
महाराष्ट्र हे राज्य पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे . या राज्यात नैसर्गिक संपत्ती भरभरून साठलेली आहे. भौगोलिक रचना हि अत्यंत आकर्षक आणि विलोभनीय आहे. त्यात सांगायचं झालं तर सह्याद्री पर्वताच्या रांगा, समुद्र किनारा , प्राचीन मंदिरे, शिवाजी महाराजांनी बांधलेले अप्रतिम असे गडकिल्ले, नैसर्गिक वाहणाऱ्या नद्या त्या आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि बराच काही अशा विविध ठिकाणी तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता. वर्षांच्या प्रत्येक ऋतुमध्ये फिरायला जायचं महणल तर वेगवेगळी ठिकाणी तुम्हाला भेटून जातील . जसा की पावसाळ्यात ओसंडून वाहणारा धबधबे, हिरवा निसर्ग , सह्याद्री पर्वत रांगा मधे असलेले किल्ले हे तर पावसाळ्यात जणू हिरवा शालू पांघरल्यासारखे सुंदर दिसतात. तसेच उन्हाळ्यात पण थंड हवेची ठिकाणे भरपूर आहेत जसं की महाबळेश्वर, माथेरान ,कळसूबाई या ठिकाणांना तुम्ही उन्हाळ्यातील उष्णेतेपासून मोकळीक मिळण्यासाठी भेट देऊ शकता. सध्या दिवस चालू आहेत ते हिवाळ्याचे थंडीचे. आजकाल पावसाचा जोर कमी झाल्याने गुलाबी थंडीची लाट सर्वत्र महाराष्ट्रभर पसरली आहे. त्यामुळे मनाला प्रसन्न करणारी अशी भरपूर ठिकाणे सध्या सगळी खुलून दिसत आहेत . पर्यटनाच्या ठिकाणी तुम्ही खूप साऱ्या अडवेंचर स्पोर्ट्स चा आनंद घेऊ शकता . थोडक्यात तुम्हाला हिवाळ्यातील सहल आनंदित मजेत घालवायची असेल तर या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी निसर्गाने नटलेली सुंदर 10 ठिकाणांची माहिती या पोस्ट क्या माध्यमातून देत आहे. ती ठिकाणे कोणती ते पाहूया.
हिवाळ्यात पर्यटनाची 10 स्थळे. :-
१. रायगड जिल्ह्यातील माथेरान :-
माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे . हे पर्यटन स्थळ रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. येथील निसर्गसौंदर्य हे येथे येणाऱ्या पर्यटकांची मन हिरावून घेत. हे ठिकाण आपल्या कुटुंबासोबत किंवा शाळेच्या मुलांच्या सहलीसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. माथेरान हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून २६०० फूट इतके उंचीवर आहे. माथेरान च्या उंचीवर लाल माती आणि त्यात असणारी निसर्गातील विविध तेने नटलेली हिरवळ. विविध प्रकारची झाडे, फुले हे तेथील आणखीन एक आकर्षणाचं कारण बनत. तुम्ही माथेरान ला बस , रेल्वे किंवा तुमच्या प्रायव्हेट वाहनाने जाऊ शकता. रेल्वेने जायचे तर तेथील जवळचे रेल्वे स्टेशन नेरळ येथे तुम्हाला यावं लागेल. नेरळ रेल्वे स्टेशन पासून माथेरान हे फक्त १० किमी अंतरावर आहे. स्टेशन पासून तुम्हाला प्रायव्हेट वाहने भेटून जातील. रस्त्याने जायचं म्हणल तर मुंबई पासून ८० किमी तर पुण्यापासून १२० किमी येवढं अंतर आहे. तिथे वाहनांच्या पार्किंग ची व्यवस्था आहे. दुचाकी साठी ८० तर चारचाकीसाठी १०० रुपये इतके पैसे द्यावे लागतील. आत गेल्यानंतर लहान मुलांना २५ रुपये तर प्रौढ व्यक्तींना ५० रुपये एवढी प्रवेश फी देऊन तिकीट घ्यावं लागेल. वरती जाण्यासाठी तुम्हाला चार पर्याय असतील हॉर्स रायडिंग वरून जायचं असेल तर ४०० ते २००० रूपये पर्यंत पैसे द्यावे लागतील. दुसरा पर्याय बग्गी त्यासाठी ६०० ते २००० रुपये इतके चार्जेस आहेत. तिसरा पर्याय आणि सर्वात बेस्ट असा हि म्हणता येईल हा पर्याय म्हणजे Toy train या ट्रेन चे सेकंड क्लास तिकीट ५० रुपये तर फर्स्ट क्लास तिकीट ३३५ इतके आहे. तुम्ही २० ते २५ मिनिटात माथेरान ला पोहचून जाल. तेथे गेल्यावर तुम्हाला मधावजी पॉइंट , खंडाळा पॉइंट या ठिकणांहून सुंदर असा निसर्ग पाहता येईल.नंतर charllote lake , ceila point , king george point, ECCO point honeymoon point अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणांची भेट देऊन तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.
