व्हेंडर सिलेकशन :
तर नमस्कार मित्रांनो आपण मागच्या सहा महिन्यांपुर्वी मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी आपण सर्वांनी फॉर्म भरलेत. त्यासाठी अर्जाची स्थिती काय आहे अर्जामध्ये काही त्रुटी आहे का अर्जासाठी केवायसी ची गरज आहे का या सर्व गोष्टी मी पाहण्यासाठी सोलर पंप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची स्थिती पहा. अर्जाची स्थिती पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाकून त्यामधे तुम्हाला लॉगिन करावे लागेल तेथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कळेल पेमेंटचा ऑप्शन वगैरे असेल तर तेही समजून जाईल. तर मागेल त्याला सोलार या योजनेमार्फत बऱ्याच लोकांनी अर्ज भरले असून त्यांना पेमेंट ऑप्शन देखील आलेले आहेत त्यासाठीच मेसेज त्यांना त्यांच्या मोबाईल वरती पाठवण्यात आलेला असून त्यासाठीच पेमेंट देखील सर्वांनी केलेल्या आहे.
मग आता प्रश्न उरतो की आपण भरलेले पैसे यानंतर आपल्याला सोलर भेटले का जर आपल्याला सोलार भेटले तर त्यासाठी ज्या कंपनीचे आपल्याला सोलर आपल्या शेतामध्ये बसवायचे आहे त्या कंपनीचे सिलेक्शन कसे करायचे. वेंडर सेलेक्शन केल्यानंतर सोलर पंप आपल्या शेतात येऊन बसवणे पर्यंतची काय प्रोसिजर आहे ते आपण या पोस्टमध्ये पाहुया.
पहिल्यांदा जाणून घेऊया की नेमकी योजना काय आहे :-
सरकारच्या मागील त्याला सोलार पंप योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील मागील त्या शेतकऱ्याला सोलार देण्याचा सरकारचा या योजनेचा हेतू आहे. यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना सोलार पंपाची आवश्यकता आहे तेथे शेतकरी मग तो कोणीही असो तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेचे स्वरूप सांगायचे झाले तर सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सोलार पंप च्या अगदी दहा टक्के रक्कम फक्त भरायचे आहे तसेच एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी पाच टक्के रक्कम भरायचे आहे आणि उर्वरित रक्कम ही महाराष्ट्र शासन अनुदानाच्या स्वरूपामध्ये भरणार आहे. तर या योजनेमागचा निव्वळ हेतू सांगायचा झाला तर हाच की राज्यातील शेतकऱ्यांना दिवस उपलब्ध करून देणे. आणि विज बिल पासून शेतकऱ्याची मुक्तता करणे ज्यामुळे शेतकऱ्याचे जीवन हे सुखी होईल आणि त्याला वीज बिलाचा बोज सहन करावा लागणार नाही.
या योजनेमार्फत शेतकऱ्यांना तीन एचपी पाच एचपी आणि साडेसात एचपी पर्यंत सोलार पंप भेटणार आहेत. यासोबतच त्या सोलर पंपाची पाच वर्षाची हमी देखील मिळणार आहे त्याचबरोबर त्या सोलर पंपाचा इन्शुरन्स देखील भेटेल. तर ज्या शेतकऱ्यांना अळीचे करा पर्यंत म्हणजे एक हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना तीन एचपी चा सोलर पंप भेटेल आणि ज्या शेतकऱ्यांना पाच एकरपर्यंत म्हणजे दोन हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना पाच एचपी चा सोलर पंप भेटेल आणि दोन हेक्टरीपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना साडेसात एचपी चा पंप भेटून जाईल.
वेंडर कंपनी निवडताना घ्यावायची काळजी :-
शेतकरी मित्रांनो आपल्याला सोलर पंप मंजूर झाल्यानंतर कोणत्या वेंडर म्हणजेच कोणत्या कंपनीचा सोलार बसवायचा याचे संपूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य असते त्यासाठी काही बऱ्याच कंपनीकडून थेट शेतकऱ्यांना कॉल येतात आणि ओटीपी विचारपूस केली जाते परंतु कसल्याही प्रकारचा ओटीपी तुम्ही त्यांना सांगू नका कारण त्या कंपन्या otp घेऊन ते त्यांची कंपनू सिलेक्ट करतील आणि त्याच स्वातंत्र्य तुमचं निघून जाईल आणि त्यांच्या पद्धतीने लागेल मग तो वेंडर ती कंपनी कशी आहे काय आहे याबद्दलची तुम्हाला कसलीही कल्पना नसणार काही तांत्रिक अडचणी असल्या नंतर सर्विस किंवा इन्शुरन्स मध्ये काही अडचण येऊ शकतात तर tuत्यामुळे करण्यासाठी आलेल्या कॉल ला उत्तर रिसिव्ह करू नका किंवा केलास तर ओटीपी विचारल्यास अजिबात सांगू नका.
