---Advertisement---

अमित शहा यांच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावरून वाद

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
अमित शहा यांच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावरून वाद
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी संसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने संपूर्ण देशभरात वादाची ठिणगी पेटली आहे. त्यांच्या त्या बोलण्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर वेगवेगळ्या स्थानिक पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय. त्याचबरोबर ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत . देशभरासह महाराष्ट्र राज्यात पण ठिकठिकाणी आंदोलन सुरू केली आहेत. आणि त्यामाध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बऱ्याच नेत्यांनी आंदोलनात सहभाग करून निषेध व्यक्त केला आहे. तसेच आदित्य ठाकरे, रोहित पाटील , रोहित पवार आणि काँग्रेस क्या अनेक नेत्यांकडून विधानभवनात समोर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन त्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

अमित शहा यांच्या वक्तव्यवरून विरोधी पक्षांकडून टीका

तर राज्यासह देशभरातून अशा प्रकारच्या टीका होत असताना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच आंबेडकर यांच्या कायम विरोधात आहे हे बऱ्याच दा सगळ्यांसमोर देखील आलय. भाजप हा आंबेडकर यांचा सन्मान करतो असा देखील त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर देताना पत्रकार परिषदेत म्हंटले आहे. मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काही भाषणाच्या मध्मातून देशाला संबोधित करतो त्यामध्ये खूप सारे व्हिडिओज सध्या viral केले जात आहेत. त्या व्हिडिओज मधे बऱ्याच चुकीच्या क्लिप्स एडिट करून viral केल्या जात आहेत. तर या viral क्लिप्स मागे काँग्रेस चाच हात असल्याचं स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिलं.

तर नेमक अमित शहा लोकसभेच्या अधिवेशनात कोणत्या विषयावर बोलत असताना त्यांच्याकडून हे विधान बोललं गेलं आणि त्याचा काय काय चुकीचा अर्थ किंवा नेमकं तथ्य काय पाहूया या पोस्ट च्या माध्यमातून.

अमित शहा यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :-

  • आजकाल आंबेडकर यांचं नाव घ्यायचं एक फॅशन झाली आहे . आंबेडकर आंबेडकर आंबेडकर येवढं नाव जर का तुम्ही देवाचं घेतल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त झाला असता असा वक्तव्य त्यांनी केलं.
  • आम्हाला आनंद वाटतो की तुम्ही आंबेडकरांचे नाव घेता. आता तुम्ही आंबेडकरांचे नाव १०० पेक्षा जास्त वेळा जरी घेतल तरी देखील त्यांच्या बद्दल तुमच्या भावना काय आहेत ते मी सांगतो.
  • बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता.
  • त्यानी अनुसूचित जाती जमाती साठी मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आपण असमाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं
  • सरकारच्या परराष्ट्र धोरणाशी असहमत आहे आणि कलम ३७० बद्दल देखील ते असहमत होते.
  • त्या वेळेस त्यांना जे आश्वासन दिले होते ते तेंव्हा पूर्ण केलं गेलं नव्हत त्यामुळं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
  • असे हे यांचे विचार आहेत. फक्त मतासाठी त्यांच्या नावाचा वापर कारण हे कितपत योग्य आहे.
  • काँग्रेस ने १९५१-१९५२ च्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला.
  • काँग्रेस ने आंबेडकरांना भारत रत्न देण्यास विरोध केला. आणि काँग्रेस च्या अनेक नेत्यांना भारतरत्न दिलं.
  • काँग्रेस च्या अनेक नेत्यांची देशभरात स्मारक बांधण्यात आली परंतु आंबेडकरांचे एकही स्मारक बांधलं नाही.
  • नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आंबेडकरांचे स्मारक बांधलं आणि त्यांचा गौरव केला असा अमित शहानी संसदेत केलेल्या भाषणात म्हणाले.

हे वरील अमित शहा यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे आहेत तर याव्यतिरिक्त इतर वेगळेच चुकीचे व्हिडिओज लोकांमध्ये पसरून चुकीचा माहिती जनतेला देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात येतोय. तर अमित शहा यांचं मूळ भाषण आणि viral क्लिप्स यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचं देखील सांगण्यात येतय.

