आपल्या देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर , अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन विभागाचे उपाध्यक्ष आणि सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधान पद भूषविलेले डॉ. मनमोहन सिंग यांचं काल दिल्ली क्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानी त्यांच्या राजकीय आयुष्यात देशाच्या आर्थिक धोरणात खूप मोलाचं योगदान दिलं आहे. ज्या वेळेस देशाची अर्थव्यवस्था ढासळली होती तेव्हा त्यांनी आर्थिक धोरण म्हणजेच उदारीकरणाच्या धोरणामुळे देशाला एका मोठ्या आर्थिक संकटापासून वाचवल होत. त्यानी २००४ ते २०१४ अशी दहा वर्ष देशाचा पंतप्रधान म्हणून कारभार पहिला. तर जाणुन घेऊया त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना या पोस्टच्या माध्यमातून.
Manmohan Singh Education & Age
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं तेव्हा ते ९२ वर्षाचे होते. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी आत्ताच्या पाकिस्तान मधे झाला होता. त्यांचं शिक्षण हे जगातील प्रसिद्ध विद्यापीठ केंब्रिज विद्यापीठमधून केलं होतं. तसेच जगातील अजून एक प्रसिद्ध संस्था ऑक्कसफर्ड मधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली होती. त्यानी त्यांच्या आयुष्यात काही काळ शिक्षक म्हणून देखील विद्यार्थ्यांना शिकवले.
Manmohan Singh History:-
- मनमोहन सिंह यांनी वर्ष १९७१ ते १९७२ या वर्षी आपल्या देशासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
- फक्त आर्थिक सल्लागार च नव्हे तर त्यांनी देशाच्या अर्थमंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून १९७२ ते १९७६ अशी पाच वर्ष काम पाहिले.
- १९७६ ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकवण्याचे काम केले.
- याच वर्षी देशाची मुख्य बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये संचालक म्हणून काम पाहिले.
- १९७७ ते १९८० या वर्षात त्यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
- त्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाही तर १९८२ ते १९८५ भारताची सर्वत्र मोठी बँक रिझर्व्ह बँक मधे गव्हर्नर झाले.
- वर्ष १९८५ ते १९८७ नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
- १९८७ ते १९९० जिनिव्हा मधील असलेले साऊथ कमिशन मधे सेक्रेटरी जनरल म्हणून पदभार स्वीकारला.
- १९९० ते १९९१ देशासाठी सर्वात महत्त्वाचे आर्थिक धोरण तयार केले तेव्हा ते पंतप्रधानाचे अर्थविषयक सल्लागार होते.
- १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते.
manmohan singh rajya sabha:-
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं निधन झाल्यानंतर राव हे पंतप्रधान झाले. परंतु त्या वेळी देशाची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक होती. मग अशा वेळी डॉ मनमोहन सिंह यांनी पंतप्रधानांचा आर्थिक सल्लागार म्हणून राजकरणात प्रवेश केला. त्यानी त्यांचं उच्च शिक्षण अर्थशात्रामधे केल्यामुळे त्यांना अर्थव्यवस्थेचे चांगलेच ज्ञान होते. आणि त्याचा फायदा देशाला १९९१ या वर्षी झाला. त्यानंतर त्यांनी अर्थमंत्री म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचा कसलाही राजकीय कारकीर्द नसल्यामुळ अगदी धडाकेबाज निर्णय घेत देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप सुधारणार केली आणि देशाला आर्थिक संकटापासून वाचावल.
त्यानी तयार केलेलं सर्वात महत्त्वाचे धोरण म्हणजे खाजगीकरण , उदारीकरण आणि जागतिकीकरण हे धोरण. देशामध्ये गुंतवणुकीसाठी जे काही अडथळे होते ते ते त्यांनी कमी करण्याचे काम केले. त्यानी अर्थमंत्री म्हणून कारभार स्विकारल्यानंतर त्यांना दिलेल्या तेव्हाच्या पंतप्रधान नर्सिम्हा राव यांनी दिलेल्या मोकळीक बद्दल देखील स्पष्ट बोलून दाखवले होते. जेव्हा डॉ मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान झाले तेव्हा त्यानी तेव्हाचे अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासोबत मिळून देशाच्या आर्थिक बाजारपेठेत खूप मोठी कामगिरी केली. त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे त्यावेळेस देशाची अर्थव्यवस्था हे ८ ते ९ टक्क्यांपर्यंत पोहचली होती. त्यावेळी आपली अर्थव्यवस्था हि जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढणारी २ नंबर ची अर्थव्यवस्था होती.ज्या वेळी जगातील मोठं मोठ्या अर्थव्यवस्था असणारी देश आर्थिक महामारीचे शिकार झाले होते . त्यावेळेस डॉ मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून वाचवले होते.
आजच्या काळात सामान्यातील सामान्य माणूस शेअर बाजारात गुंतवणूक करतोय त्याच श्रेय देखील त्यांनाच जात. डॉ मनमोहन सिंह यांनी केलेल्या त्यांच्या काळातील कामामुळे देशातील मध्यम वर्ग जो होता तो अगदी सुखी होता. त्यामुळे मध्यम वर्गातील लोकांना त्यांच्या येणाऱ्या पैष्याच नियोजन व्यवस्थित करता आले. देशातील पहिली आणि सर्वात मोठी शेतकरी कर्ज माफी सुद्धा त्यांच्या काळातच झाली होती. त्यांचा विकास करण्याचा वेग हा अधिक होता. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसरी टर्म मधे विरोधकांना सामना करावा लागला. त्यांच्या आणि त्यांच्या सरकार वर भाजप पक्षाने भ्रष्टाचार चे आरोप केले. डॉ मनमोहन सिंह यांच्यावर पण अतिशय खालच्या दर्जाची टीका केली.
त्यांच्यावर असलेला कोळसा घोटाळा केल्याचा आरोप यावर सीबीआय ने त्यांना क्लिनचीट दिली होती . त्यानी पंतप्रधान असताना घेतलेल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत सर्व विरोधकांना उत्तर देत एकच वाक्य सांगितले होते की , माझ्यावर चे भ्रष्टाचाराचे आरोप जर का सिद्ध झाले तरी राजकारणातून संन्यास घेइन.