---Advertisement---

ठाणे महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी TMC Recruitment 2025 अंतर्गत 1773 पदांसाठी मेगा भरती!

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
TMC Recruitment 2025
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

TMC Recruitment 2025

ठाणे महानगरपालिका (TMC) मध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. महानगरपालिकेने गट ‘क’ आणि गट ‘ड’ संवर्गातील तब्बल

१७७३ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. विविध सेवांमध्ये पसरलेल्या या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

TMC Recruitment 2025 ही एक मोठी संधी आहे, ज्यामध्ये प्रशासकीय सेवा, तांत्रिक सेवा, अग्निशमन सेवा, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय सेवा अशा अनेक विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचे सोने करण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकर अर्ज करावा.

पदांचा तपशील (Vacancy Details for Thane Mahanagarpalika Bharti 2025)

ठाणे महानगरपालिकेने विविध विभागांमध्ये एकूण १७७३ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. काही प्रमुख पदे आणि त्यांच्या रिक्त जागा खालीलप्रमाणे आहेत:

पदनाम (Post Name)एकूण पदे
नर्स मिडवाईफ / परिचारीका / स्टाफ नर्स४५७
फायरमन३८१
चालक-यंत्रचालक२०७
प्रसाविका११७
कनिष्ठ अभियंता – २६३
लिपिक तथा टंकलेखक५३
दवाखाना आया४८
वॉर्डबॉय३७
औषध निर्माण अधिकारी३६
मल्टी पर्पज वर्कर३३
लिपिक लेखा३२
शस्त्रक्रिया सहायक२५
कनिष्ठ अभियंता – १ (नागरी)२४

या व्यतिरिक्त इतर अनेक पदांसाठी भरती होणार असून, सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

TMC Recruitment 2025 महत्वाच्या तारखा (Important Dates)

तपशीलकालावधी
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात१२ ऑगस्ट, २०२५ (दुपारी २:०० पासून)
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख०२ सप्टेंबर, २०२५ (रात्री २३:५९ पर्यंत)
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख०२ सप्टेंबर, २०२५ (रात्री २३:५९ पर्यंत)
परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्धपरीक्षेच्या ०७ दिवस अगोदर

TMC Recruitment 2025 अर्ज शुल्क (Application Fee)

  • अमागास प्रवर्ग (General Category): रु. १,०००/-
  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग (Reserved & Orphan Category): रु. ९००/-
  • माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ

टीप: अर्ज आणि परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाईल. शुल्क ना-परतावा (Non-Refundable) आहे.

अर्ज कसा करावा? (How to Apply for TMC 1773 posts)

  1. इच्छुक उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
  2. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.thanecity.gov.in ला भेट द्या.
  3. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  4. आवश्यक माहिती भरा आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
  5. विहित अर्ज शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरा.
  6. उमेदवाराला एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास, प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.

या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि आरक्षणाबद्दलच्या तरतुदी, ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावे.

NOTIFICATION PDF CLICK HERE

---Advertisement---

Leave a Comment