२. सातारा जिल्ह्यातील महाबेश्वर. :-
महाबळेश्र्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्हा येथील निसर्गसौंदर्याने प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण ओळखलं जातं ते येथील स्ट्रॉबेरी शेती, स्वच्छ पाणी, निसर्ग, सूर्यास्त होतानाच दृश्य आणि प्राचीन मंदिर. महाबळेश्र्वर मुंबईपासून २६० तर पुण्यापासून १२० किमी येवढ्या अंतरावर आहे. येथे तुम्ही इको पॉइंट ल भेट देऊन तुमचा आवाज वारंवार घुमत राहतो . तिथूनच २ मिनटांच्या अंतरावर needle hole point आहे जिथे हत्तीच्या तोंडाच्या आकाराचा डोंगरामध्ये प्रतिकृती तयार झालेली आहे. तुम्हाला तिथे राहण्यासाठी १२०० ते १४०० रुपया मधे राहण्यासाठी हॉटेल भेटून जातील. तिथे गेल्यावर वेना लेक हा तेथील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे तिथे तुम्ही स्ट्रीट फूड, बोटिंग, हॉर्स रायडिंग आणि स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद घेऊ शकता. बोटिंग साठी ६०० ते ८०० रुपयांपर्यंत खर्च येईल. हॉर्स रायडिंग साठी ३०० रुपये इतके चार्जेस आहेत. तिथून २ किमी अंतरावर सनसेट पॉईंट आहे दिवस मावळताना तुम्ही अतिशय सुंदर अशा सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. नंतर महाबळेश्र्वर च जुन मंदिर पाहायला विसरू नका. ते मंदिर पंचगंगा नदीच उगमस्थान आहे. जिथे कृष्णा, वेणा, सावित्री, कोयना , गायत्री या नद्यांचा उगमस्थान आहे. नंतर एल्फिन स्टल पॉइंट हे स्थळ सुंदर अशा पर्वत रांगा पाहण्यासाठी ओलाखल जात. या पॉइंट वरून पर्वत रंगाचं सुंदर अस दृश्य दिसत. आर्थर मलेट पॉइंट , टायगर पॉइंट आणि रात्री तेथील मार्केट मधील आकर्षक जेवणाचा आनंद घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही महाबळेश्र्वर ला भेट देऊन सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
३. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारा :-
हे ठिकाण आपल्या निसर्ग सौंदर्याची आणि तिथे असलेले भंडारा धारण यासाठी प्रसिद्ध आहे . हिवाळ्याच्या दिवसात येथे हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात. हे ठिकाण नगर जिल्ह्यातील अकोला या तालुक्यामधे आहे. या ठिकाणास तुम्ही बस, आणि प्रायव्हेट वाहनाने जाऊ शकता . येथील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणजे प्रवरा नदीवर असलेले धरण, त्याच्या आजूबाजूचा हिरवा निसर्ग. अगस्त्य ऋषींचा आश्रम तिथेच आहे. तेथूनच जवळच्या अंतरावर घाटघर हे ठिकाण आहे तिथे असणाऱ्या कोकणकडा या पर्वतावरील कडा पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथून तुम्ही सह्याद्री पर्वत रांगा पाहु शकता. त्यानंतर हरिश्चंद्र गड हा गड सर्वात कठीण आणि आकर्षक किल्ला आहे. येथे तुम्ही ट्रेकिंग करू शकता . सह्याद्रीच्या डोंगरात असलेला रतनगड किल्ला . तेथूनच जवळ असलेले अमृतेश्वर हे रतनवाडी गावातील प्राचीन आणि हेमाडपंथी मंदिर आहे. Umbrella Falls हा एक सुंदर असा धबधबा भंडारदरा धरणाच्या पाण्यावर तयार होतो आणि अतिशय सुंदर अस दृश्य निर्माण करत. त्याच्या समोर असलेल्या पुलावरून याचे दृश्य तुम्ही पाहू शकता. रंधा धबधबा आणि भांडार दरा धरण अशा प्रक्रार ची स्थळे तुम्ही भंडारदरा येथे पाहू शकता.
४. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा :-
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे ठिकाण महराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखले जाते. चिखलदरा हे सातपुडा पर्वत रंगांचा एक भाग आहे . येथे निसर्ग सौंदर्याने नटलेला खूप मोठा परिसर आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ३६०० फूट अंतरावर आहे. तू हि तिथे जातानाच रस्त्याने छान अश्या धुक्याचा नजारा बघत प्रवासाचा आनंद घेऊ शकता. तिथं गेल्यावर पाहिलं ठिकाण म्हणजे भिमकुंड . येथून तुम्ही डोंगरावरून खाली पडणाऱ्या धबधब्याचा सुंदर असा नजारा अनुभवू शकता. नंतर तिथे असलेले देवी मंदिराला भेट देऊन समोरच असलेला गविल गडाचा सुंदर view दिसतो. तिथे तुम्ही हॉर्स रायडिंग, स्ट्रीट फूड आणि लहान मूल खेळण्यासाठी सोय आहे. चिखलदऱ्यातील पांचाबोली हा पॉइंट खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. तिथून तुम्हाला सुंदर असा निसर्गरम्य परिसर पाहायला भेटेल. तिथली एक खासियत म्हणजे तिथे तुम्ही एकदा आवाज दिला की तोच आवाज ५ वेळा ऐकू येतो. चिखलदरा मधील शासकीय गार्डन ला भेट देऊन पाहू शकता. बकुळ , हुरिकेन , balancing point, गोराघाट पॉइंट हि स्थळ तुम्हाला अजून सुंदर असे view देतील. ठाकूर पॉइंट ला भेट देऊन तुम्ही अस्वल पाहु शकता. अस्वल पाहण्यासाठी या पॉइंट ला नक्की भेट दिली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पॉइंट ला भेट देऊन विविधतेचे दर्शन घेऊ शकता.
५. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा :-
कोल्हापुर जिल्ह्यातील गगनबावडा हे एक महाराष्ट्रातील हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत भेट देण्याचं छान अस ठिकाण आहे. कोल्हापूरपासून ५० किलोमिटर अंतरावर हे थंड हवेच ठिकाण आहे. येथे तुम्हाला भेट देण्यासाठी गगनगड किल्ला , गगनगिरी महाराजांचा मठ, रामचंद्र पंत यांचा ऐतिहासिक वाडा पांडव थांबलेलं एक सुंदर असं निसर्गरम्य ठिकाणाला भेट देऊन गगनबावडा ची ट्रीप तुम्ही आनंदी घालवू शकता. यामध्ये तुम्हाला हिरव्यागार निसर्गाचा , वळणदार घाटातील रस्ता आणि पक्षांचं मधुर असा आवाजाचा अप्रतिम आवाज अनुभवू शकता.
अशा प्रकारे वरील ५ महराष्ट्रातील प्रमुख सुंदर अशी ठिकाणे भेट देऊन तुमची हिवाळी सहलीच्या आठवणी बनवू शकता.