---Advertisement---

New rules from 1st January 2025

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
New rules from 1st January 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

2025 हे नवीन वर्ष चालू होत आहे तर त्या संदर्भामध्ये देशांमध्ये काही महत्त्वाच्या दैनंदिन वापराच्या गोष्टींमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बदला संदर्भातल्या सूचना सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये रोजच्या वापरातील ऑनलाइन पेमेंट, गॅस, तसेच वेगवेगळे टॅक्सेस आणि बरेच काही बदल हे करण्यात आले आहेत. हे करण्यात आलेले बदल 1 जानेवारी 2025 पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहेत. तर चला मग जाणून घेऊया कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत.

पेन्शन संदर्भातील बदल :

उत्तर आपल्या देशामधील निवृत्ती सेवा अधिकाऱ्यांना जी पेन्शन दिली जाते त्यामध्ये आपल्या सरकारने एक फार मोठा बदल केलेला आहे. यातील एक प्रमुख मोठा बदल म्हणजे ईपीएफओ खात्यामधील पैसे देशातील कोणत्याही बँकेमधून काढता येणार आहेत. तसेच ईपीएफओ चे पैसे आपण जसे रोज एटीएम मधून पैसे काढतो तशाप्रकारे ईपीएफओ चे पैसे देखील कोणत्याही एटीएम मधून काढता येणे शक्य होणार आहे. तर हे पैसे काढण्यासाठी एक वेगळे एटीएम कार्ड दिले जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवीन सेंट्रल पेमेंट ईपीएफओ सिस्टीमच्या ईपीएस च्या 78 लाख धारकांना याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

UPI 123 PAYMENTS :

तर आताच्या नवीन वर्षामध्ये आपण जे काही ऑनलाईन पेमेंट करतो जे की यूपीआयच्या मार्फत करतो तर त्या युपीआय प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे युपी आय वन टू थ्री पेमेंट ऑप्शन. तर यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत पाहूया,

  1. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यूपीआय वन टू थ्री या मार्फत ज्या लोकांकडे इंटरनेट नसणार आहे त्यांना देखील ऑनलाईन पेमेंट करणे शक्य होणार आहे.
  2. आतापर्यंत यूपीआय वन टू थ्री पेमेंट मार्फत आपल्याला दर दिवशी फक्त पाच हजार रुपयांपर्यंतच आर्थिक व्यवहार करता येत होते.
  3. तर आता नवीन आलेल्या नियमानुसार एक जानेवारी 2025 पासून UPI 123 PAYMENTS मार्फत आपण दररोज दहा हजारापर्यंत आर्थिक व्यवहार करू शकतो.

तर वरील काही महत्त्वाचे बदल हे ऑनलाइन पेमेंट बद्दल करण्यात आलेले आहेत. हे करण्यात आलेले बदल 1 जानेवारी 2025 पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहेत.

Indian Share Market Rules 2025:

तर मित्रांनो नवीन वर्ष 2025 मध्ये आपल्या शेअर मार्केट मध्ये देखील काही फार महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. तर शेअर मार्केटच्या काढलेल्या नवीन नियमावलीनुसार सेन्सेक्स, सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या कॉन्ट्रॅक्ट संबंधातील व्यवहारांची शेवटची मुदत ही महिन्याच्या शेवटचा मंगळवारी असणार आहे. तर सेन्सेक्सचे आठवडाभराचे करार हे दर शुक्रवार ऐवजी दर मंगळवारी संपुष्टात येणार आहे. अशा प्रकारचे काही नवीन बदल मुंबई शेअर मार्केटमध्ये करण्यात आलेले आहेत.

Whats App Rules In 2025 :

तर नवीन वर्ष 2025 मधला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असलेले व्हाट्सअप या संदर्भातील आहेत. यामध्ये ज्यांचे फोन्स खूप जुनी आहेत ज्या मोबाईलला नवीन सॉफ्टवेअर सपोर्ट करत नाहीत अशा फोन मधून व्हाट्सअप चालणार नाही. यामागचा उद्देश म्हणजे व्हाट्सअप च्या सुरक्षिततेबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पाहूया कोणकोणत्या मोबाईल्स मधून व्हाट्सअप गायब होणार आहे.

  • samsung Galaxy S3.
  • Galaxy Note 2.
  • Soney Xperia Z.
  • LG Nexus 4.
  • HTC 1.

त्यावरील फोन मधून व्हाट्सअप गायब होणार आहे तरी यावर पर्याय म्हणून तुम्हाला एक तर नवीन मोबाईल घ्यावा लागेल किंवा काही बदल करावे लागतील. तर व्हाट्सअप अचानक गायब होणार नाहीये तुम्हाला तुमची चाट्स आणि तुमचा व्हाट्सअप चा डाटा बॅकअप करायला टाईम भेटणार आहे.

तर पाचवा बदल शेतकरी कर्जमाफी संदर्भातील :

आतापर्यंत शेतकऱ्यांना विना हमी एक लाख साठ हजार पर्यंत कर्ज देण्यात येत होते. परंतु आता 2025 पासून शेतकऱ्यांना विनाहमी कर्ज दोन लाखांपर्यंत घेता येणार आहे. याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. याचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होऊ शकतो. या मोठ्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये स्थिरता येऊ शकते असा हा महत्त्वाचा उद्देश या योजनेमागे आहे.

लक्झरी वस्तूंवरील कर :

तर नवीन वर्ष 2025 मध्ये तुम्ही जर एखादी लक्झरी वस्तू खरेदी केली तर त्यावरती तुम्हाला अधिक टॅक्स भरावा लागणार आहे. समजा तुम्ही एखादी लक्झरी वस्तू खरेदी केली त्याची किंमत दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्याच्या रकमेच्या एक टक्का टीसीएस टॅक्स भरावा लागणार आहे.

चार चाकी वाहनांच्या किमती वाढणार

तर जानेवारी 2025 पासून जर तुम्ही देशांमध्ये चार चाकी वाहन खरेदी करत असाल तर त्या वाहनांच्या किमतींमध्ये मागील वर्षापेक्षा अधिक वाढ करण्यात आलेली आहे. कोणकोणत्या कंपनीमध्ये किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे जाणून घेऊया.

मारुती सुझुकी, हुंडाई, बीएमडब्ल्यू, महिंद्रा आणि मर्सिडीज बेंज यांसारख्या मोठमोठ्या कंपन्यांमार्फत तयार होणाऱ्या चार चाकी वाहनां च्या किमतीमध्ये तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जी की साधारणता पंचवीस हजार पर्यंत वाढ ही या चार चाकी वाहनांच्या किमतीमध्ये होऊ शकते. थोडक्यात सांगायचे झाले तर मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी कार खरेदी करताना तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

वरील अशा प्रकारचे काही महत्त्वाचे बदल आपल्या देशातील सरकारने केलेले आहेत आणि केलेले बदल हे एक जानेवारी 2025 पासून संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहेत.

---Advertisement---

Leave a Comment