---Advertisement---

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 – बँक ऑफ बडोदा मध्ये 2500 पदांसाठी भरती

By Chaufer24.com Team

Published on:

Follow Us
Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 – बँक ऑफ बडोदा मध्ये 2500 पदांसाठी भरती
---Advertisement---
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 ही भरती बँकिंग क्षेत्रातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा ने देशभरात 2500 पदांसाठी लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer) ची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2025 आहे.

जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी करण्याची संधी शोधत असाल, तर Bank of Baroda Local Bank Officer Vacancy 2025 ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर (LBO) पदासाठी 2500 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 – भरतीची संपूर्ण माहिती

  • संस्था: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)
  • पद: लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer)
  • विभाग: JMG/S-I (Junior Management Grade Scale-I)
  • एकूण पदे: 2500
  • अर्ज प्रकार: ऑनलाइन
  • शेवटची तारीख: 24 जुलै 2025
  • अर्जाची सुरुवात: 4 जुलै 2025
  • वेबसाइट: www.bankofbaroda.in

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduation in any discipline)
  • CA, Cost Accountant, इंजिनिअरिंग किंवा मेडिकल पदविका धारक देखील पात्र
  • किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (Scheduled Commercial Bank किंवा RRB मध्ये अधिकारी पदावर)

टीप: NBFC, सहकारी बँक, पेमेंट बँक, फायनान्स बँक किंवा फिनटेकमध्ये काम केलेला अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.

स्थानीय भाषा ज्ञान आवश्यक

उमेदवाराला अर्ज करत असलेल्या राज्याच्या स्थानिक भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन, बोलणे व समजणे) आवश्यक आहे. अन्यथा भाषिक कौशल्य चाचणी (Language Proficiency Test) पास करावी लागेल.म्हणजेच ज्या राज्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या राज्याची स्थानिक भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्या भाषेचे ज्ञान असल्याचे प्रमाणपत्र किंवा तुम्ही ती भाषा शिकलात शाळेमध्ये त्या शाळेचे गुणपत्रिका मध्ये तो विषय असला पाहिजे आणि तुम्ही त्यात उत्तीर्ण असले पाहिजे.

वयोमर्यादा (01 जुलै 2025 रोजी)

  • किमान: 21 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे

वय मर्यादेत सूट (Category-wise):

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे
  • PWD: General – 10 वर्षे, OBC – 13 वर्षे, SC/ST – 15 वर्षे
  • इतर सवलती सरकारी नियमांनुसार

फी संरचना

श्रेणीअर्ज शुल्क
General/EWS/OBC₹850/- (GST सह)
SC/ST/PWD/ESM/महिला₹175/- (GST सह)

पगार संरचना

  • Basic Pay: ₹48,480/-
  • वार्षिक वेतन वाढ आणि DA/TA, HRA, भत्ते यासह एकूण वेतन ₹85,920/- पर्यंत

उमेदवाराला पूर्वानुभव असल्यास एक अग्रिम वाढीव वेतन दिले जाईल (Seniority मान्य होणार नाही).

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 – निवड प्रक्रिया

ऑनलाइन परीक्षा (Online Test):

विभागप्रश्नगुणवेळ
इंग्रजी भाषा303030 मिनिटे
बँकिंग ज्ञान303030 मिनिटे
सामान्य/आर्थिक ज्ञान303030 मिनिटे
बुद्धिमत्ता व गणित303030 मिनिटे

किमान पात्रता गुण:

  • General/EWS: 40%
  • Reserved: 35%
  • चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण (0.25)

सायकॉलॉजिकल टेस्ट + ग्रुप डिस्कशन/मुलाखत

  • ऑनलाइन परीक्षेनंतर Psychometric Test घेतले जाईल.
  • नंतर GD आणि/किंवा Interview घेतले जातील.
  • GD/PI साठी पात्रता गुण: General – 60%, Reserved – 55%

Post Location

निवड झालेला उमेदवार कमीत कमी 12 वर्षे त्या राज्यातच नियुक्त केला जाईल, ज्या राज्यासाठी त्याने अर्ज केला असेल. यानंतर बँकेच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण भारतात पोस्टिंग दिले जाऊ शकते.

महत्त्वाचे दस्तऐवज (Interview वेळी लागणारे):

  • अर्जाची प्रिंट
  • कॉल लेटर
  • ओळखपत्र (PAN, Aadhaar, etc.)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रेअधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक कराशैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
  • PWD/ESM/NOC (जर लागू असेल तर)
  • Photo, Signature, Declaration

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 साठी अर्ज कसा करावा?

  1. बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या –https://www.bankofbaroda.in
  2. “Careers” विभागातील “Current Opportunities” निवडा
  3. ऑनलाइन अर्ज भरताना वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, फोटो आणि सही अपलोड करा
  4. अर्ज सबमिट करण्याआधी सर्व माहिती पडताळा
  5. ऑनलाइन अर्जाची प्रिंट घ्या आणि भविष्यासाठी जतन करा

महत्त्वाच्या तारखा

प्रकारतारीख
अर्ज सुरु होण्याची तारीख4 जुलै 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख24 जुलै 2025
परीक्षा तारीखलवकरच घोषित होईल

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 – फायदे

  • प्रतिष्ठित सरकारी बँकेत नोकरी
  • स्थिरता, उत्तम वेतन व प्रोफेशनल ग्रोथ
  • स्थानिक राज्यात पोस्टिंग
  • डिजिटल बँकिंग व विक्री क्षेत्रात अनुभव

Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025 ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. पात्रता असेल तर अर्ज करणं अजिबात चुकवू नका.

---Advertisement---

Leave a Comment