महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार का?
महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 26 जिल्हे विभाजित करण्यात आलेले होते. 1960 नंतर लोकसंख्या वाढत गेली आणि विकास होण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी नवीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती होत गेली. शेवटी 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे तयार करण्यात आले. तसेच आता एका नवीन जिल्ह्याची 26 जानेवारी 2025 या दिवशी घोषणा होणार असल्याची पक्की खबर समोर आलेले आहे. तो नवीन जिल्हा म्हणजे लातूर आणि अजून एका जिल्ह्यामधून उदगीर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची संपूर्ण तयारी हे झालेले असून 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील एका नवीन जिल्ह्याचे निर्मितीची घोषणा ही होणार आहे.
तसेच आता अजून महाराष्ट्र राज्यामध्ये 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यासाठीचा संपूर्ण आराखडा आणि प्रस्ताव देखील तयार असल्याचे सोशल मीडिया वरती फोटोज व्हायरल होत आहेत. मग खरंच महाराष्ट्रामध्ये 21 नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे का? सोशल मीडिया वरती 21 नवीन जिल्ह्यांची यादी असणाऱ्या फोटो मागचे नेमके सत्य काय? या सर्व गोष्टींचा आढावा आपण या पोस्टच्या माध्यमातून घेऊ या.
महाराष्ट्रातील 21 नवीन जिल्ह्यांची यादी :-
तर सध्या सोशल मीडिया वरती एक महाराष्ट्रातील 21 नवीन जिल्ह्यांची यादी असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील 21 नवीन जिल्हे आणि ते कोणत्या जिल्ह्यापासून विभाजित होऊन तयार होणार आहेत अशी एक यादी सर्वत्र फिरत आहे. तर त्या यादीमध्ये नेमके महाराष्ट्रातील कोणते 21 नवीन जिल्हे तयार होणार असल्याच्या चर्चा आहेत ते पाहूया,
विभाजन करण्याचा जिल्हा | विभाजनातून तयार होणारा नवीन जिल्हा |
मूळ जिल्हा अहिल्यानगर | नवीन तयार होणारा जिल्हा शिर्डी |
ठाणे | कल्याण |
ठाणे | मीरा भाईंदर |
अहिल्यानगर | संगमनेर |
अहिल्यानगर | श्रीरामपूर |
जळगाव | भुसावळ |
लातूर | उदगीर |
सोलापूर, सातारा,सांगली | माणदेश नावाचा नवीन जिल्हा |
नांदेड | किनवट |
नाशिक | मालेगाव |
नाशिक | कळवण |
बीड | आंबेजोगाई |
बुलढाणा | खामगाव |
पुणे | बारामती |
यवतमाळ | पुसद |
पालघर | जव्हार |
अमरावती | अचलपूर |
भंडारा | साकोली |
रत्नागिरी | मंडणगड |
रायगड | महाड |
गडचिरोली | अहेरी |
तर अशा प्रकारची वरील 21 महाराष्ट्र राज्यातील नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची यादी सध्या सोशल मीडिया वरती सर्वत्र पसरत आहे. यामध्ये नवीन होणार आज महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आणि तो जिल्हा कोणकोणत्या जिल्ह्यातून विवाहित होऊन तयार होणार आहे अशा प्रकारची माहिती दर्शवण्यात येत आहे. मग आता या यादी मागचं नेमकं सत्य काय? सरकार कडून खरंच महाराष्ट्र राज्यामध्ये 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव येत्या 26 जानेवारी 2025 ला साजरा करण्यात येणार आहे का?
महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीवर महाराष्ट्र सरकार :-
तर सोशल मीडिया वरती फिरणाऱ्या या महाराष्ट्र राज्यातील नवीन जिल्ह्यांच्या यादीच्या पोस्टबद्दल सरकारकडून कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नसून. थोडक्यात असंच समजावं की हा 21 जिल्ह्यांच्या यादीचा फिरणारा फोटो हा दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनेक योजनांचा पाऊस पडत असून त्यामध्येच सरकारच्या तिजेरीवरती भर पडणारी एक नवीन योजना सरकारने आत्ताच चालू केली आहे ती म्हणजे ” मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ” या योजनेमुळे महाराष्ट्र राज्याच्या सरकारी तिजोरीवर खूप मोठी आर्थिक जबाबदारी पडली असून त्यामुळे नवीन जिल्ह्यांचे निर्मितीवर कसल्याही प्रकारचा निर्णय नसणार आहे असेच दिसून येते.
महाराष्ट्र राज्यात नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी लागणारे घटक :-
तर समजा महाराष्ट्र राज्यामध्ये 21 जिल्ह्यांची निर्मिती झालीच, तर राज्य सरकारला नवीन होणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका तहसीलदार कार्यालय आणि अजून बरेच काही जे काही सरकारी दप्तरे असतात ती सर्व नव्याने उभारावी लागणार आहेत. तसेच एका जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व काही गोष्टी या त्या नवीन जिल्ह्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. एखादा नवीन जिल्हा निर्माण करणे म्हणजेच त्या जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी,बीडीओ अधिकारी, एक लोकसभा सदस्य अशा बऱ्याचशा लोकप्रतिनिधींच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे. आणि या सर्व गोष्टी करताना सरकारी तिजोरी वरती खूप मोठी जबाबदारी पडणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र सरकारकडून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठीचा कसल्याही प्रकारचा प्रस्ताव तयार नाही असे समजून येते.
ज्यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव सरकारकडून तयार होईल त्यावेळी त्या प्रकारची घोषणा ही महाराष्ट्र राज्य सरकारकडून करण्यात येईल. म्हणून सध्या तरी सोशल मीडिया वरती महाराष्ट्र राज्यातील 21 नवीन तयार होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादी वरती कोणीही विश्वास ठेवू नये.