---Advertisement---

शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य. असे काढा आपले शेतकरी फार्मर आयडी कार्ड

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

फार्मर आयडी कार्ड 2025 :

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने आत्ताच एक नवीन शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी एका पोर्टलच्या माध्यमातून फार्म्स मागवायला सुरुवात केलेले असून. त्या फार्मर आयडी कार्डद्वारे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ही त्या एका कार्डमध्ये असणार आहे. शेतकरी फार्मर आयडी कार्ड मध्ये शेतकऱ्याच्या शेत जमिनी बद्दल संपूर्ण माहिती असणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत आणि राज्य सरकार मार्फत जो काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी दिला जातो तो निधी देखील हे कार्ड म्हणजेच शेतकरी फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मार्फत सहा हजार रुपये दिले जातात.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे देखील राज्य सरकारने ठरवलेल्या काही नियमाने अटींच्या मध्ये जे शेतकरी बसतात त्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजेच केंद्र सरकारतर्फे 6000 आणि राज्य सरकारतर्फे 6000 अशाप्रकारे दरवर्षी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास 12 हजार रुपये मिळतात. हा जो काही सरकारतर्फे निधी मिळतो हा निधी अजूनही पुढे मिळवायचा असेल तर शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढणे अनिवार्य आहे. शेतकरी फार्मर आयडी कार्डद्वारे सरकार करून येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ घेणे हे अगदी सोपं होणार आहे. त्यामुळे फार्मर आयडी कार्ड काढणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.

मग या फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी शेतकऱ्यांना कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लाभणार आहे? हे आयडी कार्ड काढण्यासाठी कोणत्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे? हे आयडी कार्ड काढण्यासाठी काही शुल्क आहे का? या सर्व गोष्टींची माहिती आपण या पोस्टाच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला पाहूया शेतकरी फार्मर आयडी कार्ड कसे काढावे आणि त्यासाठीचे रजिस्ट्रेशन कसे करावे?. तर सर्वात प्रथम जाणून घेऊया शेतकरी फार्मर आयडी कार्ड नेमक्या आहे तरी काय आणि शेतकरी फार्मर आयडी कार्ड द्वारे तुम्हाला कोण कोणत्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

किसान फार्मर आयडी कार्ड आहे तरी काय :

किसान फार्मर आयडी कार्ड हे एक डिजिटल आयडी कार्ड असून या आयडी कार्ड मार्फत शेतकऱ्यांना एक एनरोलमेंट नंबर आणि एक कार्ड मिळते. त्या फार्मर आयडी कार्ड मध्ये शेतकऱ्याची स्वतःची सर्व माहिती तसेच त्याच्या नावावर किती जमीन आहे याबद्दलची माहिती आणि शेतकऱ्याला घेता येणाऱ्या योजना बद्दलची माहिती देखील त्या कार्डमध्ये उपलब्ध असते. आतापर्यंत शेतकऱ्यांना एखाद्या योजनेसाठी लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रत्येक वेळी साठी वेगवेगळ्या फॉर्म भरावा लागत होता अनेक प्रत्येक फॉर्मसाठी वेगवेगळे कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांची खूप धावपळ होत होती परंतु आता या येणाऱ्या शेतकरी आयडी कार्ड मुळे ती धावपळ पूर्णतः कमी होणार आहे. या फार्मर आयडी कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची माहिती देखील दर्शवण्यात येणार आहे.

शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे :

तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढायचे असेल तर खालील कागदपत्रे तयार ठेवा.

  • शेतकऱ्याचे संपूर्ण नाव असणारे आधार कार्ड.
  • शेतकऱ्याच्या नावावरती असणारा 7/12 उतारा.
  • आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर. शेतकऱ्याला शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी त्याचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणे खूप गरजेचे असणार आहे. फार्मर आयडी कार्ड काढताना त्यावरती दोन ते तीन प्रकारचे ओटीपी येतात.
  • शेतकरी फार्मर आयडी काढताना शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. (SC/ST/OBC).
शेतकरी फार्मर आयडी कार्ड ऑनलाइन पद्धतीने असे काढा :

शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी खालील स्टेप चा वापर करा आणि अगदी सोप्या पद्धतीने आपले फार्मर आयडी कार्ड काढून घ्या.

