---Advertisement---

BMC CLERK RESULT 2024

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
BMC CLERK RESULT 2024
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

बृहन्मुंबई महानगरपालिका ने घेतलेल्या लिपिक सहायक या पदासाठीच्या परीक्षेचा निकाल हा लवकरच लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या परीक्षेचा निकाल हा डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता विविध माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. ज्या कोणी उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करून परीक्षा दिलेले आहे त्या उमेदवारांनी आपला हॉल तिकीट क्रमांक किंवा आपला अर्ज क्रमांक अशा गोष्टींचा वापर करून बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवरून लॉगिन करून त्यांना निकाल पाहता येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक लिपिक या पदासाठी डिसेंबर 2024 च्या दोन-तीन -चार पाच सहा 11 आणि 12 डिसेंबर रोजी सहायक लिपिक या पदासाठी ची परीक्षा घेतली होती. तर ही परीक्षा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रिक्त असलेल्या सहाय्यक लिपिक या पदासाठी १८४६ जागांसाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचे स्वरूप सांगायचे झाले तर इंग्रजी भाषा मराठी भाषा सामान्य ज्ञान चाचणी आणि भौतिक क्षमता चाचणी अशा चार विभागांमध्ये परीक्षेचे विभाजन केले होते. तर परीक्षा हे पूर्णपणे 200 गुणांची होती. त्यामध्ये शंभर प्रश्नांचा समाविष्ट होता म्हणजेच दोन गुणांसाठी एक प्रश्न असे परीक्षेचे स्वरूप होते. तर जे उमेदवार या परीक्षेसाठी बसले होते त्यांना एक तास आणि चाळीस मिनिट या वेळेच्या आत हा 200 गुणांचा पेपर द्यायचा होता.

परीक्षेची काही ठळक मुद्दे :-

परिक्षा घेणारी यंत्रणा मुंबई महानगरपालिका
परिक्षेचे स्वरूपऑनलाइन कॉम्पुटर वर
प्रश्न आणि गुण संख्या मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी
प्रत्येकी २५ प्रश्न आणि प्रत्येक अचूक उत्तरासाठी २ गुण
परिक्षेचा कालावधीडिसेंबर २ ते डिसेंबर १२ , २०२४ पर्यंत घेण्यात आली होती.
पदाचे नाव कार्यकारी सहाय्यक पद.
अचूक उत्तर जाहीर अद्याप नाही लवकरच करतील.
निकालाची दिनांकडिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात शक्यतो.
निकाल पहायची अधीकृत संकेत स्थळ https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
भरावयाच्या जागा१८४६ रिक्त पदासाठी भरती घेण्यात आली होती.
नोकरी ठिकाण BMC मुंबई.

BMC CLERK पदासाठी निवड प्रक्रिया:-

तर मित्रांनो २ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत घेण्यात आलेल्या BMC CLERK (लिपीक) पदासाठीच्या परीक्षेचा निकाल हा आता अवघ्या काही दिवसातच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर एकदा का निकाल जाहीर झाला की तुम्ही तो BMC च्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन अगदी काही मिनिटात तुमचा निकाल पाहू शकता. या परीक्षेची answer key सुद्धा लवकरच वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार तुम्ही तुमच्या गुणांचा अंदाज लावू शकता. तर आता पाहूया की जर तुमचा निकाल लागला आणि तुम्ही लिपिक सहायक या पदासाठी निवडले गेले तर कशापद्धतीने निवडले जाचाल,

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक सहायक पदासाठी तुम्ही BMC ने घेतलेली मुख्य परिक्षा दिलेली असायला पाहिजे.
  • तुम्ही दिलेल्या परीक्षेची संपूर्ण तपासण्याची प्रक्रिया झाल्यावर BMC Cutt off नुसार तुम्हाला किती गुण मिळालेत आणि तुम्ही मेरिट मधे अलात का या आधारावर निवड करेल.
  • आत्तापर्यंतचा BMC चा Cutt off खाली दिलेला आहे . त्यानुसारच तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्याला किती गुण भेटतील आणि आपली निवड होईल का नाही .

BMC CLERK EXPECTED CUTT OFF :-

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अंदाजे cutt off२०० गुणांपैकी १५० ते १६० गुणांपर्यंत लागू शकतो.
आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या उमेदवारांचा cutt off १४० ते १५० गुणांच्या दरम्यान लागू शकतो.
OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी१३० ते १५०
SC ST साठी ११५ ते १३५
वरील अंक हे आत्तापर्यंतच्या निकालाच्या आधारे आहेत. या दरम्यान निकाल लागू शकतो.

BMC CLERK RESULT PDF DOWNLOAD PROCESS STEP WISE :-

मुंबई महानगरपालिका त्यांच्या आधिकृत संकेतस्थळावर निकाल प्रकाशित करेल. तो निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा निकाल पाहा.

  1. सर्वात प्रथम BMC च्या अधिकृत वेबसाईटवर https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous क्लिक करा.
  2. त्यानंतर तुमच्या समोर महानगरपालिकेचा मुख्य पृष्ठ समोर येईल त्यामध्ये career येथे क्लिक करा.
  3. त्यानंतर मुख्य कार्मिक अधिकारी हा पर्याय क्लिक करा तुमच्या समोर निकाल येऊन जाईल.
  4. तुमच्या परीक्षेचा अनुक्रमांक आणि तिथे मागितलेल्या महितेच्या आधारे पण तुम्ही निकाल पाहू शकता.
  5. त्यामधून तुमच्या पदाच्या निकालाची लिंक तपासा आणि त्यावर क्लिक करा. आणि शेवटी तुमचे नाव त्या लिस्ट मधे आहे का हे बघा.
  6. तेथेच तुम्हाला तुमचा निकाल pdf स्वरूपात पण डाउनलोड करता येईल.

अशा प्रकारे तुम्ही वरील स्टेप्स फॉलो करून तुमचा BMC CLERK RESULT अचूक पाहू शकता. निकाल लागल्यानंतर मेरिट मधे आलेल्या उमेदवाराला लगेच काही दिवसातच पदावर रुजू होण्यासाठी ची माहिती महानगरपालिकेकडून कळून जाईल.

---Advertisement---

Leave a Comment