---Advertisement---

भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 21,413 जागांची भरती. कसल्याही प्रकारची परीक्षा नाही आणि शिक्षण फक्त दहावी पास. असा करा ऑनलाईन अर्ज.

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये 21,413 जागांची भरती. कसल्याही प्रकारची परीक्षा नाही आणि शिक्षण फक्त दहावी पास. असा करा ऑनलाईन अर्ज
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

पोस्ट ऑफिस भरती 2025 (Post Office Bharti 2025) :

भारतीय पोस्ट ऑफिस विभागामध्ये जवळपास 21 हजार 413 रिक्त पदांसाठीची भरती जाहीर करण्यात आलेले आहे. यावर तिच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मधील रिक्त पदांसाठीचे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी कसल्याही प्रकारची Qualifying Exam नसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का फक्त दहावी पास असाल तर या पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी अर्ज करू शकता आणि केंद्रशासनाच्या पोस्ट विभागामध्ये काम करण्याची संधी मिळू शकतात.

या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन रित्या अर्ज भरायचा आहे आणि त्या अर्जासाठी काय काय कागदपत्रे लागतात तसेच कुठे ऑनलाईन अर्ज करायचा त्याची मिरीट किती लागेल, परीक्षा होणार का, कोण कोण या पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी फॉर्म भरू शकतो, या post office bharti 2025 साठी किती fees भरावे लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या पोस्ट मधून भेटून जाईल.

GRAMIN DAKSEVAK BHARTI 2025 :

सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्या आणि सरकारी नोकरी मिळण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस मधील ग्रामीण डाक सेवक या पदासाठीची बिना परीक्षेची नोटिफिकेशन iIndian Post Department कडून जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या दहावीच्या मार्क वरून पोस्ट भरती 2025 साठी Merit list लागणार आहे. पोस्ट खात्याकडून काढण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार भारतीय पोस्ट विभागामध्ये Gramin Daksevak (GDS) या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तू ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईट वरती जाऊन करायचा? त्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता तुम्हाला लागणार आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख किती? जगामध्ये काही दुरुस्ती असल्यास ते दुरुस्ती करण्याची तारीख किती? या सर्व गोष्टींचा आढावा खालील दिलेल्या माहितीच्या च्या माध्यमातून पाहूया.

पोस्ट ऑफिस भरती 2025 ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख(Post Office bharti 2025 online applicationDate) :

  • पोस्ट विभागातील डाग सेवक या पदासाठीच्या भरतीसाठी तुम्हाला 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी ची मुदत देण्यात आलेली आहे.
  • तसेच तुम्ही केलेल्या अर्जामध्ये काही दुरुस्ती करायचे असल्यास त्यासाठी 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 दरम्यान तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता.

वरील दिलेल्या ऑनलाईन अर्ज सुरू तारीख आणि ऑनलाईन अर्ज शेवट तारीख या दोन तारखेच्या मध्येच तुम्हाला पोस्ट भरती 2025 साठी ऑनलाईन एप्लीकेशन करायचे आहेत. आणि काही दुरुस्ती असल्यास देखील ६ मार्च ते 8 मार्च या तीन दिवसांमध्ये अर्ज दुरुस्ती करून पुन्हा एकदा सबमिट करायचे आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2025 मार्फत कोणकोणती पदे भरली जाणार :

पोस्ट ऑफिस भरती 2025 च्या माध्यमातून खालील प्रकारची पदे भरली जाणार आहेत,

  1. BRANCH POST MASTER (BPM)
  2. ASSISTANT BRANCH POST MASTER (ABPM)
  3. DAAK SEVAK

अशा प्रकारची तीन महत्त्वाचे पद पोस्ट ऑफिस भरती 2025 च्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी वेतनश्रेणी (Post Office Bharti 2025 Salary Structure):

तर मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी निवडले गेलेल्या उमेदवारांना कामावरती रुजू झाल्यानंतर खालील प्रमाणे वेतनश्रेणी भेटणार आहे. मिळणारी वेतनश्रेणी ही तुम्ही कोणत्या पोस्टसाठी निवडले गेले आहात यावरती अवलंबून आहे.

  1. BRANCH POST MASTER (BPM) Salary Structure या पदासाठी तुम्हाला12,000/- ते 29,380 /- रुपयांपर्यंत वेतनश्रेणी मिळणार आहे
  2. ASSISTANT BRANCH POST MASTER (ABPM) आणि DAAK SEVAK या दोन्ही पदासाठी तुम्हाला 10,000/- ते 24,470/- रुपयांपर्यंत वेतनश्रेणी मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस भरती 2025 वयोमर्यादा (POST OFFICE BHARTI 2025 AGE LIMIT ):

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते जास्तीत जास्त 40 वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता. व यामध्ये सवलत ही काही ठराविक जातीच्या उमेदवारांना भेटणार आहे ती खालील प्रमाणे,

Sr . No Category Age relaxation
01.SC/ST 5 वर्षापर्यंत
02.OBC (Other Backward Class)3 वर्षापर्यंत
03.Economically Weaker Section (EWS) वयामध्ये सूट नाही
04.PWD (Person with Disabilities )10 वर्षांपर्यंत
05.PWD + OBC 13 वर्षांपर्यंत
06.PWD + SC/ST 15 वर्षांपर्यंत
07.General वयामध्ये सूट नाही
755

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता (Post Office Bharti 2025 Education Qualification )

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी पास असण्याचे बोर्ड सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असाल आणि तुमच्याकडे कसल्याही प्रकारची डिग्री नसेल तरी देखील तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण असल्याच्या आधारावर या पोस्ट विभागातील भरतीसाठी अगदी सहजरित्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि लागणाऱ्या मेरिट लिस्ट मधून तुम्ही नोकरी मिळवू शकता.