  1. सर्वात प्रथमhttps://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/# या दिलेल्या लिंक वरती क्लिक करा यानंतर तुम्ही थेट फार्मर आयडी काढण्यासाठीच्या लॉगिन पेज वरती पोहोचून जाल.
  2. ते गेल्यानंतर तुम्हाला समोर ऑप्शन दिसेल “Login with CSC” ज्यांच्याकडे CSC पासवर्ड आहे त्यांनी तो टाकून लॉगिन करायचे आहे.
  3. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला समोर एक पेज येईल यावरती “Authentication”असे लिहिलेले असेल. तेथे तुम्ही दोन पद्धतीने तुमच्या आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता जसे की फिंगरप्रिंट थांबा एक्सेस किंवा तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी द्वारे.
  4. समोरच तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी दिलेल्या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करायचे आहे.
  5. व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला “Contact details” भरायचे आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी हा टाकायचा आहे. शेतकऱ्याचा ईमेल आयडी नसेल तरी काही हरकत नाही फक्त मोबाईल नंबर टाकला तरी चालेल.
  6. मोबाईल नंबर टाकल्यानंतर शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल ओटीपी तेथे सबमिट करून वेरिफाय या बटणावर क्लिक करायचे आहे.
  7. त्यानंतर शेतकऱ्याची आधार कार्ड शी जोडलेली सर्व माहिती समोर येईल जसे की शेतकऱ्याचे संपूर्ण नाव त्याचे वय त्याचा आधार कार्ड असणारा फोटो. तेथेच अजून एक ऑप्शन देण्यात आलेला असेल तो म्हणजे जात निवडण्याचा. तुम्ही जर का खुल्या प्रवर्गांमधील शेतकरी असाल तर तुम्हाला तेथे “General” हा ऑप्शन निवडायचा आहे.
  8. आणि अर्ज करणारा शेतकरी हा जर का SC/ST/OBC या प्रवर्गातील असेल तर त्याचा CAST CERTIFICATE नंबर हा खाली दिलेल्या रकान्यामध्ये टाकायचा आहे.
  9. त्यानंतर तिथे दिलेली रिकाम्या चौकटीत असलेली सर्व माहिती भरायचे आहे. आणि सबमिट या बटणावरती क्लिक करून नेक्स्ट पेज वरती जायचे आहे.
  10. तुमच्यासमोर “FARMER LAND DETAILS ” हे पेज येईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावावरती असलेला शेतीच्या सातबारा मधील गट क्रमांक हा टाकायचा आहे.
  11. ते करताना तुम्ही तुमच्या गावाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव त्यामध्ये ऍड करायचे आहे आणि तुमचा सर्वे नंबर टाकल्यानंतर तुमच्या नावावरती असणारी सर्व जमीन माहिती ही समोर येईल. ही माहिती भरून झाल्यानंतर पुढील पेज वरती जा.
  12. तेथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील आणि राखण्यामध्ये टिकमार्क करून ते पेज सबमिट करा. शेवटचा ऑप्शन उरतो तो म्हणजे “ई सिग्नेचर “करण्याचा.KYC हा ऑप्शन तुमच्यासमोर येईल आणि त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिले जातील बायोमेट्रिक आणि ओटीपी. तुम्ही दोन्ही पर्यायांचा वापर करून तुमचं केवायसी करून घेऊ शकता.
  13. सर्व टीव्ही हा पर्याय निवडला तर तुमच्या आदर्श लिंक असलेल्या मोबाईल वरती ओटीपी येईल तो ओटीपी तुम्ही तिथे टाकल्यानंतर तुमचं ई केवायसी हे पूर्ण होईल.
  14. इ के वाय सी केल्यानंतर तुम्हाला फार्मा सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक इनरोलमेंट आयडी नंबर हा मिळेल जो एनरोलमेंट इन आयडी नंबर वापरून तुम्ही तुमच्या किसान आयडी कार्डचा स्टेटस पाहू शकता.
  15. तुमचा किसन आयडी कार्ड तयार झाल्यानंतर तुम्ही ते पीडीएफ फाईल च्या माध्यमातून डाऊनलोड देखील करून घेऊ शकता किंवा ते तुम्हाला पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून घरपोच दिले जाईल.

तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर का महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असाल तर वरील दिलेल्या माहितीच्या आधारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुमचे किसान फार्मर आयडी कार्ड काढून घेऊ शकता. ही आयडी कार्ड काढण्यासाठी ची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 जानेवारी 2025 च्या अगोदर किसान फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचे आहे. 31 जानेवारी 2025 च्या नंतर सरकारकडून अजून मुदतवाढ देण्यात येईल का नाही याबद्दलची कसल्याही प्रकारची माहिती सध्या समोर आलेले नसून दिलेल्या वेळेमध्ये शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढून घ्यावे.

---Advertisement---

Leave a Comment