प्रधानमंत्री आवास योजना जॉब कार्ड :-
तर आत्ताच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सरकारकडून सर्वे सुरू करण्यात आले आहेत. त्या सर्व मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जॉब कार्ड नंबर असणे खूप महत्त्वाचे आहे. या जॉब कार्ड च्या आधारेच प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे होणार आहे. तर हा जॉब कार्ड कसा काढायचा?, तो कुठे भेटणार? त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि तुम्हाला जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आज या पोस्टच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच ज्यांच्याकडे अगोदरपासूनच जॉब कार्ड आहे त्यांना जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे? ज्यांच्याकडे जॉब कार्डच नाहीये त्यांनी नवीन जॉब कार्ड कसे बनवायचे? या सर्व गोष्टींचा सविस्तरपणे आढावा घेऊया.
प्रधानमंत्री आवास योजना जॉब कार्ड म्हणजे काय :-
तर गावाकडील ज्यांना शेतजमीन नाही किंवा ज्यांना हातची नोकरी नाही ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांना घर भागवण्यासाठी रोजगार नाहीत अशा लोकांसाठी त्यांचं स्थलांतर थांबवण्यासाठी, म्हणजेच ज्या लोकांना हातामध्ये रोजगार नाही ते लोक रोजगाराच्या भटकंतीमध्ये गाव सोडून व इकडे तिकडे भटकत असतात. ही भटकंती रोखण्यासाठी आणि त्यांना शंभर दिवस रोजगार मिळावा यासाठी “मनरेगा” मार्फत प्रत्येक गावामध्ये सरकारी योजना राबवल्या जातात. आणि याच सरकारी योजनांच्या मार्फत ज्या लोकांकडे जॉब कार्ड आहे अशा लोकांना रोजगार मिळवून दिला जातो. तर सरकार मार्फत करण्यात येणाऱ्या योजनांमधील कामांसाठी लागणाऱ्या मजुरांना कामांमध्ये सहभाग होण्यासाठी या जॉब कार्डचा उपयोग केला जातो. जॉब कार्ड च्या मार्फत कामगारांना सरकारच्या मार्फत होणाऱ्या कामांमध्ये रोजगार दिला जातो.
जॉब कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया :-
ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे परंतु जॉब कार्ड प्रत्यक्षात नाही आहे त्यांच्यासाठी जॉब कार्ड मिळवण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे. जॉब कार्ड मिळवण्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा जॉब कार्ड मिळवण्यासाठी तसेच जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
- तर सर्वात प्रथम तुम्हाला https://nrega.nic.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx या दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज ओपन होईल त्या होम पेज मध्ये सर्व राज्यांची नावे असतील त्यामधून तुम्ही तुमच्या राज्य निवडावे.
- त्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे, विभाग निवडून झाल्यानंतर तुमचा जिल्हा निवडून तुमचा तालुका देखील निवडायचा आहे आणि त्यामध्ये.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर जॉब कार्डशी संबंधित रिपोर्ट असा पर्याय येईल त्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर जॉब कार्ड धारकांची संपूर्ण यादी तिथे येईल.
- त्यामध्ये तुमच्या नावाच्या जॉब कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या पूर्ण जॉब कार्ड येईल त्या जॉब कार्ड वरती तुमचा जॉब कार्ड नंबर नाव आणि सर्व काही माहिती दिलेली असेल.
तर मित्रांनो अशा प्रकारे वरील स्टेप्सचा आणि वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही अगदी सहजरीत्या तुमचे अगोदरचे काढलेले जॉब कार्ड आणि त्याचा नंबर हे तुम्ही पाहू शकता आणि तिथूनच तुम्ही तुमच्या जॉब कार्ड हे डाउनलोड देखील करून घेऊ शकता.
नवीन जॉब कार्ड साठी अप्लाय करण्याची प्रक्रिया :-
तर वरी दिलेल्या स्टेपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे जॉब कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता. तू ज्यांनी आतापर्यंत जॉब कार्ड साठी अप्लाय केलेला नाही आणि ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाहीच आहे अशा लोकांनी येथे खाली दिलेल्या पर्यायांचा वापर करून आपले नवीन जॉब कार्ड अगदी सहजरित्या मिळवू शकता. तर नवीन जॉब कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे त्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात या सर्व गोष्टींचा आढावा खालील दिलेल्या माहितीतून घेऊया.
- नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी सर्वात प्रथम https://web.umang.gov.in/landing/department/ministry-of-rural-development-government-of-india. या दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि तुम्ही उमंग च्या माध्यमातून जॉब कार्ड काढण्याच्या अगदी महत्त्वाचे पेज वरती तुम्ही पोचून जाल.
- तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
- एकदा तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन जॉब कार्ड अप्लाय करण्यासाठी पर्याय येईल त्या पर्यायांमध्ये जाऊन तुम्हाला दिलेल्या सर्व विचारलेल्या माहितीबद्दल अगदी अचूक माहिती तुम्हाला तिथे भरायचे आहे.
- विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यानंतर यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड, तुमचा फोटो, तुमचं पोस्ट बँकेमध्ये अकाउंट आणि तुमचा मोबाईल नंबर या सर्व माहिती तुम्हाला तिथे जमा करायचे आहे.
- वरील सर्व माहिती जमा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, तुमचे गाव, तुमचे पंचायत, तुमचा जिल्हा ही सर्व माहिती देखील तिथे अचूक रित्या भरायचे आहे.
अशाप्रकारे वरील लिंक मध्ये जाऊन दिलेली सर्व माहिती भरून संपूर्ण फॉर्म तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा तो फॉर्म व्यवस्थित रित्या वाचावा आणि शेवटी सबमिट करावा. या पर्यायांचा वापर करून तुम्ही तुम्हाला नवीन जॉब कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन रित्या अर्ज दाखल करू शकता.