वेंडर कंपनी सिलेक्ट करताना कसल्याही प्रकारची गडबड करू नका कारण एका वेल्डर कंपनी सिलेक्ट केल्याच्या नंतर ती कसली आहे बाबतीत बदलता येणार नाही त्यामुळे वेंडर कंपनी निवडताना तेवढी काळजी बाळगावी. वेंडर कंपनीच्या लिस्टमध्ये भरपूर साऱ्या कंपन्यांची यादी तुम्हाला समोर दिसेल त्यामध्ये ज्या कंपन्यांचा कोटा पूर्ण झाला असेल त्यांचे नाव आपोआप त्या यादीमधून कमी होईल. वेंडर सिलेक्शन करते वेळेस कंपनी बद्दल सर्व काही माहिती दिलेली असते त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा पत्ता त्यावर तुम्ही संपर्क साधून कंपनीच्या सर्विस बद्दलची चौकशी करा त्यामध्ये तुम्ही किती दिवसांमध्ये इंस्टॉलेशन करून द्याल तुम्ही समान कुठून आणाल नंतर काही अडचण आल्यास तुम्ही त्याची सर्विस कशी द्याल अशा प्रकारची चौकशी तुम्ही करा.
अशी निवडा व्हेंडर कंपनी :-
तुमचं पेमेंट झाल्यानंतर वेंडर सिलेक्शन चा ऑप्शन आल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या भागांमध्ये अगोदरच ज्यांच्या विहिरीवर शेतामध्ये सोलार पंप बसवण्यात आले आहेत अशा शेतकऱ्यांची भेट घ्या त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या की कोणत्या कंपनीचा सोलर पंप हा दीर्घकाळ चालू शकतो काहीही तांत्रिक बिघाड न होता किंवा काही तांत्रिक अडचणी वगैरे आल्यास कोणती कंपनी तक्रारी अर्ज केल्यानंतर लवकरात लवकर प्रतिसाद देते अशा प्रकारच्या काही चौकशी तुम्ही करून योग्य ती कंपनी तुम्ही निवडू शकता. त्या बाबतीत तुम्हाला कसलेही जबरदस्ती केली जात नाही. की तुम्ही हीच कंपनी निवडावी तीच कंपनी निवडावी.
तुम्हाला कंपनी निवडण्याचे पूर्णपणे स्वतंत्र्य आहे. यामध्ये होतं असं तुम्ही कोणाचा तरी ऐकून कुठले तरी वेगळीच कंपनी सेट करता आणि नंतर मग इन्स्टॉलेशन च्या वेळेस त्यांच्याकडे जे जे पाहिजे ते सामान नसतात किंवा वाहतुकीसाठी वाहने नसतात. मग ते तुम्हाला कॉल करतात आणि इथपर्यंत या इथून तुमचं सामान घेऊन जा सिमेंट नाही वाळू नाही मजदूर नाही. अशा प्रकारचे त्यांच्या काही अडचणी तुमच्यासमोर येतात हे सर्व टाळण्यासाठी अगोदरच तुमच्या हातात आहेत त्या तोपर्यंत तुम्ही कंपनी निवडताना त्या कंपनीचा पूर्णपणे सखोल अभ्यास करून मगच कंपनी निवडा
वेंडर सिलेक्शन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन त्यामध्ये त्यामध्ये जाऊन योग्य वेंडर सिलेक्शन करा त्याचबरोबर तुमच्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी किंवा तुमचा अर्जामध्ये काही त्रुटी आहे का हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व काही पाहू शकता. व्हेंडर सिलेक्ट करताना त्या यादी मधे तुम्हाला पाहिजे तो कंपनी आहे का पहा. तुम्हाला पाहिजे असलेली कंपनी यादीमध्ये नसल्यास त्या कंपनीचा ठरवलेला कोटा संपलेला आहव असा समजा. आणि पुन्हा नवीन कोटा तयार होईपर्यंत वारंवार खाली दिलेल्या लिंक वरती जाऊन कंपनी चे नाव येते का पहा.
अधिकृत वेबसाईड :- https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php
तर अशा प्रकारे राज्य सरकारकडून सर्व शेतकऱ्यांसाठी मोफत सोलर पंप देण्यात येणार आहे आणि त्यासाठी वरील दिलेल्या काही गोष्टींच्या पाठपुराव्यानंतर तुम्ही तुमच्या शेतात सोलर पंप बसवण्यासाठी व्हेंडर कंपनी निवडा. मागेल त्याला सोलर पंप देऊन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वीज बिल भरण्यासाठी ची चिंताच मिटवण्यासाठी चा हा एक खूप मोठा प्रयत्न म्हणता येईल. राज्य सरकार कडून घेण्यात येणाऱ्या अधिवेशनात देखगील मागेल त्याला सोलर पंप या योजनेबद्दल वारंवार उल्लेख करण्यात येतो. त्यामुळे ही योजना अगदी विश्वासू आहे असा म्हणता येईल. शेतकऱ्यांनी सोलर पंप बसवताना कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करायची नाही.
ही योजना पूर्णपणे सरकारी अनुदानवर चालते. काही शेतकरी यांना जर का कॉल द्वारे किंवा मेसेज वरून पैश्यांची मागणी करून सोलर पंप बसवण्याच्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नये. सरकार कडून योग्य वेळी योजनेबद्दलची वरील दिलेल्या लिंक मधील साईट वरती देण्यात येते. सतत अपडेटे राहण्यासाठी वारंवार वरील दिलेल्या लिंक वरती जाऊन काही योजनेमधें बदल झाले आहेत का ते पाहावे. या योजनेमुळे शेतकऱ्याचे जीवन खुप प्रमाणात सुधारणार आहे. यामुळे शेतकऱ्याला विजेवर्ती अवलंबून राहून शेती करावी लागणार नाही.