---Advertisement---

प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी असा करा अर्ज

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी असा करा अर्ज
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री आवास योजना 2025 :-

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्फत गरीब कुटुंबांना राहण्यासाठी निवारा नाही आहे किंवा पक्की घरे नाहीत अशा गरीब गरजवंतू लोकांना केंद्र सरकारकडून घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते या योजनेला प्रधानमंत्री आवास योजना असे म्हणतात. तर मित्रांनो आत्ताच आलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना 2025 या योजनेची अंमलबजावणी आता झालेली असून यासाठीचे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तुझे पात्र नागरिक आहेत त्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्ज करावा लागेल त्या अर्जासाठी लागतात आणि काय काय स्टेप्स आहेत ते आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रधानमंत्री आवास योजना 2025 या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करावा लागेल ते खालील पाहूया,

प्रधानमंत्री आवास योजना 2025 साठी असा करा अर्ज :-

प्रथमता तुमच्या मोबाईल वरून किंवा कम्प्युटर लॅपटॉप वरून गुगल वरती pmayg.nic असं टाईप करून सरकारचे अधिकृत वेबसाईट येईल त्यावरती क्लिक करायचे आहे.

इथे दिलेली लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता https://pmayg.nic.in

  1. त्यानंतर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाल आणि त्याच्या मुख्य पोर्टल वरती तुम्हाला ूूप सार्‍या ऑप्शन्स येतील त्यामधून तुम्हाला वरील मेनू या बटणावर क्लिक करून त्यामध्ये Awas plus 2024 survey या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  2. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दोन एप्लीकेशन च्या लिंक दाखवल्या जातील एक म्हणजे तुम्हाला केवायसी साठीच एप्लीकेशन आणि दुसरं तुम्हाला अर्ज करण्यासाठीच अप्लिकेशन असेल.
  3. परत दिलेले दोन्ही एप्लीकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. करून झाल्यानंतर अर्ज करण्यासाठीच्या आवास सर्वे या एप्लीकेशन मध्ये आपल्याला प्रथमता रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  4. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेल्फ सर्वे ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  5. त्यानंतर तुमचा आधार कार्ड आयडी टाकून तुमचं फेस अथेंतिकेशन सुरू होईल. त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल त्यामुळे तुमचा चेहरा व्यवस्थित दाखवल्यानंतर तुमचं केवायसी हे यशस्वीरित्या पूर्ण होईल.
  6. त्यानंतर तुमचा राज्य, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड या सर्व माहिती भरायचे आहेत.
  7. त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य रजिस्ट्रेशन अप्लाय करण्यासाठीचा पेज येईल त्यामध्ये तुम्हाला Add/Edit survey या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
  8. त्यानंतर तुमच्यासमोर एक भरण्यासाठी चा फॉर्म येईल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती भरावी लागेल जसे की आधार कार्ड, तुमच्या कुटुंबातील सदस्य संख्या आणि त्या प्रत्येक सदस्यांची माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये व्यवस्थित रित्या अचूक भरायचे आहे.
  9. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save and Next पर्यावर ती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचे आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला असे विचारण्यात येईल की तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ही कोणत्या सदस्याच्या नावावरती घेणार आहात.
  10. तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महिलांच्या नावाने अर्ज करून महिलांनाच प्राधान्य द्यावे विशेषता कुटुंबातील वयाने मोठ्या असणाऱ्या महिला.
  11. ज्याच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजना अर्ज टाकायचा आहे त्या व्यक्तीच्या नावावरती क्लिक करून फेस आयडी ऑथेंटीकेशन साठी त्या व्यक्तीसमोर मोबाईलचा कॅमेरा धरावा. त्यामध्ये चेहरा व्यवस्थित आल्यानंतर हिरव्या कलरचा गोल तयार होईल तेव्हा समजून जायचे की फेस ऑथेंटीकेशन यशस्वी झाले आहे
  12. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करणारे व्यक्तीचे बँक खात्याबद्दल ची माहिती द्यायची आहे.
  13. बँक खात्याबद्दल माहिती देऊन झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील त्या प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तर द्यायचे आहेत जसे की, आता तुमच्याकडे कसले घर आहे, ते घर कच्चे आहे की पक्के आहे अशा प्रकारचे काही प्रश्न विचारले जातील.
  14. प्रश्नांची अचूक उत्तर दिल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या घराचा फोटो काढून अपलोड करायचा आहे. आहे त्या जागेवरून. फोटो काढताना तीन प्रकारचे फोटो काढायचे आहेत. पहिला फोटो हा घराच्या समोरच्या बाजूचा, हा घरात आतील बाजूचा आणि तिसरा तुम्ही घराच्या पाठीमागून काढू तो फोटो दिलेल्या जागेमध्ये अपलोड करावा.
  15. फोटो अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरासाठी जे डिझाईनचे ऑप्शन दिले जातील त्यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे.
  16. वरील सर्व माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत जेवढा डाटा भरलेला आहे तो पूर्ण सेव झालेला असेल त्या सेव झालेला वाटायला सिलेक्ट करून अपलोड या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे अपलोड या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या योजनेसाठी तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या सबमिट होईल आणि तुम्हाला एक तुमचा अर्ज क्रमांक मिळेल जो की तुम्हाला अर्जाची स्थिती वारंवार पाहण्यासाठी जपून ठेवायचा आहे. त्याचा अर्ज क्रमांक चा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता तुमच्या रसामध्ये काही त्रुटी असल्यास त्याच अर्ज क्रमांक वापरून तुम्ही दुरुस्त करू शकता.

---Advertisement---

Leave a Comment