India Top High Expensive Schools :

फार पूर्वी काळापासून भारत देशाला शिक्षणाची परंपरा लाभलेले आहे. यामध्ये लहान मुलाला एका ठराविक वयानंतर शिक्षण घेण्यासाठी त्याला शाळेमध्ये दाखल केले जाते. तिथून त्याच्या शिक्षणाची सुरुवात होते ती जोपर्यंत तो एखादी डिग्री हातामध्ये घेत नाही तोपर्यंत तरी कमीत कमी ती सुरूच राहते. आयुष्याची जवळपास 15 ते 20 वर्ष जास्तीत जास्त लोक हे आपले लहानपण शिक्षणामध्ये घालवतात. एवढी वर्ष घालवण्या मागचा उद्देश हा एकच असतो की पुढील जे काही आयुष्य असते ते या शिक्षणाच्या जोरावरतीच सोयीस्कर आणि सुखकर जाते. तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले आहे त्यावरतीच तुमच्या पुढील भविष्याचा पाया रचला जातो. परंतु आताच्या काळामध्ये high expensive school मधें मुलं शिकवण्यामध्ये पालकांचा भर आहे.
मग आता शिक्षणासाठी सुरुवातीच्या काळामध्ये गुरुकुल असायचे. त्यामध्ये गुरु कडून शिष्याला म्हणजेच विद्यार्थ्याला ज्ञान दिले जायचे आणि एक सुशिक्षित विद्यार्थी म्हणून पुढे चालून तोच विद्यार्थी समाजामध्ये चांगलं नाव कमवायचा आणि आपला आयुष्य सोयीस्कर बनवायचा. जसजसं काळ बदलत गेला तसतसं शिक्षण घेण्याची पद्धत देखील बदलत गेली. आताच्या काळामध्ये शिक्षण हे संपूर्णपणे पैशाच्या जोरावरती मिळवले जाते. आई वडील हे आपल्या मुलाला शिकवण्यासाठी शाळेची निवड करताना त्या शाळेची फी किती आहे यावरती ती शाळा किती चांगली असेल असा अंदाज लावतात. याचाच अर्थ भारतामध्ये देखील High extensive schools ला श्रीमंत लोकांकडून प्रथम प्राधान्य देण्यात येते.
ज्या Indian top high expensive schools मध्ये आपल्या मुलांसाठी चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि इतर सर्व कार्यक्रम जसे की शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या मुलासाठी सर्व गुण संपन्न होण्यासाठी च्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टी ज्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत अशा ठिकाणी म्हणजेचHigh expensive schools मद्ये त्यांचा प्रवेश करून त्यांना शिक्षण दिले जाते. तर आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात की भारतामधील सर्वात महागड्या शाळा कोणकोणत्या आहेत आणि त्या कोठे कोठे आहेत तसेच त्या शाळांसाठी किती फीज आकारली जाते ते देखील पाहूया.(India Top High Expensive Schools)
India Top High Expensive Schools
- wood stock school mussoorie
Indian top school मध्ये पहिले नाव येतं ते म्हणजे मसूरी मधील wood stock school mussoorie या शाळेचे. ही शाळा भारतातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. ही शाळा जवळपास 170 वर्ष जुन्या असून या शाळेचा परिसर हा 250 एकर इतका आहे.wood stock school mussoorie ही शाळा संपूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असून शाळेचा आजूबाजूचा परिसर हा निसर्गाने वेढलेला आहे. या शाळेसाठी देशातील श्रीमंत लोकांची मुले शिकण्यासाठी येतात तसेच काही परदेशातील देखील मुले शिक्षणासाठी या शाळेमध्ये येतात. या शाळेची स्थापना 1854 साली झालेली असून या शाळेमध्ये एका वर्षासाठीचा खर्च हा 15 ते 17 लाख रुपये इतका येतो.
2. THE DOON SCHOOL DEHRADUN
THE DOON SCHOOL DEHRADUN हे देखील भारतातील एक High Expensive Schools आहे. भारतामधील ही शाळा फक्त मुलांसाठी आहे या शाळेची स्थापना 1935 साली झाली आहे. या शाळेचा परिसर हा 72 एकर इतका आहे. Dehradun मधील ही शाळा निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि ही शाळा अशा ठिकाणी आहे जिथे पर्यटन स्थळ देखील आहेत. या THE DOON SCHOOL DEHRADUN मधें प्रवेशासाठी भारतीय विध्यार्थ्यांना 12,00,000 रुपये तर विदेशी विध्यार्थ्यांना 14,00,000 इतकी रक्कम मोजावी लागते. या शाळेमध्ये पूर्व पंतप्रधान राजीव गांधी तसेच ज्योतीरादित्य सिंधीया सारख्या मोठं मोठ्या घराण्यातील मुलांनी शिक्षण घेतले आहे.
3. SCINDIA SCHOOL GWALIOR
SCINDIA SCHOOL GWALIOR हे एक भारतातील शाही परिवारांसाठी आणि राजेशाही घराण्यातील मुलांच्या शिक्षणासाठी बनवण्यात गेलेले India Top High Expensive School आहे. हे फक्त मुलांसाठी आहे. यामध्ये राजेशाही मुलांसाठी शिक्षण दिले जाते आणि त्यासाठीच एका भव्य किल्ल्यामध्ये ही शाळा बनवण्यात आली आहे. SCINDIA SCHOOL GWALIOR ची स्थापना 1897 मध्ये केली गेली होती. ज्याचं नंतर पब्लिक स्कूल मधें रूपांतर करण्यात आले. या SCINDIA SCHOOL GWALIOR ची एका वर्षाची फीस 12 लाख रुपये इतकी आहे. या शाळेमध्ये mukesh ambani, salman khan यासारखे मोठं मोठे व्यक्ती शिकलेले आहेत.
4. MAYO COLLEGE AJMER
MAYO COLLEGE AJMER हे भारतातील राजस्थान मधील अजमेर ज़िल्हा्यामध्ये स्थित आहे. याची स्थापना 1872 लस झाली. या शाळेचा एकूण 183 एकर चा परिसर आहे. हे देखील देशातील India Top High Expensive School पैकी एक आहे. यासाठी ची एका वर्षाची फीस सांगायचं झालं तर भरतीय विद्यार्थ्यांसाठी 6.5 लाख तर परदेशीं विद्यार्थ्यांसाठी 12 लाख एवढी आहे. बॉलीवूड ऍक्टर विवेक ओबेरॉय याच शाळेचा माजी विध्यार्थी आहे.
5. ECOLE MONDIALE WORLD SCHOOL.
India Top High Expensive School पैकी ECOLE MONDIALE WORLD SCHOOL हे देखील एक आहे. या शाळेची स्थापना 2004 ला झाली आहे. या शाळेमध्ये मुंबईचे श्रीमंत लोकांचे मुलं मुली शिकतात. एका वर्षासाठी ECOLE MONDIALE WORLD SCHOOL मधें जवळपास 10 लाख रुपये मोजावे लागतात.