Railway Group D Bharti 2025 –
नमस्कार मित्रांनो तुम्ही जर का तरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि वर्षानुवर्ष तुम्ही या सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल अभ्यास करत असाल, तर तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकार मार्फत घेण्यात येणारे रेल्वे भागातील ग्रुप डी अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदासाठी तब्बल 58,242 पदांसाठी भरतीची तारीख समोर आली आहे. या ग्रुप डी अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहेत. तर चला मग पाहूया या 58242 ग्रुप डी अंतर्गत असणाऱ्या पदांसाठी नेमके काय काय पात्रता निकष लावण्यात आलेले आहेत. वयाची सूट तसेच कोणकोणत्या प्रकारची पदे या ग्रुप डी विभागामध्ये येतात.
Railway Group D 2025 Eligibility Criteria –
- रेल्वे भागामध्ये ग्रुप डी अंतर्गत भरण्यात येणाऱ्या 58242 पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान दहावी पास असणे अनिवार्य आहे.
- तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एनसीवीटी कडून एनसिविटी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
- तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ही 1 जुलै 2025 पर्यंत 18 वर्ष ते 36 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे.
Railway Group D 2025 Exam Fee –
रेल्वे भरती अंतर्गत ग्रुप डी अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी जातीनिहाय परीक्षा फी आकारण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील Left ओबीसी प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा फी पाचशे रुपये असणार आहे. तर एससी,एसटी, महिला, ews या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षाफिही अडीशे रुपये असणार आहे.
जाहिरातीची तारीख – 28 डिसेंबर 2024.
अर्ज करण्याची तारीख – 23 जानेवारी 2025 पासुन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत.
प्रवेश पत्र (Hall Ticket ) – परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी.
परीक्षेची तारीख– लवकरच समोर येईल.
Railway Group D 2025 Posts –
अनु. क्र. | Category | विभाग | पद संख्या |
01. | पॉईंट्समन B | इंजिनीरिंग | 5058 |
02. | असिस्टंट ट्रॅक मशीन | इंजिनीरिंग | 799 |
03. | असिस्टंट ब्रिज | इंजिनीरिंग | 301 |
04. | ट्रॅक मेंटेनर गट 4 | इंजिनीरिंग | 19,187 |
05. | असिस्टंट P वे | इंजिनीरिंग | 257 |
06. | असिस्टंट C &W | मेकॅनिक | 2,587 |
07. | असिस्टंट TRD | इलेक्ट्रिकल | 1381 |
08. | असिस्टंट S & T | S & T | 2,012 |
09. | असिस्टंट लोको शेड डिसेल | मेकॅनिक | 420 |
10. | असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल | इलेक्ट्रिकल | 950 |
11. | असिस्टंट ऑपेरेशन्स | इलेक्ट्रिकल | 744 |
12. | असिस्टंट TL & AC | इलेक्ट्रिकल | 1,041 |
13. | असिस्टंट TL & AC (वर्कशॉप ) | इलेक्ट्रिकल | 624 |
14. | असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकेल | मेकॅनिकल | 3,077 |
वरील प्रकारचे पदे रेल्वे भरती ग्रुप डी 2025 मार्फत भरली जाणार आहेत. यानंतर पाहूया ग्रुप डी भरती 2025 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदासाठी वेतन किती मिळणार आणि कोणकोणते आलोवेन्स मिळणार.
Railway Group D Salary Structure –
- 7 व्या वेतन आयोगानुसार ग्रुप डी 2025 अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी वेतनश्रेणी ही 25,000 ते 30,000 रुपया दरम्यान असणार आहे.
- यासाठी तुम्हाला प्रवास भत्ता देखील दिला जाणार आहे. पण तो किती हा तुमच्या राहण्याच्या आणि कामाच्या ठिकाणावरती अवलंबून आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो ही झाली 2025 मध्ये ग्रुप डी अंतर्गत होणाऱ्या पदांसाठीची थोडक्यात माहिती. 23 जानेवारी 2025 पासून तुम्हाला या भरतीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. तो अर्ज तुम्ही https://indianrailways.gov.in/रेल्वेबोर्ड या दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन भरू शकता. यासाठीची संपूर्ण जाहिरात ही लवकरच प्रकाशित केली जाईल. त्या जाहिरातीमध्ये अजूनही पदसंख्या ही वाढण्याची शक्यता वर्तनात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वे अंतर्गत येणाऱ्या ग्रुप डी या पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही सध्या तरी 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 म्हणजेच जवळपास एक महिना एवढी मुदत देण्यात आलेले आहे. तरी या एका महिन्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्रासह दिलेल्या फी चा भरणा करून तुम्हाला अर्ज व्यवस्थित रित्या ऑनलाइन सबमिट करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर पेमेंट ऑप्शनही लगेच समोर येईल आणि पेमेंट केल्यानंतर तुमच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे पूर्णपणे पार पडेल. अर्ज सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी होईल आणि ज्यांनी अचूक माहिती भरलेली आहे अशाच विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षेसाठी पुढे ढकलले जाते. परीक्षेच्या काही दिवसा अगोदरच हॉल तिकीट ही देण्यात येतील. परीक्षेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना संभाव्य एक्झाम सेंटर निवडावे लागतील. या भरतीसाठी भरतीची निवड प्रक्रिया तसेच अभ्यासक्रम काय काय असेल आणि परीक्षेच्या स्वरूप कसे असेल या सर्व गोष्टी रेल्वे विभागाकडून देण्यात येणारे जाहिरातीमध्ये पूर्णपणे सविस्तरपणे देण्यात येईल.