Ladki Bahin Yojana Maharashtra 2025
Ladki Bahin Yojana Maharashtra ही एक महत्वाची सामाजिक कल्याण योजना आहे जी महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरजू, अल्प उत्पन्न गटातील आणि ग्रामीण भागातील महिलांना दरमहा ₹1500 ची मदत सरकारकडून दिली जाते.
मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रम समारंभामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता हा रक्षाबंधनापर्यंत सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होईल असे अगदी स्पष्टपणे सांगितले यावेळी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना त्यांचा तेरावा हप्ता हा 9 ऑगस्टपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. काही महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे.
योजनेचे उद्दिष्ट (Objective of the Scheme)
- राज्यातील महिलांचे आर्थिक सबलीकरण
- शिक्षण, आरोग्य आणि रोजंदारी यासाठी आर्थिक आधार
- महिलांना आत्मनिर्भर बनवणे
योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम (Installment Details)
- मासिक सन्मान निधी: ₹1500
- 13वा हप्ता जुलै 2025 साठी: 9 ऑगस्ट 2025 पर्यंत खात्यात जमा होणार
- राखी गिफ्ट विशेष रक्कम: निवडक लाभार्थ्यांना ₹3000 – ₹4500 पर्यंत
👉काय म्हणाल्या आदिती तटकरी पहा.

Ladki Bahin Yojana Maharashtra 2025 पात्रता निकष (Eligibility Criteria)
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी
- वय: 21 ते 60 वर्षांदरम्यान
- वार्षिक उत्पन्न: ₹1.5 लाखांपेक्षा कमी
- लाभार्थीचं बँक खाते Aadhaar लिंक असणं आवश्यक
Ladki Bahin Yojana Maharashtra 2025 आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- राशन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- विवाह प्रमाणपत्र (विधवा असल्यास मृत्यू प्रमाणपत्र)
- मोबाइल नंबर
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)
- ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- “Apply Now” वर क्लिक करा
- सर्व माहिती भरा व कागदपत्रे अपलोड करा
- सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक नोंदवा
Ladki Bahin Yojana Maharashtra 2025 13वा हप्ता – तारीख व वेळ
- हप्ता रक्कम: ₹1500 ते ₹4500
- तारीख: 9 ऑगस्ट 2025पर्यंत
- वितरण माध्यम: DBT (Direct Bank Transfer)