  • पोस्ट विभाग भरती 2025 साठी शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी उत्तीर्ण.

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी निवड (POST OFFICE BHARTI 2025 selection Criteria )

पोस्ट ऑफिस भरती 2025 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ही त्यांच्या दहावीला मिळवलेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. म्हणजेच तुम्हाला जेवढे जास्त गुण असतील त्याप्रमाणे तुमचे मिरीट लिस्ट मधील निवड होण्याची शक्यता वाढणार आहे.

POST OFFICE BHARTI 2025 ONLINE APPLICATION :

या पोस्ट विभागातील भरतीसाठी तुम्हाला खाली स्टेपच्या माध्यमातून फॉर्म भरायचा आहे,

  1. सर्वात प्रथम तुम्हाला https://indiapostgdsonline.gov.in या दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्ही थेट पोस्ट विभागाच्या ऑफिशियल होमपेज वरती जाल.
  2. विभागामध्ये महाराष्ट्र हे सिलेक्ट करा त्यानंतर सर्कल साठी किती जागा आहेत हे देखील तुम्ही तिथून”View post ” या पर्यायावर क्लिक करून पाहू शकता आणि त्यानुसार सर्कल सिलेक्ट करा.
  3. अर्ज करण्यासाठी चार स्टेप्स दिलेल्या आहेत, पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे. यासाठी तिथे दिलेल्या रजिस्ट्रेशन या पर्यायावर ती क्लिक करा. त्यानंतर तुमची प्राथमिक माहिती भरण्यासाठी ची रिक्त जागांचे पेज तुमच्यासमोर येईल त्यामध्ये तुमचा व्हॅलिडीटी मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि दिलेली सर्व माहिती अचूक रित्या भरा. शेवटी सबमिट बटनावरती क्लिक करा.
  4. पुढे तुम्हाला तुमच्या प्रायमरी लँग्वेज बद्दल विचारले जाईल महाराष्ट्रासाठी तुम्ही मराठी ही लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही आतापर्यंत कुठे काम करत आहात का हे देखील विचारले जाईल तुम्ही करत असाल तर एस आणि कुठे हि माहिती तिथे टाकायची आहे.
  5. तेथेच तुम्हाला तुमचा 50 kb साईज असलेला फोटो अपलोड करायचा आहे. असेच 20 kb पर्यंत साईज असलेले सिग्नेचर अपलोड करायची आहे. सर्व माहिती अचूक भरल्यानंतर Preview या पर्यायावर क्लिक करून सर्व माहिती बरोबर आहे का हे पहा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमच्या रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्याचा मेसेज आणि तेथे तो मला तुमचा अर्ज क्रमांक मिळेल तो अर्ज क्रमांक तुम्ही कॉपी करून ठेवायचा आहे.
  6. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रियेकडे जायचे आहे. तुम्ही कोणत्या सर्कल साठी अप्लाय करत आहात ते पहिल्यांदा निवडायचे आहे आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुमचा परमनंट ऍड्रेस विचारला जाईल तुमच्या आधार कार्ड प्रमाणे तुमचा “Permenant Address” तिथे टाका आणि त्यानंतर खाली दिलेल्या रकान्यांमध्ये तुम्हाला मिळालेल्या दहावी परीक्षा मध्ये गुणांबद्दलची माहिती तेथे व्यवस्थितरित्या भरा.
  7. त्यानंतर पुढील पानावरती तुम्हाला “Preferences ” बद्दलची माहिती भरायचे आहे तुम्ही कोणत्या जागेवरती काम करण्यासाठी इच्छुक आहात त्याबद्दलची माहिती तिथे टाका आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
  8. शेवटचा पर्याय आहे तो म्हणजे पेमेंट करण्याचा. महिला उमेदवारांना आणि Sc /ST उमेदवारांना कसल्याही प्रकारची फी नसणार आहे त्यामुळे अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रत काढता येणार आहे. तसेच जे कोणी उमेदवार “Open Category” मधून अर्ज करतील त्यांना 100 रुपयांचं पेमेंट हे ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा अर्ज हा पूर्णपणे सबमिट झालेला असेल आणि त्याची एक प्रत काढून तुमच्या सोबत ठेवायचे आहे.

अशाप्रकारे वरील काही स्टेपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा पोस्ट ऑफिस भरती 2025 साठीचा अर्ज सहजरित्या ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या भरू शकता. त्याचप्रमाणे या भरतीसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट ही अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपासून काही दिवसानंतर कळवण्यात येईल.

---Advertisement---

Leave a Comment