ST Megabharti 2025 Maharashtra
ST Megabharti 2025 Maharashtra ची तयारी करून घ्या! महाराष्ट्र एसटी महामंडळात लवकरच १७,४५० जागांसाठी मोठी भरती सुरू होत आहे . चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) या दोन्ही पदांसाठी RTO कडून मिळणारा ‘बॅच बिल्ला’ (Batch Badge) अनिवार्य आहे . बॅच बिल्ल्याशिवाय प्रवासी वाहने चालवणे हा कायदेशीर गुन्हा आहे . ही भरती प्रक्रिया ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अर्ज भरण्याच्या ऐनवेळी कागदपत्रांची धावपळ होऊ नये म्हणून, येथे बॅच बिल्ला मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे.
चालकासाठी (ST Megabharti 2025 Maharashtra Driver documents) लागणारी कागदपत्रे
चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय २० वर्षे असणे आवश्यक आहे .
- RTO चा अर्ज (ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध)
- वैध Heavy Motor Vehicle (HMV) ड्रायव्हिंग लायसन
- जन्मतारखेचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला-TC, किंवा १०वी सनद)
- पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, किंवा लाईट बिल यापैकी कोणताही एक)
- शिक्षणाचा पुरावा (किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक)
- वैद्यकीय प्रमाणपत्र (डॉक्टरांकडून दिलेले फिटनेस सर्टिफिकेट – फॉर्म 1A)
- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो
- RTO शुल्क भरल्याची पावती
वाहकासाठी (ST Megabharti 2025 Maharashtra Conductor documents) लागणारी कागदपत्रे
वाहक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे . वाहकासाठी आवश्यक कागदपत्रे चालकाप्रमाणेच आहेत, परंतु दोन अतिरिक्त आणि महत्त्वाचे प्रमाणपत्रे लागतात:
- RTO अर्ज आणि इतर सामान्य कागदपत्रे (उदा. जन्म-पत्त्याचा पुरावा, १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, फोटो).
- Solvency Certificate (SC): हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून घ्यावे लागते . वाहकाकडे पैशाचा व्यवहार असल्यामुळे एका जबाबदार व्यक्तीने हमी घेणे यासाठी हे आवश्यक आहे.
- LPS (Local Police Station) Character Certificate: स्थानिक पोलीस स्टेशनमधून चारित्र्य प्रमाणपत्र घ्यावे लागते . यासाठी अर्ज सादर केल्यास १ ते २ दिवसांत हे प्रमाणपत्र मिळू शकते .
हा बॅच बिल्ला साधारणतः ८ ते १० दिवसांत मिळू शकतो . जाहिरात येण्यापूर्वीच आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून वेळेवर होणारी धावपळ आणि एजंट्सकडून होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल
