महाराष्ट्र CET महामंडळाने येणाऱ्या 2025 च्या वर्षातील परीक्षेची तारीख नुकतीच जाहीर केली आहे. त्यानुसार अभियांत्रिकी शाखेसाठी एप्रिल 19 ते 27 एप्रिल 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. तर विज्ञान शाखेसाठी MHT CET ची तारीख 9 ते 17 एप्रिल 2025 यादरम्यान परीक्षा असणार आहे. या बद्दलची सर्व माहिती mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नेमका MHT CET परीक्षा आहे तरी काय ?:
दर वर्षी बी. टेक/बीई, बी फार्मा, डी फार्मा च्या प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परिक्षा ज्याला MHT CET असे ओळखले जाते या परीक्षेमध्ये मिळाल्याल्या गुणांच्या आधारे पत्र उमेदवारांना त्या त्या शाखेमध्ये प्रवेश दिला जातो. या पेपर मधे कसल्याप्रकरची निगेटिव्ह मार्किंग पद्धत नसते. या परीक्षेची काठिण्य पातळी हि १२ बोर्ड पर्यंत चा अभ्यासक्रमावर आधारीत असते.या परीक्षेचे स्वरूप हे तीन विभागामध्ये विभागले असून त्यामध्ये रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र आणि गणित यात भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र यासाठी १०० गुण, गणितासाठी १०० गुण आणि रसायनशास्त्रासाठी १०० गुणानसाठी परीक्षा घेण्यात येईल.
MHT CET ने त्याबद्दलचा अभ्यासक्रम देखील प्रसिद्ध केला आहे. तात्पुरती परीक्षा अर्ज करण्याची तारीख हे जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सांगण्यात आली आहे लवकरच तारीख समोर येईलच. तर पाहून घेऊया या साठी कोण कोण अर्ज करू शकता.
पात्रता :
परिक्षा | MHT CET |
परिक्षा पातळी | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा राज्यस्तरीय पदवीपूर्व परीक्षा |
वर्षातून कितीदा असेल परीक्षा | वर्षातून एकदाच |
परीक्षेचा मोड | ऑनलाईन संगणक आधारित सीबीटी |
प्रवेश परीक्षेद्वारे दिले जाणारे प्रवेश | बी. टेक/बीई, बी फार्मा, डी फार्मा |
प्रश्ननपत्रिका स्वरूप | पेपर १ – यामध्ये गणित या विषयाचा समावेश असेल. पेपर २- यामध्ये भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांचा समावेश असेल. पेपर ३- मधे जिवशास्त्राचा समावेश असेल. |
परीक्षेसाठी दिलेला वेळ | या वरील ३ पेपर साठी प्रत्येकी ९० मिनिटांचा कालावधी असणार आहे. |
प्रत्येकी पेपर साठी गुण पद्धती | प्रत्येकी पेपर हा १०० गुणांसाठी असेल. |
गुणांचे विभाजन | भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तील प्रत्येकी एका बरोबर उत्तरासाठी एक गुण मिळणार आहे. तर गणित या विषयासाठी प्रत्येकी एका बरोबर उत्तरासाठी २ गुण मिळणार आहेत. यामध्ये कसलीही निगेटिव्ह मार्किंग पद्धत नाही. |
कोण कोणत्या भाषेमध्ये परीक्षा देऊ शकता | मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू |
संकेतस्थळ | https://cetcell.mahacet.org/ |
परीक्षा गुण स्वीकारणारी संस्था | सुमारे ४०० संस्था |
संपर्कासाठी | ईमेल आयडी: maharashtra.cetcell@gmail.com हेल्पलाईन: ०२२-२२६४ ११५० २२६४ ११५१ २२६२ ०६०१ |
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क | ८०० रुपये |
SC/ST/OBC/PWD/SBC आणि अपंग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क | ६०० रुपये |
या परीक्षेसाठी कोण कोण पत्र असेल:
MHT CET परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पात्रता नियम व अती व्यवस्थित बघण्याची गरज आहे. नाहीतर अर्ज करूनदेखील पडताळणीमधे काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज करताना सर्व माहिती बरोबर आहे का एकदा दोनदा नीट तपासून पाहा.
काय आहेत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी अटी
- अर्ज करणारा उमेदवार हा २०२५ पर्यंत उत्तीर्ण झालेला असला पाहिजे किंवा १२ मधे शिकत असला पाहिजे.
- उमेदवाराकडे रसायनशास्त्र/ जैवतंत्रज्ञान/ जीवशास्त्र/ तांत्रिक व्यावसायिक विषय/ संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान/माहितीशास्त्र पद्धती/कृषी/ अभियांत्रिकी ग्राफिक्स/व्यवसाय अभ्यास यापैकी कोणत्याही एका विषयासोबत भौतिकशास्त्र आणि गणित हे अनिवार्य विषय असावेत.
- खुल्या प्रवर्गातील आणि आर्थिदृष्टया दुर्बल घटकातील मुलांना बारावीमध्ये ४५% गुण मिळवणे बंधनकारक आहे तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 40% गुण मर्यादा असणार आहे.
तसंच महाराष्ट्ररा बाहेरील अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय अटी आणि शर्ती आहेत पाहूया
- महाराष्ट्ररा बाहेरील देखील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात परंतु त्यांना महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
तर अशाप्रकारे वरील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही एम एस टी सी इ टी च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुमचा उमेदवारी अर्ज दाखल करा. आणि अर्ज दाखल केल्यानंतर आलेल्या अनुक्रमांकच्या आधारे वारंवार लॉगिन करून पाहत रहा की काही तुमच्या अर्जामध्ये त्रुटी आणली आहे का. अर्जामध्ये काही तोटे आढळल्यास लगेच दुरुस्ती करून घ्या. आता अर्ज दाखल करून झाल्यानंतर पुढची पायरी सांगायचे झालं तर ते असते परीक्षा प्रवेश पत्र येण्याची म्हणजेच हॉल तिकीट ची. हॉल तिकीट ची तारीख की लवकरात लवकर कळवण्यात येईल. आणि ठरलेल्या वेळेप्रमाणे परीक्षा देखील घेण्यात येईल आणि परीक्षा घेऊन झाल्यानंतर कशा पद्धतीचा निकाल देखील लावण्यात येईल. या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ठरलेल्या मेरिट लिस्टच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.