National Biodiversity Authority Internship 2025
भारतातील पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (National Biodiversity Authority – NBA) यांनी National Biodiversity Authority Internship 2025 अंतर्गत एकूण 50 इंटर्नशिप पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
- ऑनलाईन परीक्षा : 8 ऑक्टोबर 2025
- इंटर्नशिप कालावधी : नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026
पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थी
- अथवा इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर, फॉरेस्ट्री, व्हेटरनरी, हॉटिकल्चर इ. विषयातील पदवीधर
- वय मर्यादा : 21 ते 30 वर्षे (30 सप्टेंबर 2004 नंतर व 2 ऑक्टोबर 1995 पूर्वी जन्म झालेले उमेदवार पात्र)
इंटर्नशिपचे ठिकाण
- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC)
- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण (NBA), चेन्नई
- राज्य जैवविविधता मंडळे
- केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषद
स्टायपेंड
इंटर्नना प्रतिमहिना ₹20,000 मानधन दिले जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया
जैवविविधता, पर्यावरणशास्त्र आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात अनुभव मिळवण्यासाठी National Biodiversity Authority Internship 2025 ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी निश्चित तारखेत ऑनलाईन अर्ज करावा.