अमित शहाणी केलेल्या वक्तव्यावरून देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांसाठी निदर्शने करण्यासाठी आता एक हातचा मुद्दा भेटलेला आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यावरण देशभरामध्ये तसेच राज्यभरामधील नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षांमधील असलेल्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी अमित शहा यांचा विरोध करत त्यांच्या आंबेडकर यांच्या वरती केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. अमित शहा यांच्या या वक्त्यामुळे विरोधकांना हातचा विषय भेटला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी देखील टीका केली आहे

काय म्हणाले आदित्य ठाकरे:-

देशाची जनता आज रस्त्यावर उतरली आहे कारण हा अपमान फक्त महामानवाचा झाला नाही तर हा अपमान देशाच्या जनतेचा , संविधानाचा देखील अपमान झाला आहे. आज आठवले, चंद्राबाबू , नितीशकुमार हे भाजप बरोबर राहणार आहेत का याच उत्तर त्यांनी द्यावं. आज भाजपचे असे बरेच आमदार स्वतःला आंबेडकरवादी मानतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देव मानतात तर ते आता राजीनामा देतील का असा वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं.

सतेज पाटील काय म्हणाले पाहू :-

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अमित शहा यांनी जे काही वक्तव्य केलं त्यावर चर्चा करायला काय हरकत आहे . तुम्ही तुमची बाजू मांडा आम्ही आमची बाजू मांडतो जे काही सत्य असेल ते विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेच्या समोर येऊद्या. अमित शहा यांचं वक्तव्य संपूर्ण देशाने पाहिलं आहे त्यामुळे त्यांनी यावर कोणताही उतारा दिला तरीही कसलाही उतारा चालणार नाही असा वक्तव्य सतेज पाटील यांनी केलं आहे.

अमित शहा यांच्या मते हिंदू कोड बिल, परराष्ट्र धोरण अशा बऱ्याच मुद्द्यावरून नेहरू आणि आंबेडकर यांच्या मधे मतभेद होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये सांगली संबंध नव्हते अशा प्रकारचे मत अमित शहा यांनी यांनी लोकसभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये व्यक्त केले. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये साम्य कधीच नव्हते काँग्रेसने नेहमी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊन काम केलेले नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा कधीही काँग्रेसने आदर केलेला नाही अशा प्रकारचे विधान अमित शहा यांनी लोकसभेमधील केलेल्या भाषणामध्ये व्यक्त केले.

तर त्यावेळेस पुणे करारानुसार राखीव जागांसाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता परंतु या प्रस्तावाला काँग्रेस चे त्यावेळचे ज्येष्ठ नेते सरदार वल्लभ भाई पटेल यांचा विरोध होता. त्यावरून आंबेडकर यांनी सभा सोडून जाण्याची धमकी दिली होती त्यामुळं वल्लभभाई पटेल हे शांत बसले होते. हिंदू कोड बिलावरून देखील आंबेडकर आणि तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यात एकमत नव्हते. त्यामुळे अमित शहा यांनी काँग्रेस च आणि आंबेडकरांचे कधीच एकमत नाही असा म्हंटल आहे. अशा प्रकारचे देशामधील वातावरण भडकवणारे आणि विरोधी पक्ष नेत्यांना टीका करण्यासाठी हातचा मुद्दा देणार अमित शहा यांचा लोकसभेमधील भाषण हे संपूर्ण देशभरामध्ये गाजत आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी भाषणाद्वारे केलेल्या वक्तव्याबद्दल देशभरामध्ये निदर्शने करत कडाडून विरोध होत आहे.

भाजपमधील काही नेत्यांकडून असे सांगण्यात येत आहे की अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या भाषणामध्ये आणि प्रसार माध्यमांद्वारे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खूप तफावत आहे आणि आम्ही शहा यांनी केलेले वक्तव्य आणि लोकांपर्यंत पोहोचलेले व्यक्तव्य यामध्ये खूप फरक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर आम्ही चहा यांचे वक्तव्य हे चुकीच्या पद्धतीने देशातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे देखील भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. अमित शहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कसल्याही प्रकारचा अपमान केला नाही असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. काँग्रेसकडूनच वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान झाल्याची टीका देखील भाजप नेत्यांकडून होत आहे.

देशभरातील होत असलेल्या आंदोलनावरून आणि विरोधी पक्ष नेत्याकडून होत असलेल्या टिकी वरून अमित शहा त्यांनी केलेले विधान मागे घेतात का आणि झालेल्या व्यक्तीबद्दल माफी मागतात का याकडे सर्व देशातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. देशभरामध्ये या वक्तव्याच्या विरोधात आंदोलने आणि निदर्शने होत असल्यामुळे देशांमध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण होत आहे. यामधून मोठे आंदोलने होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

---Advertisement---

Leave a Comment