---Advertisement---

जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे पर्यटकांवरती अतिरेक्यांकडून अंधाधुंद गोळीबार PAHALGAM TERRORIST ATTACK

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
PAHALGAM TERRORIST ATTACK
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

PAHALGAM TERRORIST ATTACK

भारत देशातील जम्मू काश्मीरमधील पृथ्वीवरील स्वर्ग ओळखल्या जाणाऱ्या सुंदर अशा पर्यटन स्थळ पहलगाम येथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशभरातून तसेच जगभरामधून पर्यटक हे पहलगामचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी येत असतात. परंतु मंगळवारी पहलगाम येथील पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी हल्ला करून निष्पाप पर्यटकांना गोळ्या घालून ठार केले आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे भारताकडून वारंवार सांगण्यात येत आहे. Pahalgam terrorist attack झाल्यानंतर संपूर्ण देशभरात तसेच जगभरामधून की पडलेल्या पहलगाम येथील पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

भारतातील जम्मू आणि काश्मीर म्हणजे दहशतवादी हल्ला अतिरेकी हल्ला अतिरिक यांचे घुसखोरी बॉम्बस्फोट होणे हे अगदी साहजिकच मानले जाते परंतु मंगळवारी जे घडले ते खूपच दुःखद आणि त्रास देणारे होते. संपूर्ण देशभरामधून पर्यटक काश्मीर मधील पहलगाम या गावांमध्ये पर्यटनासाठी आले असता त्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या हल्ल्यामध्ये संपूर्ण देशभरातील विविध राज्यांमधून पर्यटक हे आपल्या कुटुंबीयांसोबत पहलगामचे सौंदर्य पाहण्यासाठी आलेले होते. विशेष म्हणजे अतिरेक्यांनी अचानक त्यांच्यावरती हल्ला सुरू केला आणि त्यामध्ये हल्ला करण्यापूर्वी पर्यटकांमध्ये हिंदू कोण कोण आहेत अशी विचारपूस करून फक्त हिंदूंना टार्गेट केलं गेलं. ही बाब खूप धक्कादायक आहे. हल्लेखोरांनी हल्ला करण्या अगोदर तुमच्या मध्ये हिंदू कोण आहेत असे विचारून फक्त त्यांनाच गोळी झाडून त्यांच्या हत्या केली आहे. त्यामध्ये काही नवविवाहित नवदांपत्य देखील होते.

अतिरेक्यांनी फक्त हिंदू पुरुषांना टार्गेट केले आहे महिलांना जिवंत ठेवले. या pahalgam terrorist attack मागचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आतापर्यंतच्या माहितीनुसार 25 ते 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील देखील दोन पर्यटकांचा समावेश आहे. यामध्ये तामिळनाडू कर्नाटक यादेखील राज्यामधील पर्यटकांचा समावेश आहे. तेथे झालं असं की मंगळवारी दुपारून अचानकपणे दोन ते तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारामध्ये काही जणांचा जागीच मृत्यू झाला तर काहीजण जखमी झालेत. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे मंत्री अमित शहा यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेतली. हा लाख पाकिस्तान कडूनच झाला असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. पाकिस्तानी लष्करांनी या हल्ल्याची पाकिस्तानचा कसलाही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या झालेल्या भयावह हल्ल्यामध्ये एका नवविवाहित दांपत्या मधून फक्त पुरुषाला गोळी घालून ठान करण्यात आले असल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल झालेला आहे त्यामध्ये आपल्या ठार झालेल्या पतीच्या शेजारी नववधू बसून स्तब्ध अवस्थेत असल्याचे पाहायला मिळाले. हे चित्र खूप काही सांगून जाते. अतिरेक्यांनी हल्ला करताना फक्त तुमचा धर्म कोणता एवढेच विचारले आणि हिंदू असणाऱ्या मूर्ती जागीच गोळी घालून त्यांना ठार केले. अतिरेक्यांच्या या हल्ल्यावरती संपूर्ण देश जगभरामधून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर अमेरिका रशिया अशा जगभरातील देशांमधून भारताला या हल्ल्यामधून बाहेर येण्यासाठी सांत्वन करण्यात येत आहे. या हल्ल्यामागे सूत्रधार हा पाकिस्तानचा आहे आणि पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू केले जात आहेत.

त्यांची कोंडी करण्यासाठी प्रथम पर्याय म्हणून मोदी सरकार करून सिंधू नदी कराराला सध्या स्थगिती देण्यात आलेले आहे. पाकिस्तानची 80 टक्के पाण्याची तहान भागवणारे जलस्त्रोत म्हणून सिंधू नदीची ओळख आहे जिचा उगम स्त्रोत हा भारतामधून होतो. सिंधू नदी करारानुसार पाकिस्तानला सिंधू नदीतून पाणी मिळते. आता याच सिंधू नदीच्या कराराला भारताकडून सध्या तरी स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या जनतेचे पाण्यासाठी हाल हाल होणार हे नक्कीच. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे म्हणाले की, पाकिस्तानला तुझ्या भाषेत समजतो त्याच भाषेत आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे.

या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील सीमेवरील वातावरण हे पूर्णपणे तणावपूर्ण झालेले आहे. आपले राष्ट्रीय परराष्ट्र मंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या 48 तासांमध्ये भारतामधील जे कोणी पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी 48 तासाच्या आत भारत देश सोडून जावावे असे आदेश जारी केले. त्याचबरोबर भारत पाकिस्तान बॉर्डर देखील बंद करण्यात आली. हा आदेश जारी होताच पाकिस्तानी नागरिकांची भारत देशांमधून पाकिस्तानमध्ये जाण्यासाठीची एकच धावपळ सुरू झाल्याची रेल्वे स्थानकावर ती पहायला मिळाले. भारताकडून पाकिस्तानला लोक प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य दलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली सुरू झालेले आहेत. भारतीय सैन्यामध्ये नवीन हवाई जहाजांची भरती देखील करण्यात आलेली आहे. आता यामध्ये पुढे चालून ही परिस्थिती किती प्रमाणामध्ये बिघडू शकते ही पाहण्याची बाब आहे.

---Advertisement---

Leave a Comment