MSRTC Bharti 2025
MSRTC Bharti 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील युवांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत एकूण 367 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती नाशिक विभागासाठी असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे.
MSRTC Bharti 2025 – भरतीचा आढावा
- भरती संस्था: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
- एकूण पदे: 367
- पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
- भरती ठिकाण: नाशिक विभाग
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन किंवा ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025
पदनिहाय तपशील
पदाचे नाव | रिक्त पदे | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
प्रशिक्षणार्थी (Apprentice) | 367 | ITI प्रमाणपत्र किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी (संबंधित विषयात) |
👨🎓दहावी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वे विभागात भरती. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ ऑगस्ट पासून सुरु
पात्रता निकष
- शैक्षणिक पात्रता:
- NCVT/SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र किंवा
- अभियांत्रिकी डिप्लोमा/पदवी (संबंधित विषयात किंवा व्यावसायिक प्रवाहात)
- वयोमर्यादा:
- किमान वय: 14 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे (आरक्षित प्रवर्गास वयोमर्यादेत सवलत लागू)
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे जोडावीत:
- शाळा सोडल्याचा दाखला (किमान आवश्यक वयाचे प्रमाणपत्र)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (ITI, डिप्लोमा, पदवी इ.)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- नोंदणी पावती व पूर्ण अर्ज फॉर्म प्रिंटआउट
भरतीबद्दल सखोल माहिती
- प्रशिक्षणादरम्यान मासिक स्टायपेंड (पगार) मिळणार.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही.
- नोकरी ठिकाण: नाशिक, महाराष्ट्र.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
अर्ज कसा करावा?
- ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येईल.
- अधिकृत सूचना व अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अंतिम तारीख: 11 ऑगस्ट 2025

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, दस्तऐवज पडताळणी आणि गुणवत्ता यावर आधारित होईल
ही भरती महाराष्ट्रातील युवकांना तांत्रिक प्रशिक्षण व प्रत्यक्ष अनुभव मिळवून देणारी उत्तम संधी आहे. इंजिनिअरिंग आणि ITI उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा आणि 11 ऑगस्टपूर्वी आपले करिअर घडविण्याची ही संधी गमावू नका!