दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 :-
नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये सलग दहा वर्ष दिल्ली वरती एक हाती सत्ता मिळवून राज्य करत असलेल्या आम आदमी पार्टी या पक्षाला दिल्लीच्या जनतेने नाकारले आहे. 8 फेब्रुवारी 2025 रोजी लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालावरून संपूर्ण देशासमोर हे स्पष्ट झाले की दोन दशके सत्ता गाजवणाऱ्या माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आणि अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आम आदमी पार्टी या दोघांना दिल्लीच्या जनतेने पुन्हा एकदा सरकार बनवण्यापासून लांब ठेवले आहे. यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे भाजप या पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये दिल्लीच्या जनतेने पूर्ण बहुमत देत त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिलेली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 निकाल https://results.eci.gov.in/ResultAcGenFeb2025/statewiseU053.htm

अरविंद केजरीवालांना दिल्लीच्या जनतेने नाकारले :
नुकत्याच लागलेल्या 8 फेब्रुवारी 2025 ला दिल्ली विधानसभा निवडणुका निकालानंतर जवळपास संपूर्ण देशभरामध्ये सर्वांना धक्काच बसला. कारण दिल्ली म्हणजे अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल म्हणजे दिल्ली आणि त्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष गेले दहा वर्षे दिल्लीच्या राजकारणामध्ये अगदी पूर्ण बहुमताने तळ ठोकून आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी दिल्ली हे अगदी आपला बालेकिल्ला बनवला होता. गेले दहा वर्षे अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष मिळून दिल्लीच्या विधानसभा निवडणुका जिंकत आलेले असून त्यांचे सरकार तेथे कार्यरत होते. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या जनतेसाठी विशेषता महिलांसाठी आणि शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीसाठी अरविंद केजरीवाल यांनी अनेक विविध सरकारी योजना राबवल्या होत्या. जसे की दिल्लीमध्ये महिलांना बसचा प्रवास मोफत.
बारा वर्षे दिल्ली विधानसभा आम आदमी पार्टीकडे असण्याची कारणे :
दिल्ली शहरांमधील शाळा या खाजगी शाळेप्रमाणे सुशोभित आणि तितक्याच ताकतीने शिक्षण देखील देणाऱ्या बनवल्या होत्या. या विद्यार्थ्यांना प्रदेशांमध्ये शिक्षण करण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये विशेष योजनांच्या माध्यमातून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पाठवले जात होते. अशा प्रकारच्या जनतेला सुख भोगवता येणाऱ्या योजना या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारकडून राबवल्या जात असताना देखील दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी पक्ष सहित स्वतः दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील दिल्लीच्या विधानसभा निवडणुका 2025 च्या माध्यमातून पूर्णपणे नाकारले आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला दिल्लीमध्ये सरकार बनवण्यापासून दूर ठेवले आहे.
- दिल्लीच्या जनतेला 100 युनिट पर्यंत वीज मोफत.
- वीस हजार लिटर पर्यंत दरमहा पाणी मोफत.
- दिल्लीच्या महिलांना बस सेवा मोफत.
- त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशामध्ये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आखलेले योजना.
तर आपण या पोस्टच्या माध्यमातून हे पाहणार आहोत की सलग दोन दशके दिल्लीच्या विधानसभेमध्ये एकहाती सत्ता गाजवणारी आम आदमी पार्टी ही आताच्या झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2025 मध्ये कोणत्या कारणांमुळे पराजित झाली. तसेच तब्बल 27 वर्षानंतर भाजपला दिल्लीच्या विधानसभेवरती आपली सत्ता मिळवण्यामध्ये यश मिळाले आहे ते कोणत्या कारणांमुळे मिळाले? हे देखील आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव कसा काय झाला आणि त्यांचा पराभव कोणी केला या पाठीमागची सविस्तर कारणे आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहूया.
आम आदमी पार्टीचा दिल्ली विधानसभेमध्ये आतापर्यंतचा इतिहास :
- 2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला 70 पैकी 28 जागांवरती यश मिळाले होते.
- त्यानंतर झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुका 2015 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी पक्षाला दिल्लीच्या जनतेने 70 पैकी 67 जागांवरती आमदार निवडून दिले होते.
- मागील झालेल्या निवडणुका मध्ये म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला 70 पैकी 62 जागा निवडून आणण्यामध्ये यश मिळाले होते.
- आणि आत्ता नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी पक्षाला 70 पैकी अवघ्या 22 जागांवरती समाधान मानावे लागलेले आहे. हा आतापर्यंतचा आम आदमी पार्टी या पक्षाला बसलेला सर्वात मोठा धक्का असे मानले जाते.
दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल यांना नाकारण्याची कारणे :
अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते असून ते 2023 पासून ते जानेवारी 2025 पर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री देखील होते. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष सध्या पंजाब या राज्यांमध्ये देखील सत्तेमध्ये आहे. परंतु फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये केजरीवाल यांना आणि त्यांच्या पार्टीला पराभव पत्करावा लागलेला आहे तो खालील कारणांमुळे,
- निवडणुकीपूर्वी पक्षांमध्ये झालेली तफावत :
तसं बघायला गेलं तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये अपयश मिळण्याची खूप सारी अशी कारणे सांगण्यात येत आहेत परंतु त्यातील प्रमुख कारण म्हणजे काय निवडणुकीच्या तोंडावरती पक्षांमधील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाला दिलेली सोडचिट्टी. अरविंद केजरीवाल यांना एका घोटाळ्यामध्ये जेलमध्ये जावे लागले होते. तेव्हा देखील त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता जेलमधूनच दिल्लीचा कारभार चालवण्याचे ठरवले होते. त्यांच्या या निर्णयावरून आम आदमी पार्टी या पक्षातील काही दिग्गज नेते हे नाराज होते. त्यामुळे त्याने त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला. आणि यामुळेच भाजप या पक्षाला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला हरवण्यामध्ये यश मिळाले असे सांगण्यात येते.
अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमधून सुटून बाहेर आले तेव्हा त्यांनी आपल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि अतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरती बसवलं. अरविंद केजरीवाल यांच्या या निर्णयामुळे देखील त्यांच्या पक्षामधून विरोध होत होता.
2. दिल्लीमधील वाढतो प्रदूषण आणि दूषित पाणी:
अरविंद केजरीवाल यांच्या हातामध्ये बारा वर्ष दिल्लीच्या जनतेने सत्ता दिली होती या बारा वर्षांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी बऱ्याच योजना दिल्लीच्या जनतेसाठी आणल्या होत्या परंतु त्याचबरोबर दिल्लीच्या जनतेच्या आरोग्य विषयक समस्या वरती अरविंद केजरीवाल यांच्या सरकारकडून दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे आणि यामुळे देखील दिल्लीच्या जनतेने आम आदमी पार्टी पक्षाला विधानसभा निवडणुका 2025 मध्ये नाकारले. दिल्लीमधील वाढते प्रदूषण, प्रदूषित पाणी आणि प्रदूषित हवा या गोष्टींवरती आम आदमी पार्टी या पक्षाला आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तोडगा काढता आलेला नसल्यामुळे याच गोष्टीचा फायदा भाजप या पक्षाने घेत दिल्लीच्या जनतेची मने जिंकली आणि एक हाती सत्ता देखील मिळवली. भाजप या पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये 70 जागांपैकी 48 जागांवरती यश मिळवत संपूर्ण बहुमत मिळवलेले आहे.
3. काँग्रेसने घेतलेला बदला :
2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुका मध्ये आम आदमी पक्षाला 28 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस या पक्षाला आठ जागा मिळालेल्या होत्या. तेव्हा अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसच्या पाठिंबामुळे पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरती विराजमान होता आले होते. परंतु हरियाणा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आम आदमी पार्टी सोबत युती करू इच्छित असताना देखील आम आदमी पार्टीने काँग्रेस सोबत केली नव्हती. त्याचबरोबर आता झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये देखील काँग्रेस हा आम आदमी पार्टी सोबत युती करण्यासाठी इच्छुक होता परंतु आमदनी पार्टी कडून असे सांगण्यात येत होते की, ” आम्हाला दिल्लीमध्ये सत्ता आणण्यासाठी गरज नाही.” याच फक्त यामुळे काँग्रेसचे देखील आम आदमी पार्टीला दिल्लीच्या सत्तेपासून हटवण्यासाठी कंबर कसली होती. आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान नावांनी पार्टीच्या भ्रष्टाचारावरती जोरदार हल्लाबोल केला होता.
4. आम आदमी पार्टीच्या नेत्यांवरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप :
निवडणुका या अगदी जवळ येत असताना अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकण्यात आले. तसेच आम आदमी पार्टीच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जोरदार हल्लाबोल देखील केला जात होता. दिल्लीच्या जनतेच्या मनामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण झाला की आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केलेला असावा आणि याचाच फायदा भाजप या पक्षाला झाला आणि आवाज मी पार्टीला सत्तेपासून वंचित राहावे लागले.
अशा प्रकारचे वरील काही प्रमुख कारणे ही आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांना दिल्ली विधानसभा निवडणुका 2025 मध्ये दिल्लीमध्ये सत्ता न मिळवण्याची सांगण्यात येत आहेत.