vantara jamnagar
नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एका गुजरात मधील प्राणीसंग्रहालयाचा व्हिडिओ व्हायरल होताना आपण सोशल मीडिया वरती पाहिला असेल. मोदी सिंहाच्या बचऱ्यासोबत खेळताना दिसले किंवा काचेमधून सिंह वाघ पाहताना त्या व्हिडिओमध्ये दिसत होते. ते प्राणी संग्रहालय म्हणजेच गुजरात मधील जमनागर येथील vantara zoo jamnagar. नरेंद्र मोदी यांनी याच vantara jamnagar च उद्घाटन केलं. अनंत अंबानी यांच्या या प्रोजेक्टसाठी गुजरात मधील जामनगर येथे जवळपास 3000 एकर एवढी जागा वापरण्यात आलेली आहे. ही जागा अनंत अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज ने 2014 साली विकत घेतलेली होती. Vantara zoo देशभरात नव्हे तर जगभरामधून प्राणी आणल्या जातात आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. यामध्ये वयोवृद्ध झालेले प्राणी, जखमा होऊन त्रस्त असलेले प्राणी आणले जातात.
त्यांच्यावर योग्य उपचार केला जातो त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची देखील चांगली काळजी घेतली जाते. जंगलामध्ये प्राणी आपल्या भोजनाची व्यवस्था शिखर करून करतात परंतु vantara jamnagar मध्ये त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे डायट प्लॅन नुसार केली जाते. प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जवळपास 500 डॉक्टर्स Vantara zoo jamnagar मध्ये आहेत. वन्य प्राण्यांना रिस्क्यू ऑपरेशन करून vantara jamnagar zoo मध्ये आल्यानंतर त्यांना पूर्णपणे जंगलात आहे असे फील होण्यासाठी तेथील वातावरण त्याप्रमाणे बनवण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या वरती उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींकडे अगदी बारकाईने लक्ष देण्यात आलेले आहे. मोठ्यातला मोठा प्राणी हत्ती त्याच्यापासून ते लहानात लहान प्राणी यांच्या सर्व उपायांची सोय ही केली गेली आहे.
vantara zoo :-
Vantara Zoo हे अनंता अंबानी यांनी उभारलेला एक सर्वात मोठा प्रकल्प आहे. एखादं प्राणी संग्रहालय म्हणजे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि कोणकोणत्या सरकारी खात्याकडून याची परवानगी घ्यावी लागते?. Vantara zoo बनवण्यासाठी अनंता मान्य यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली आहे?.
- सर्वात पहिल्यांदा vantara zoo च्या निर्माणासाठी अनंत अंबानी यांनी central zoo authority (CZA) म्हणजेच केंद्रीय चिडियाँघर प्राधिकरण ची परवानगी घ्यावी लागते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले आहे की एखाद्या प्राणी संग्रहालय तयार करताना CZA ची परवानगी घ्यावीच लागते.
- CZA एखाद्या प्राणी संग्रहालयाला परवानगी देताना तेथील सर्व बाबींची चाचणी करते, जसे की प्राणी संग्रहालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे का, तेथील आजूबाजूचे वातावरण आणि प्राण्यांसाठी पोषक आहे का, प्राणी संग्रह मध्ये पाण्यासाठी उपचाराचे आणि जेवणाची व्यवस्था आहे का अशा सर्व गोष्टींची चौकशी cza करून केली जाते.
- अशा पद्धतीच्या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच परवानगी दिली जाते.
परंतु आनंदा यांनी प्राण्यांच्या हितासाठी बनवलेल्या vantara zoo या प्रकल्पावरती बऱ्याच जणांकडून टीका देखील करण्यात येत आहेत. काहींच्या मते अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहाने पैसे कमावण्यासाठी उभारला गेलेला आहे असे देखील म्हणण्यात आले. तर काहींच्या मध्ये व्यापारी संग्रहालयामध्ये आजारी असलेले किंवा उपचारासाठी प्राणी आणले जात नसून येथे अगदी धष्टपुष्ट प्राणी मानले जात असून त्या माध्यमातून पर्यटकांकडून पैसे वसूल केले जात आहेत. तसेच एखादा हत्ती जर vantara zoo मधे मेला तर त्याचे दात हे विकू शकतात ज्याची किंमत बाजारात खुप मोठी आहे. अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. हा प्राण्यांसाठी बनवलेला प्रकल्प सर्वसामान्य जनतेसाठी कधी खुला होणार आणि त्यासाठी ticket prise काय असेल?.
vantara ticket price
तर तुम्हाला जर का हा vantara zoo प्रकल्प पाहायचा असेल तर, हा प्रकल्प सध्या तरी फक्त प्राण्यांच्या समस्या आणि त्यांचा उपचार करण्यासाठी वापरला जातं आहे. सध्यातरी हा प्रकल्प पर्यटणासाठी खुला केलेला नाही. त्यामुळे vantara ticket price बद्दल कसलीही घोषणा अनंत अंबानी ग्रुप कडून केलेली नाही. परंतु भविष्यामध्ये हा vantara zoo पर्यटकांसाठी पाहायला भेटू शकतो. डिसेंबर 2024 पर्यंत या vantara zoo मध्ये 25000 प्राणी आहेत. यामध्ये 48 विविध प्रजातीचे प्राणी आहेत. Vantara zoo मध्ये प्राण्यांसाठी त्यांच्यावरील उपचारासाठी सुसाज्ज अशा इमारती आणि नवीन टेकनॉलॉजि वर आधारित सर्व उपकरण उपलब्ध आहेत.
अशा प्रकारचा हा भव्य दिव्य आणि सर्व यंत्रणांनी सुसज्ज असा असणारा vantara प्रकल्प हा संपूर्ण जगासाठी आधुनिकतेचे एक उदाहरण बनलेला आहे. हा प्रकल्प उभारण्या पाठीमागचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा मुख्य हेतू हा आहे की जगभरातून आणि देशातून प्राण्यांना झालेल्या जखमा आणि आजारावरती उपचार करणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्राण्यावरती यावंतारा प्रकल्पामध्ये अगदी मोफत उपचार केला जातो. उपचारादरम्यान त्याच्या खाण्यापिण्याची आणि त्याला जंगलापासून दूर असल्याची खंत जाणवू दिले जात नाही.
official site https://vantarajamnagar.in/