---Advertisement---

भारतीय वायुसेनेमधे भरती 2025

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
भारतीय वायुसेनेमधे भरती 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

ज्या ज्या तरुणांना देशाच्या सेवेसाठी मिलिटरी किंवा अग्निवायु मधे काम करायचं असत परंतु अर्ज करणाऱ्यांची संख्या जागांची उपलब्धता आणि हाई मेरिट यामुळं कित्येक वर्ष तयारी करून देखील बरेच तरुणांचं हे स्वप्न स्वप्नच राहत. यासाठी सरकारने ‘ अग्निविर ‘ योजनेअंतर्गत देशातील देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि नोकरीची संधी देण्यासाठी हि योजना अमलात आणली असून यामार्फत ४ वर्षासाठी तरुणांना नोकरीची संधी दिली जाते. हि योजना सरकारने १४ जुलै २०२२ रोजी मंजूर करून अगदी काही दिवसातच तिच्यावर अंमलबजावणी देखील केली. या योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये भरती केली जाते. यामार्फत रुजू झालेल्या उमेदवारांना कमिशंड अधिकाऱ्याच्या श्रेनिपेक्षा कमी श्रेणी दिली जाते.

अग्नीविर योजनेअंतर्गत वर्ष २०२५ मधे भारतीय वायुसेनेमध्ये भरती निघालेली आहे. तरी त्यासाठी किती जागा आहेत, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप अशा सर्व गोष्टी आपण पाहूया.

भारतीय वायुसेनामध्ये एकूण भरावयाच्या जागा :- संख्या निश्चित नाही.

पदाचे नाव अग्णिविर वायु इंटेक १/२०२६

शिक्षण :- बारावी उत्तीर्ण ५०% गुणांसह असलेले.

  • भारतीय हवाईदल अग्णीविर वायू भरती २०२५:-
  • विषयांचा समावेश:- गणित , भौतिकशास्त्र आणि इंग्रजी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इंजिनिअर डिप्लोमा / ऑटोमोबाईल/ कॉम्पुटर सायन्स.

छाती – पुरुषांसाठी ७७ सेमी फुगवून

  • या पदासाठी शारीरिक पत्रता:- उंची – पुरुषांसाठी १५२.५ सेमी तर महिलांसाठी १५२ सेमी.
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारतात कुठेही
  • उमेदवाराची वयोमर्यादा :- अर्ज करणाऱ्याचा जन्म हा १ जानेवारी २००५ ते ०१ जुलै २००८ यादरम्यान झालेला असावा.
  • परिक्षा अर्ज शुल्क. : – ५५० + GST
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख. :- २७ जानेवारी २०२५
  • परीक्षेची तारीख :- मार्च २२, २०२५ पासून.
  • परीक्षेचा मोड : – ऑनलाईन
  • https://agnipathvayu.cdac.in/AV/. या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करा.

भारतीय वायुसेनेच्या भरतीबदल थोडक्यात :

पदे – तांत्रिक आणि गैरतंत्रिक यामध्ये ग्रुप X आणि ग्रुप Y ऑफिसर चा समावेश असतो.

या पदासाठी कोण कोण पात्र असणार : वरती दिल्याप्रमाणे आग्निविर वायुसेना भरतीसाठी ज्यांची १२ वी ५०% गुणांसह उत्तीर्ण आहेत ते आणि ज्यांचे वय वर्ष 16 आहे ते उमेदवार पत्र असतील + भौतिकास्त्र , गणित , आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असावा. या दिलेल्या विषयांसह अर्ज करणारे उमेदवार हा 50 टक्के गुणांची मर्यादा देखील पास करणारा असावा. शैक्षणिक पात्रतेसाठी इत्यादी अटींमध्ये उमेदवार बसायला हवा.

पदांसाठी निवड प्रक्रिया कशी असेल : अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल . त्यानंतर त्यामधे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मैदानी चाचणी साठी बोलावण्यात येईल . पदानुसार मुलाखती चाचणी पण घेतली जाईल. उमेदवार लेखी परीक्षेसाठी पास होतील त्यांची मैदानी चाचणी आणि ज्यादा ठरलेल्या पदांनुसार मुलाखत चाचणी झाल्यानंतर लागलेल्या मेरिटनुसार त्या त्या कास्ट कॅटेगरीनुसार जेवढे काही मेरिट लागेल त्यातील ठराविक उमेदवार हे पदासाठी नियुक्ती केली जातील.

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल : ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्यांनी समोर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वरती क्लिक करून https://agnipathvayu.cdac.in/AV/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचं आहे शेवटी पेमेंट करून अर्ज सबमिट करायचा आहे. पेमेंट साठी ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड चा वापर करून पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल अशी नोटिफिकेशन समोर येईल. त्यालाच payment केल्याची पावती असल्याचा पुराचा म्हणुन तुमच्या कडे जपून ठेवा.

हॉलतिकीट : अग्निविर् पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या अगोदर काही दिवस आधी हॉल तिकीट देण्यात येईल ऑनलाइन. ते वेबसाईट वरून डाउनलोड करून ठेवायचे आहे आणि परीक्षेला जाताना सोबत घेऊन जायचे आहे. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही.आता हे हॉल तिकीट कधी मिळणार याबाबर सध्यातरी कसल्या हि प्रकारची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यावर आलेल्या अर्जंक्रमांकाचा अनुक्रमांक जपून ठेवाच आहे. कारण त्याच अर्ज अनुक्रमांकाच्या आधारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे.

रिझल्ट : परीक्षेचा निकाल हा अधिकृत वेबसाईटवर परीक्षा झाल्यानंतर ठरलेल्या वेळेत अपलोड केला जाईल. जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांना पुढील शारीरिक परीक्षा किंवा मैदानी परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.सध्यातरी परिक्षा निकाल संदर्भात कसलीही माहिती समोर आलेली नाही आहे. परीक्षा झाल्यानंतर संपूर्ण पेपर तपासून लवकरच निकाल अधिकृत संकेत स्थळावर प्रदर्शीत कारणात येईल. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या हॉल तिकीट वरील माहितीच्या आधारे निकाल पाहता येईल.

अशा प्रकारे सरकारी नोकरी आणि देशाची सेवा करू इच्छिाऱ्यांसाठी हि एक मोठी संधी म्हणल तरी चालेल. जे कोणी इच्छुक उमेदवार असतील ते दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करून परीक्षा देऊ शकता.

---Advertisement---

Leave a Comment