प्रधानमंत्री किसान सन्माननिधी :
नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या भारत देशामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत दरवर्षी ठराविक वेळेच्या नंतर जे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेसाठी पात्र आहेत त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते रुपये दोन हजार रुपये ही एवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेतातील खर्चासाठी केंद्र सरकारकडून एक मदतीचा हात म्हणून शेतकऱ्यांना दिली जाते. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे आतापर्यंतचे राहते हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जवळपास 11 कोटींपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
शेवटचा हप्ता म्हणजेच 18 वा हफ्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून थेट जमा करण्यात आलेला असून आता 19 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. तर 19 वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 मध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आत्तापर्यंत या योजनेसाठी देशातील सर्व शेतकरी पात्र होते. परंतु जे शेतकरी नोकरी आणि शेती हे दोन्ही करतात आणि जे आयकर कर भारतात ते शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविले होते. तसेच आयकर कर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून जमा झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमार्फत जमा झालेल्या पैशांची परतफेड करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ची ठळक वैशिष्ट्ये :-
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही अगदी पूर्णपणे केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याने चालणारी योजना आहे.
- या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे देशातील गरजवंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकामाच्या मदतीसाठी अर्थसहाय्य म्हणून दरवर्षी ठराविक महिन्यांमध्ये हप्त्याच्या माध्यमातून सहा हजार रुपये एवढी रक्कम देण्यात येते.
- या योजनेसाठी शेतकऱ्यांचे कुटुंब याची व्याख्या म्हणायचं झालं तर शेतकऱ्याची पत्नी, मुल, मुली असे आहे.
- प्रधानमंत्री किसान सन्मान योजना साठी देशातील सर्व राज्यातील शेतकरी आणि केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी यांची ओळख पळतानी झाल्यानंतर ठरलेल्या निकषांच्या आधारे ठराविक शेतकरीच या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- तरी या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी म्हणजेच देशातील शेतकरी यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून दिली जाणारी रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.
तर वरील निकषांच्या आधारे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना साठी लाभार्थी पात्र आहेत. कोणकोणते शेतकरी किंवा लाभार्थी या योजनेपासून अपात्र ठरणार आहेत याचे सविस्तर परिपत्रक समोर आले आहे. तर आता पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान योजना साठी कोणकोणते लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. ह्या पात्र ठरणारे लाभार्थी कोणकोणत्या नुकसान वरती अपात्र ठरणार आहेत ते पाहूया.
प्रधानमंत्री किसान संबंधी योजनेसाठी अपात्रतेचे नियम :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येतो परंतु तो निधी देण्या मागे केंद्र सरकारने काही अटी आणि नियम तयार केलेले आहेत. केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांच्या आणि अटींच्या मध्ये जे शेतकरी लाभार्थी वस्ताद त्यांच्याच खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा 19 वा हप्ता जमा होणार आहे.तेवढेच लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
- जर तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सरकारी नोकरदार असाल आणि तुमच्याकडे जमीन असून तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्माननीय या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- आणि जर का तुम्ही आजी-माजी राज्यसभा सदस्य, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक किंवा महापौर, खासदार अशा प्रकारच्या पदाचे तुम्ही मानकरी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी लाभ घेता येणार नाही आहे.
- केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे सर्व निवृत्त अधिकारी, कर्मचारी, शासन अंगीकृत निमशासकीय संस्थांच्या अधिपत्या खाली येणारे सर्व अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियमित अधिकारी कर्मचारी असणारे लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांचे ज्यांचे उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा जास्त आहे वार्षिक असे लाभार्थी देखील या योजनेपासून अपात्र ठरणार आहेत.
- तसेच ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्ती मासिक वेतन दहा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे असे सेवानिवृत्त अधिकारी देखील प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पासून वंचित राहणार आहेत.
- नोंदणीकृत डॉक्टर, वकील,अभियंता, सनदी लेखपाल इत्यादी पदावरती असणारे लाभार्थी देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
तर अशाप्रकारे वरील दिलेल्या काही निकषांच्या आधारे प्रधानमंत्री सन्मान किसान निधी योजनेसाठी तुम्ही अपात्र ठरू शकतात.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 19 वा हप्ता :-
शेतकरी बांधवांना आतापर्यंत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मार्फत दर चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्र सरकारकडून थेट जमा करण्यात येतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला होता. असेच आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा 19 वा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेले आहे. काही माध्यमांमधून येणाऱ्या माहितीनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजना चा 19 वा हप्ता हा जानेवारी 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.