डिंगा डिंगा वायरस
२०२० या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोना महामरिने थैमान घातले होते. त्यामधे लाखो लोकांना जीव गमवावा लागला. त्यावेळेस संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते. सर्व उद्योग , शाळा , कॉलेज, कारखाने एवढच काय तर रस्त्यावर एकही माणूस दिसत नव्हता . ते दिवस आठवले तर आत्ता देखील त्याची भायावता डोळ्यासमोर उभी राहते . माणसांना उपचारासाठी बेड भेटतं नव्ये तर कुठे ऑक्सिजन तर कुठे औषधे मिळत नव्हती अशी भयावह परिस्थिती सर्वांनी पहिली आहे. त्यातच आता अजून आफ्रिकेच्या युगांडा मधे एका विचित्र आणि नव्याच आजारच आगमन झालं आहे . हा आजार आत्तापर्यंतच्या सर्व आजारांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळा आहे .
आत्तापर्यंत आपण ऐकल आणि अनुभवलं आहे की आजारी असताना माणूस हा झोपून उपचार घेतो किंवा आराम करतो. परंतु युगांडा मधे थैमान घातलेल्या व्हायरस च काही वेगळच आहे. तर या व्हायरस चा प्रादुर्भाव झाल्यास माणूस एका ठिकाणी न थांबता सतत नाचत राहतो असा काही प्रकार आफ्रिकेतील युगांडा येथे घडत आहे. दिवसेंदिवस या मधे वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे.हा आजार जर का संपूर्ण जगभर पसरला तर नक्कीच सर्वत्र जगभरात कोरोना सदृश्य परिस्थिती निर्माण होईल याबद्दल कसलीही शंका नाही.
वायरस ला dinga dinga नाव कसं पडल :-
आपल्याला एकच माहिती आहे जेवढं शरीर सदृढ तेवढं आयुष्य सुखी. निरोगी शरीरा येवढं दुसरी कोणतीही संपत्ती नाही. यामध्येच आफ्रिकेमध्ये युगांडा मध्ये सर्व स्त्री पुरुष हे डिंगा डिंगा या आजाराने अगदी त्रासले आहेत. तर हा आजार पीडित व्यक्तीला नचायल भाग पाडतो त्याला पूर्णपणे अस्वस्थ करतो. ऐकायला थोडंसं नाही तर अगदी विचित्रच असलं तरीही हे सत्य आहे . या आजाराला dinga dinga नाव पडण्यामागे कारण आहे . हा आजार ज्या प्रांतामध्ये होतोय तेथील बोलीभाषेमध्ये dinga dinga म्हणजे सतत नाचत राहणे अस्वस्थ राहणे. यामुळे याच्या अशा या लक्षणामुळे या आजाराला dinga dinga म्हणजे सतत नाचत राहणे असा नाव पडले. तर युगांडाच्या Bundigyo या परिसरात या आजाराचे जास्त बळी पडले आहेत. आत्तापर्यंत च्या आलेल्या आकडेवारीनुसार या आजाराचे ३०० रुग्ण आढळले आहेत.
डिंगा डिंगा आजाराची लक्षणं काय :-
या आजाराने स्त्री पुरुष हे सर्वच त्रस्त झाले आहेत. या आजारामध्ये शरीरामध्ये व्हायरस शिरल्यानंतर शरीरामध्ये अनैच्छिक हालचाली सुरू होतात त्याचबरोबर आजारी व्यक्ती झटकत झटकत चालतो. तो सामान्य पने चालू नाय शकत. त्यातच झटक्यामुळे त्याला त्रास होतो. यावर उपचार म्हणून तेथील स्थानिक डॉक्टरांनी अँटिबायोटिक्स चे डोस चालू केले आहेत. परंतु सतत हालचाल सुरू राहतं असल्याने व्हायरस त्रस्त माणसाला अशक्त पणा येणे आणि लकवा झाल्यासारखं जाणवणे असे प्रकार घडत आहेत. चांगली गोष्ट म्हणायचं झालं तर या आजारामुळे आत्तापर्यंत सध्या तरी एकही पीडित व्यक्तीने आपला जीव गमावला नाही . परंतु हा आजार झपाट्याने पसरत चालला आहे . यासाठी हा आजार आला कुठून यावर उपाय काय याचे तगढे आवाहन आता च्या घडीला तेथील डॉक्टरांच्या समोर आहे.
तेथील स्थानिक डॉक्टर कियिता ख्रिस्तोफर यांनी सांगितलं आजारावर उपचार :-
dinga dinga साठी स्थानिक पातळीवरील आरोग्य पथकाकडून देण्यात येत असणाऱ्या अँटिबायोटिक्स चा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान आम्हाला समजल की काही लोक लक्षण कमी करण्यासाठी वनौषधींचा वापर करत आहेत , परंतु सर्व आरोग्य पथकाकडून याला तीव्र विरोध आहे. वनौषधींनी या आजारावर कसलाही उपचार होत असल्याचे वैज्ञानिक पुरावा देत नाहीत. परंतु विशिष्ठ अँटिबायोटिक्स वापरून रुग्ण साधारणतः आठवड्याभरात बरे होतायेत. त्यामुळे आम्ही स्थानिकांना आरोग्य पथकाकडून उपचार घेण्यासाठी सांगतोय. अशी माहिती डॉ. ख्रिस्तोफर यांनी दिली आहे.
तर या आजारावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर देखील उपाययोजना आणि सौंशोधन सुरू झाले आहे. सध्यातरी तेथील लोकांच्या समोर या आजारातून बाहेर येणे म्हणजे फार मोठे संकट दिसत आहे . कारण हा आजार नेमका कुठून आलाय त्याचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल त्यासाठी काय काय पथ्य पाळावी लागतील . त्यासाठी लागणारी उपाययोजना कामाला लावावी लागेल अशा अजून खूप साऱ्या गोष्टीचं संकट सध्या आफ्रिकेच्या प्रशासनासमोर उभे आहे. जर का या आजारावर लवकरात लवकर रोख बसवता आला नाही तर याच रूपांतर भविष्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण जगभरात पसरण्यास वेळ लागणार नाही .
यावर सगळीकडून सौंशोधन सुरू झाले असून जगभरात हा आजार पासरण्यापासून का रोखता येईल हे मोठं आवाहन आहे. जर का हा आजार जगभर पसरला तर मग corona महामारीसारख सर्वांना याही आजाराला समोर जव लागेल. आता सर्व देशाचे याच गोष्टीकडे लक्ष लागून आहे की हा आजार लवकरात लवकर कसा जगामधून दूर करण्यात येईल आणि कमीत कमी लोक या आजारापासून बाधित राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.