---Advertisement---

रेल्वे विभागात 1785 जागांची मोठी भरती

By Chaufer24.com Team

Updated on:

Follow Us
रेल्वे विभागात 1785 जागांची मोठी भरती
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

भारतीय रेल्वे विभागामध्ये सध्या एक मोठी भरतीची अपडेट समोर आली आहे

स्पर्धा परीक्षा करू इच्छिणाऱ्या तरुणांना एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. प्रत्येकाला वाटत स्वतःला सरकारी नोकरी असावी. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे मधे 1785 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी कोण कोण पत्र असेल म्हणजेच वयोमर्यादा शिक्षण निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत ची सविस्तर माहिती हे रेल्वे बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या रेल्वे विभागातील रिक्त जागांसाठी रेल्वे विभागांमध्ये 1785 जागांसाठी ची जी काय भरती घेण्यात येणार आहे त्यासाठीचा संपूर्ण तपशील या पोस्टच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.

दक्षिण पूर्व रेल्वे विभागामध्ये ज्या ज्या उमेदवारांना नोकरी करण्यासाठीचा अर्ज करायचा आहे त्यासाठीचे असणारे वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता काय काय आहेत ते पाहूय.दक्षिण पूर्व रेल्वे ने शिकवू पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2024 आहे. या तारखीपूर्वी इच्छुक आणि पत्र उमेदवार अर्ज भरू शकतात. कशा प्रकारची पदभरती असणार आहे ते पाहू:

पदाचे नाव – अप्रेंटसिप या पदासाठी दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये नोकर भरती होणार आहे.

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवार या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

शैक्षणिक अर्हता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी).

अधिकृत वेबसाईटवर – https://rrcser.co.in/ या दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही रेल्वे विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला संपूर्णपणे माहिती मिळून जाईल.

अर्ज फी – UR/OBC १००/-

Ex. Servicemen/SC/ST च्या उमेदवारांसाठी कसल्याही प्रकारचे अर्ज फी घेण्यात येणार नाही. या कॅटेगिरी चे उमेदवार अगदी निशुल्कपणे रेल्वे मधील नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

वेतन श्रेणी – रेल्वे बोर्डाच्या ॲक्ट १९६१ नुसार ज्या काही केंद्र सरकारच्या नियम अटी आहेत त्यानुसार वेतनश्रेणी देण्यात येणार आहे.

रेल्वे भरतीसाठी असा करा अर्ज

तर ज्या ज्या उमेदवारांना रेल्वे भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या त्या उमेदवारांनी प्रथमतः या पोस्टमध्ये अधिकृत वेबसाईट च्या समोर दिलेल्या निळ्या रंगाच्या वेबसाईट वरती जाऊन भरती बाबतची अगदी डिटेल मध्ये माहिती बघायचे आहे. अर्जासाठी लागणारे कागदपत्रे, तसेच फोटो आणि स्वाक्षरी चा इमेज अपलोड करण्यासाठीचे लागणारे साईज यात सर्व बाबती त तुम्हाला संकेतस्थळावरती जाऊन एकदा व्यवस्थित रित्या पाहायच्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर काय तुम्ही जेवढा तुमचा अर्ज काळजीपूर्वक भराल तेवढाच तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी होतील.

रेल्वे विभागातील या भरतीसाठी तुम्ही अर्ज करताना तुमची शैक्षणिक पात्रता आहे त्या भरतीमध्ये असणाऱ्या विविध पदांच्या वरती वेगवेगळी शैक्षणिक पात्रता असणार आहे. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता ठरलेले असून ते तुम्हाला रेल्वे विभागाच्या वरी दिलेल्या निळ्या कलर मधील लिंक वरती गेल्यानंतर येणाऱ्या वेबसाईट वरती तुम्हाला समजून जाईल. तसेच रेल्वे भरतीसाठी अर्ज करताना तुम्ही कसल्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नका कारण की अर्ज पडताळणी करण्यामध्ये जर का ते निदर्शनास आल्यास तुमचा अर्ज बाद होऊन तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे रेल्वे भरतीसाठी अर्ज करताना तुम्ही तुमच्याकडे असलेल्या प्रमुख पुराव्यांच्या आधारेच माहिती भरा.

सर्वात प्रथम खाली दिलेल्या लिंक मधे जाऊन भरतीबद्दलची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.अर्ज करण्याची प्रक्रिया हे पूर्णपणे ऑनलाईन असून त्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२४ आहे. त 27 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी बारा वाजेच्या आत मध्ये पर्यंत तुम्हाला तुमचा रेल्वे भरतीसाठी चा उमेदवारी अर्ज दिलेल्या सर्व अटींमध्ये बसवून मागितलेल्या सर्व डॉक्युमेंट्स आणि फाइल्स अपलोड करून सबमिट करायचा आहे. उमेदवारी अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक चा मेसेज येईल.तो अर्ज क्रमांक तुम्हाला जपून ठेवायचा आहे. त्याच अर्ज अनुक्रमांकच्या आधारे तुम्हाला येणाऱ्या हॉल तिकीट आणि परीक्षेच्या तारखा संबंधात किंवा तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करण्यासाठी त्याच अर्ज अनुक्रमांकच्या आधारे तुम्ही या सर्व गोष्टी करू शकता.

http://www.rrcser.co.in/

वरती दिलेल्या वेबसाईट वर तुम्ही सर्व माहिती सविस्तरपणे पाहू शकता. तर अशाप्रकारे तुमच्याकडे असलेल्या सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्र आणि तुमच्या वयाच्या पुराव्याच्या कागदपत्रांच्या आधारे व्यवस्थितरित्या तुमचा रेल्वे नोकरी भरतीसाठी चा उमेदवारी अर्ज दाखल करा. तुमचा एकदा का अर्ज रेल्वे भरतीसाठी दाखल केल्यानंतर तुमच्या अर्ज पडताळणी केली जाईल आणि रेल्वे विभागाच्या ठरलेल्या क्रायटेरियानुसार तुमचा अर्ज सिलेक्ट किंवा बाद केला जाईल.

---Advertisement---

Leave a Comment