---Advertisement---

साऊथ कोरिया मध्ये प्लेन क्रॅश

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
साऊथ कोरिया मध्ये प्लेन क्रॅश
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

आत्ताच कजाकिस्तानच्या आता विमानतळावरती झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये रशियाचा हात असल्याचे रशियाने कबूल केले होते. आणि या घडलेल्या घटनेबाबत रशियाने कजाकिस्तानची माफी देखील मागितली होती. या दुर्घटनेमध्ये पायलटसह एकूण 38 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाला याची बातमी जगभर पसरतेच पसरते तोपर्यंत साऊथ कोरिया मध्ये अजून एका विमानाचा अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये एकूण मृतांची संख्या ही 179 वर पोहचली आहे. हा अपघात मुआन इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती घडला आहे. हे विमान लँड होताना रनवे वरून घसरले आणि बॉण्ड्री ला जाऊन धडकले आणि विमान क्रॅश झाले. यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि ही दुर्घटना घडली. या विमानामध्ये एकूण 181 प्रवासी होते.

आताच्या काळामध्ये निरनिराळे तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाच्या आधारे अगदी उत्तम उत्तम क्वालिटीचे एरोप्लेन बनवण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध सुख सुविधा तसेच सुरक्षा देखील देण्यात येत आहे. अशा या विकशीत तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचे प्लेन क्रॅश होणे या घटना कधीच ऐकायला भेटत नाहीत जरी भेटल्या तरी त्या फार कमी प्रमाणात भेटतात. परंतु आत्ता यात घडलेल्या दोन घटनांवरून विमान सुरक्षितेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तर पाहूया कझाकिस्तानच्या आणि साऊथ कोरिया मध्ये झालेल्या प्लेन प्क्रॅश या घटना बद्दलची माहिती.

साऊथ कोरिया प्लेन क्रॅश :

साऊथ कोरिया मध्ये झालेले प्लेन क्रॅश हे दुर्घटना खूप मोठी दुर्घटना मानली जाते. कारण या प्लेन क्रॅश मध्ये तब्बल १७८ प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर फक्त दोन प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यश मिळाले आहे. साऊथ कोरिया मध्ये झालेली प्लेन क्रॅश यामध्ये असलेले दुर्घटना झालेले विमान हे JEJU एअर या कंपनीचे होते. हे विमान मुआन या विमानतळावरती उतरताना धावपट्टीवरून घसरले आणि ही मोठे दुर्घटना घडली. या विमानामध्ये एकूण 181 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 175 हे प्रवासी तर सहा फ्लाईट अटेंडंट होते.

हे विमान थायलंड वरून परतत असताना मुआन इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती क्रॅश झाले आहे. तरी या एकूण संख्या पैकी फक्त दोनच प्रवाशांना सुखरूप वाचणे देश मिळाले असून त्यांच्या वरती दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत. तर विशेष म्हणजे हे दोन्ही प्रवासी थायलंडचे रहिवासी आहेत आणि यामध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.

JEJU AIR LINE कडून साऊथ कोरिया प्लेन क्रॅश बद्दल माफी मागण्यात आली

तर झालेल्या साऊथ कोरिया येथील प्लेन क्रॅश बद्दल विमानाच्या कंपनीकडून माफी मागण्यात आलेले आहे. तर काय म्हणाली कंपनी पाहू, ” या अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, विमानाला या अगोदर अपघात झाल्याची कसलीही नोंद नाही. तसेच विमानामध्ये कसलीही तांत्रिक त्रुटी असल्याच्या आढळून येत नाही. याबाबतचा तपासात संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल”. अशा प्रकारचा माफीनामा आणि माहिती JEJU एअर कंपनीकडून देण्यात आली आहे

साऊथ कोरिया मध्ये प्लेन क्रॅश झाले कसे?

तर साऊथ कोरिया इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती थायलंड वरून विमान परतताना ते विमानतळावरती लँड होताना विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये काही बिघाड झाल्यामुळे क्रॅशलांडिंग करावा लागलं परंतु क्रॅशलांडिंगचा पहिला प्रयत्न यशस्वी ठरल्यामुळे दुसरा प्रयत्न करण्यात आला तो हे यशस्वी ठरल्यामुळे विमान दुर्घटना झाल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. विमान लँड करताना त्याच्या धावपट्टीवरून विमान धावत होते परंतु धावपट्टीच्या शेवटच्या टोकापर्यंत विमान थांबले नसल्याने विमान सुरक्षा भिंतीवर जाऊन आदळले. आणि त्यानंतर त्या विमानाने पेट घेतला. हे विमान ज्याप्रकारे धावपट्टीवरती उतरवण्यात आले होते याला बेली लँडिंग असे म्हटले जाते. पैकी आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरले जाते.

बेली लँडिंग

बेली लँडिंग म्हणजे ज्यावेळेस विमानाची चाके लँडिंग करताना बाहेर निघत नाहीत त्यावेळेस अगदी शेवटचा पर्याय म्हणून बेली लँडिंग हा पर्याय निवडला जातो. साऊथ कोरिया मध्ये झालेल्या प्लेन क्रॅश मध्ये हाच बेली लँडिंग पर्याय ने वापरला होता. परंतु विमानाची गती कमी न झाल्याने ही दुर्घटना घडली. बेली लँडिंग मध्ये विमानाचे मागची बाजू कडून विमान लँड केले जाते.

साऊथ कोरिया मध्ये झालेले प्लेन क्रॅश हा अपघात पक्षांनी थडकलेल्या घटनेमुळे झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान लँड करण्याच्या काही वेळेपूर्वी पायलट करून विमानाला पक्षी थडकल्याची घटना सांगण्यात आलेली होती असे सांगण्यात येते. तर हा झालेला अपघात हा याच घटनेमुळे झाला असावा असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. परंतु तसं बघायला गेलं तर पक्षी विमानाला थडकने या घटना काही नवीन नाहीत आणि पक्षी थडकल्यामुळे प्लेन क्रॅश होणे हे काय एवढं मोठं कारण नाही तरीसुद्धा या अपघातामध्ये पक्षी थडकल्याने अपघात झाला आणि गिअर बॉक्स मध्ये बिघाड झाला असे एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.

---Advertisement---

Leave a Comment