---Advertisement---

उत्तरप्रदेश येथील प्रयागराज मधे महाकुंभ मेळावा 2025 चे आयोजन

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
उत्तरप्रदेश येथील प्रयागराज मधे महाकुंभ मेळावा 2025 चे आयोजन
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

महाकुंभ मेळावा 2025 :

दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळावा घेण्यात येतो. 2025 या वर्षी तब्ब्ल 12 वर्षानंतर उत्तप्रदेश मधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा 2025 चे आयोजन करण्यात आले असून या महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. हा प्रयागराज येथील महाकुंभ मेळावा 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पार पडणार आहे. या कुंभ मेळाव्यासाठी 40 कोटी एरवढ्या मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर एवढ्या भाविकांसाठी 3000 रेल्वे गाड्यांची तर 200 चार्टन्ट विमानांची सोय करण्यात आली आहे. तर पाहूया काय आहे या महाकुंभ मेळाव्याचे महत्त्व आणि पौराणिक कथा.

महाकुंभ मेळावा पौराणिक कथा :

तर मित्रांनो महाकुंभ मेळाव्याचा थेट संबंध जातो तो समुद्र मंथनकडे. ज्या वेळी राक्षस आणि देवतानी समुद्रामध्ये मंथन करून अमृत बाहेर काढले होते. जेंव्हा समुद्र मंथनातून अमृताची प्राप्ती झाली होती तेंव्हा देवता आणि राक्षस यांच्यामध्ये ते प्राप्त करण्यासाठी युद्ध सुरु झाले होते. त्या वेळी भगवान विष्णू यांनी त्या अमृताच्या घडाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे वाहन गरुड यांच्याकडे सोपावाले होते. मग गरुड पक्षी जेंव्हा अमृताचा कलश घेऊन हवेत उडत होता तेंव्हा त्या भांड्यातून अमृताचे चार थेंब चार ठिकाणी पडले होते. ते अमृताचे थेंब प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे पडले होते. तेंव्हापासूनच या चार ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभ मेळाव्याचे आयोजन केले जाते.

महाकुंभ मेळावा बारा वर्षांनीच का येतो :

तर सागर मंथनातून निर्माण झालेले अमृत प्राप्त करण्यासाठी देवता आणि राक्षस यांच्यामध्ये जे युद्ध चालू झाले होते ते युद्ध 12 दिवस चालले होते. जे कि मानवी आयुष्याच्या 12 वर्षांबरोबर आहे. त्यामुळे हा कुंभ मेळावा दर बारा वर्षांनी घेतला जातो अशी पौराणिक कथा आहे.

महाकुंभ मेळाव्याचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्व :

महाकुंभ मेळावा हा एक केवळ धार्मिक विधी नसून हा एक भारतीय संस्कृतीचा आणि अध्यात्मचा एक संगम आहे. जो कि भाविकांना परमात्म्यावर असलेले श्रद्धा आणि त्यांच्या जवळ असण्याचा भास निर्माण करतो. या महाकुंभ मेळाव्यामध्ये अध्यात्मिक आणि सांस्कृतिक तेचे अगदी शांततेत दर्शन होते. या कुंभ मेळाव्यावर्ती संपूर्ण देशभरातून येणाऱ्या भाविकांची अपार श्रद्धा आणि विश्वास आहे. यासाठी भाविक देशभरातून लाखोंच्या संख्येने महाकुंभ च्या ठिकाणी येतात आणि महाकुंभ मेळाव्याचा आनंद घेतात. यासाठी काही देशातील ठराविक आज मानाच्या पालख्या देखील येतात. त्यांचं प्रात्यक्षिक देखावा हा डोळे दीपावणारा असती आणि हे सर्व धार्मिक वातावरण पाहून मनाला एक प्रकारची अध्यात्मिक शांती समृद्धी लाभते.

प्रयागराज येथेच महाकुंभ मेळावा घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे, शास्त्रमध्ये प्रयागराज ला तीर्थराज किंवा तीर्थस्थळाचा राज म्हणुन उल्लेख केलेला आढळतो. एक पौराणिक कथा अशीही आहे कि, ब्रह्म देवाने पहिला यज्ञ प्रयागराज येथेच केला होता .

आदित्यनाथ योगी महाकुंभ मेळावा 2025 :

आदित्यनाथ योगी म्हणजेच उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री हे एक कट्टर हिंदू आहेत हे काय वेगळं सांगायची गरज नाही. मग आता त्यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच महाकुंभ मेळावा असून विशेष म्हणजे हा त्यांच्याच राज्यातील प्रयागराज या ठिकाणी आहे. तर त्यांज या महाकुंभ मेळाव्यासाठी काय तयारी केली आहे पाहूया,

  1. महाकुंभ मेळावा 2025 च्या भव्य आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने 2,600 कोटी रुपयांचे आर्थिक निधी मंजूर केला आहे. या निधीच्या आकड्यावरून आपण या मेळाव्याची भव्यतेचा अंदाज लावू शकता.
  2. महाकुंभ मेळावा 2025 साठी तब्बल 40 कोटी भाविकांसाठी त्यांच्या सुरक्षा, राहण्याची आणि जाण्या येण्याची सुविधा उत्तर प्रदेश सरकारकडून करण्यात आली आहे.
  3. महाकुंभ मेळाव्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 50,000 विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
  4. योगी सरकारने या भव्य मेळाव्यासाठी सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.

अशा प्रकारे योगी सरकारकडून महाकुंभ मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

महाकुंभ मेळावा 2025 ला जाताना हि काळजी घ्या :

कुंभमेळाव्यात हे करा कुंभमेळाव्यात हे करू नका
तिथे जाऊन पुण्य करा. ते एक पवित्र स्थान असून तिथे कसल्याप्रकारचे पाप करू नका.
तिथे गेल्यानंतर अगदी मनापासून कुंभमेळाव्याचा आनंद घ्या. मनामध्ये कसल्या हि प्रकारचे कपटी भावना मनात ठेऊ नका.
महाकुंभ मधे आलेल्या साधूंच्या सोबत चांगले वर्तन करा. त्यांना त्रास होईल अशी वागणूक करू नका.

जर तुम्ही रामभक्त असाल तर प्रयागराज येथील त्रिवेणी सांगमावर पवित्र स्नान केल्यानंतर 108 वेळा लाल अक्षरात राम नाव लिहा याने तुम्हाला पुण्य लाभेल. महाकुंभ मेळाव्यात आलेल्या साधूंच्या आचरनावर लक्ष द्या आज त्यांचे अनुसरण करा. तेथील पवित्र मंदिराचे दर्शन घ्या आणि तेथे होणाऱ्या यज्ञाचा लाभ घ्या. अशा प्रकारे हा महाकुंभ मेळावा भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा मनाला जातो.

Chaufer24.com Team

I am a marathi blogger providing updated and correct information to site visitors like government job vaccancies, government yojana, schemes and some other important worldwide news.

---Advertisement---

Leave a Comment