प्रीमियर ला अपेक्षित अशी गर्दी पण झाली होती. हि सगळी गर्दी झाली होती ती फक्त allu arjun ला बघण्यासाठी त्याला भेटण्यासाठी त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी.
परंतु झालं असं की allu arjun नच शो मधे अचानक आला. त्यानं असं येण्याबाबत काहीही पूर्व सूचना दिल्या नव्हत्या असं सांगण्यात येतंय. शो च नियोजन फक्त त्याला मोठ्या पडद्यावर बघण्याच येवढाच होत परंतु त्याने अचानक आल्याने प्रेक्षकांची खूपच गर्दी झाली. आणि झालेल्या गर्दी वरती तेथील प्रशासनाकडून कसल्याही प्रकारचे ताबा ठेवण्यात आलेला नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्व कल्पना न देता आल्यामुळे ही गर्दी झाली आणि या गर्दीवरती ताबा ठेवण्यासाठी यंत्रणा अपुरी पडली आणि कसले प्रकारचे गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठीचे नियोजन करण्यात तेथील प्रशासन अयशस्वी ठरले.
त्यामधे तो शो पाहण्यासाठी एक कुटुंब आलं होतं. (39) वर्षाच्या रेवती त्यांचा नवरा भास्कर आणि त्यांची शिरीतेज व सावलिका या त्यांच्या मुलांसोबत ते आले होते. जेव्हा तिथे Allu Arjun ची एन्ट्री झाली तेव्हा तिथे जमलेल्या प्रश्नांनी एकाच दिशेने धावपळ सुरू केली आणि त्यातच हे कुटुंब वेगवेगळी कडे गेलं. रेवती आणि तिचा मुलगा हे चेंगरा चेंगरित खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून CPR दिला परंतु काहीच फरक पडत नव्हता त्यामुळं त्यांना जवळच्या विद्यानगर च्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी चेक करून रेवतीला मृत्यू घोषित केलं आणि मुलाला गंभीर जखमी झाले असा पोलिसांना सांगितले.
10:30 पर्यंत हा सगळा प्रीमियर चा कार्यक्रम झाला. नंतर Allu Arjun ने गाडीच्या काचेतून बाहेर येऊन प्रेक्षकांना बाजूला होण्याची विनंती केली . या सगळ्यांवर प्रेक्षकांकडून आणि थिएटर च्या मॅनेजमेंट कडून खूप रोष व्यक्त करण्यात येतोय. कारण त्यानं तो येणार असा पूर्व कल्पना दिलेली नव्हती त्यामुळे गर्दी मॅनेजमेंट जमल नाही. त्यामुळे तेथील लोकांची खूप धावपळ झाली .
Allu Arjun च काय चुकल :-
Allu Arjun ने काहीही पूर्व कल्पना न देता अचानक आल्याने प्रेक्षकांची धावपळ झाली त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्याने थिएटर मॅनेजमेंट ला किंवा पोलिस प्रशासनाला कसलीही पूर्व कल्पना दिलेली नव्हती. तसेच त्याच्या सुरक्षा रक्षक यांनीही सुरक्षिततेची कसलीही काळजी घेतली नाही त्यामुळे हे दुर्घटना घडली. Allu Arjun जर पूर्व कल्पना देऊन आला असता तर मॅनेजमेंट ला त्यापद्धतीने नियोजन करता आलं असत. गर्दी च नियोजन करता आलं असतं. पोलिस प्रशासनही त्याप्रमाणे नियोजनात असल असत . आणि हे अशा प्रकारची घटना शक्यतो घडलीच नसती. त्यामुळे पोलिसांनी Allu Arjun त्याची पुष्पा टीम आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर कारवाई केली आहे. त्याबाबतीत पोलिसांनी FIR दर्ज केला आहे .
Allu Arjun ने आपले नाव FIR मधून कमी करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ती याचिका अजून सुनावणी पर्यंत आली नसल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलं . त्यानंतर त्याला शनिवारी सकाळी जामिनावर सुटका झाली. मग आता प्रश्न येतो की अल्लू अर्जुन ना अटक करण्यामागे नेमका कोणाचा?. काहींच्या मते असेही सांगण्यात येते की अल्लू अर्जुन अटक करण्यामागे खूप मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे चर्चा देखील प्रसारमाध्यमांच्याद्वारे पसरत चाललेले आहेत. आंध्र प्रदेश मधील राजकारणाचा परिणाम हा तेलंगणा राज्यामधील हैदराबाद मध्ये आलेल्या अल्लू अर्जुन वरील अटके वरती झाल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच अल्लू अर्जुन नाटकी सूड या भावनेने करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अल्लू अर्जुनला अटक करण्यामागचे राजकारण?
हृदया सर्वांमध्ये तेलंगणाचे राज्याचे मुख्यमंत्री रेवणथु रेड्डी यांनी स्पष्ट सांगितले की संविधानामध्ये दिलेल्या कायद्यानुसार घडलेल्या घटनेमध्ये जर कोणी दोषी ठरत असल्यास आणि जर का गुन्हा सिद्ध होत असल्यास त्यावरती देशामध्ये असलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे विधान ते तेलंगणा मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. प्रसार माध्यमांच्या माध्यमातून अशाही बातम्या उठत आहेत की अल्लू अर्जुन आणि आंध्र प्रदेश मधील राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री असलेले चंद्राबाबू नायडू आणि अभिनेता आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्याशी चांगले संबंध असल्याकारणाने तेलंगणा राज्यामधील हैदराबाद मध्ये आलेल्या अल्लू अर्जुन वरती सुडेच्या भावनेने अटकेचे कट कारस्थान केल्याचे देखील सांगण्यात येत आहे. परंतु या सर्व बातम्यांवरती किती तथ्य आणि सत्य आहे हे सध्या तरी स्पष्ट होत नाही.