---Advertisement---

भारतामध्ये चालणार लवकरच हायड्रोजन वर चालणारी रेल्वे कशाप्रकारे काम करते

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
भारतामध्ये चालणार लवकरच हायड्रोजन वर चालणारी रेल्वे कशाप्रकारे काम करते
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

हायड्रोजन रेल्वे:-

तर मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये जगातील सर्वात जास्त मोठे रेल्वेचे जाळे निर्माण करणारे इंडियन रेल्वे बोर्ड या नावाने ओळखले जाते. यामध्ये इंग्रजांनी सुरू केलेल्या रेल्वेचे जाळे हे 55 किलोमीटर इतके होते. तर आता नऊ विकसित झालेल्या भारत देशाने रेल्वेचे जाळे हे संपूर्ण देशामध्ये जवळपास एक लाख 32 हजार किलोमीटर एवढा प्रचंड लांबीचे रेल्वेचे जाळे तयार केले आहे. देशातील प्रत्येक प्रमुख शहरांमधून, कित्येक गावांमधून, मी जवळपास सर्वच राज्यांमधून आपण आज प्रवास करू शकतो तोही सुखरूप आणि जलद गतीने तो फक्त एकाच कारणामुळे आपल्या देशाने केलेल्या रेल्वे विभागातील प्रगतीमुळे. रेल्वे विभाग इतर बस आणि ट्रॅव्हल्स तिकिटांच्या फक्त 56% तिकीट रेल्वे प्रवाशांकडून आकारते. आणि यातून झालेल्या नफ्यावर आपल्या देशातील जवान सैनिक यांचा मासिक वेतनाचा खर्च भागतो.

अशीही आपल्या देशासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी रेल्वे आत्तापर्यंत आपण फक्त विजेवरती आणि कोळशावरती चालणारे अशी ऐकलेली असेल. परंतु आता आज आपण जाणून घेणार आहोत हायड्रोजन वरती चालणारे रेल्वे बद्दल. काय आहे हायड्रोजन रेल्वेचे विशेष महत्त्व? साधारण रेल्वे पेक्षा असं काय वेगळेपण आहे या हायड्रोजन रेल्वेमध्ये?. आता सध्याच्या ज्या देशातील रेल्वे रुळावरून रेल्वे धावताना आपण पाहतो त्यांना जास्त इलेक्ट्रिसिटी तर लागते किंवा त्यामधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे वायु प्रदूषण होत आहे. तर या सर्वांवरती पर्याय म्हणून आपल्या देशाने देशाच्या विकासाच्या दिशेने आणि आताचे रेल्वेमुळे होणारे प्रदूषणाचे परिणामामुळे हायड्रोजन रेल्वे वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जाणून घेऊया हायड्रोजन रेल्वे बद्दल :-

तर भारतीय रेल्वे मंत्रालयाने हरियाणा मधील जिंद ते सोनीपेठ येथील 90 किलोमीटरच्या अंतरावरती हायड्रोजन रेल्वे धावण्यासाठीचा आराखडा आखलेला आहे. तर जाणून घेऊया काय हायड्रोजन रेल्वेचे विशेष महत्त्व आणि यामुळे आपल्या देशाची कशाप्रकारे विकासामध्ये प्रगती होणार आहे. तर हायड्रोजन रेल्वे बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर या रेल्वेमधून उत्सर्जित होणारे पदार्थ हे पर्यावरणासाठी कोणत्याही प्रकारे घातक ठरत नाहीत. तसेच या रेल्वेमुळे वातावरणातील हवे वरती कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम ही होत नाही. अजूनही काही बरेच असे महत्त्वाचे घटक आहेत यामुळे हायड्रोजन रेल्वे हे पर्यावरणासाठी अत्यंत पोषक मानले जाते.

हायड्रोजन रेल्वे कशी काम करते :-

  1. हायड्रोजन रेल्वे ही हायड्रोजन फ्युएल सेल वरती चालणार असून ती ज्यावेळेस रुळावरून धावते त्यावेळेस त्यातून उत्सर्जित होणारा पदार्थ हा पाण्याची वाफ हा असतो त्यामुळे पर्यावरणामध्ये प्रदूषण होण्याचा प्रश्नच येत नाही .
  2. हायड्रोजन रेल्वे ही हायड्रोजन फ्युएल सेल वरती एका रिॲक्शनच्या माध्यमातून काम करते यामध्ये रिन्यूएबल एनर्जी तयार होत राहते आणि हायड्रोजन रेल्वे ही धावत राहते.

हायड्रोजन रेल्वे चे फायदे :-

हायड्रोजन रेल्वेचे सर्वात महत्त्वाचे फायदे सांगायचे झाले तर या हायड्रोजन रेल्वेमुळे पर्यावरणामधील रेल्वे प्रदूषणामुळे उत्सर्जित होणारा वायू हा पूर्णपणे नाहीसा होणार आहे आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये स्वच्छ हवा आणि शुद्ध हवा राहणार आहे. हायड्रोजन रेल्वे ही हायड्रोजन फुल सेल या रिन्यूएबल एनर्जी स्त्रोतावरती काम करत असते त्यामुळे यासाठी लागणारी इलेक्ट्रिक ऊर्जा देखील बचत होऊ शकते.

  1. हायड्रोजन रेल्वेमधून कसल्याही प्रकारचे ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडत नाहीत त्यामुळे हवा प्रदूषण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
  2. तसेच हायड्रोजन रेल्वेच्या फायद्याबद्दल अजून एक सांगायचे झाले तर इलेकट्रिक रेल्वेच्या आणि डिझेलवर चालणारे रेल्वेच्या तुलनेमध्ये हायड्रोजन रेल्वे हे अगदी कमी खर्चामध्ये धावते त्यामुळे इथे देखील पैशांची बचत होते तसेच इलेक्ट्रिसिटीची देखील बचत होते.
  3. अजून एक सर्वात मोठा हायड्रोजन रेल्वे कडून भेटणार फायदा म्हणजे ही रेल्वे नॉन इलेक्ट्रिक रुळावरून देखील अगदी सहजरित्या धावू शकणार आहे.
  4. भारतीय रेल्वेने 2025 मध्ये खर्च वाचवण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी 35 हायड्रोजन रेल्वे बनवण्याचा आराखडा तयार केला आहे.

तर अशाप्रकारे जगभरामध्ये हायड्रोजन रेल्वेची निर्मिती होत असताना भारतीय रेल्वे महामंडळाने देखील आपल्या भारत देशामध्ये हायड्रोजन रेल्वेसाठी ठोस पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. हायड्रोजन रेल्वे पर्यावरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी देखील खूप महत्त्वाचे आहे. हायड्रोजन रेल्वेचे एवढे फायदे असले तरी त्याचे काहीशी तोटे देखील आहेत जे की हायड्रोजन रेल्वे हे हायड्रोजन फ्यूल एनर्जी सेल वर चालत असून त्यामुळे विस्फोट होण्याची शक्यता आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने यावर देखील तोडगा हा नक्कीच काढण्यात येईल आणि जगातील सर्वात सुरक्षित जलद गतीने प्रवास करणारी तसेच अत्यंत कमी खर्चामध्ये धावणारे रेल्वे ही आपल्या भारत देशामध्ये लवकरच सर्वांच्या सेवेमध्ये येईल अशी आशा आहे.

---Advertisement---

Leave a Comment