तुम्हाला तुमच शरीर निरोगी आणि दीर्घायुषी जगण्यासाठी इथे काही महत्त्वाच्या नैसर्गिक उपचार आहेत.
आजच्या आधुनिक काळात निरोगी शरीर ठेवणं म्हणजे एक खूप मोठी अडचण झाली आहे. जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत चाललं तसेच शरीरासाठी पौष्टिक अन्न मिळणं कठीण होत चालले आहे. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार हे अगदी रोजच झालाय.
यावर उपाय म्हणून काही टीपा फॉलो करा
- संतुलित आहार दैनंदिन जीवनात घ्या.
- आपल्या जेवणात वेग वेगळ्या फळे, भाज्या, शेंगा, शेंगदाणे, बिया आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश असलेले विविध पदार्थ खा. दररोज किमान 5सर्व्हिंग्ज (400 ग्रॅम) फळे आणि भाज्या खाण्याचे लक्ष्य ठेवा, विशेषतः ताजे, हंगामी. जर तुम्ही शाकाहारी नसाल, तुमच्या आहारात फॅटी माशांचा समावेश करा , कारण ओमेगा-३ फॅटी ऍसिडमुळे हृदयविकारांसारख्या रोगांपासून तुम्हाला सुटका मिळू शकते .
- मिठाचा वापर कमी करा. तुमचा दैनंदिन मीठ वापर 1 ग्रॅम (किंवा 1 चमचे) पेक्षा जास्त नसावा. जेवण तयार करताना कमी मीठ घाला, उच्च-सोडियमचे प्रमाण मर्यादित करासोया सॉससारखे मसाले तुम्ही तुमच्या पदार्थांमध्ये घालता आणि खारट स्नॅक्स टाळा. आपल्या आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करणेउच्च रक्तदाबाचा धोका कमी करते .
- रोजच्या वापरात तुमचे साखरेचे सेवन 50 ग्रॅम किंवा दिवसातून सुमारे 12 चमचे मर्यादित करा. स्नॅक्स, कँडीज आणि गोड पेये टाळून तुम्ही हे साध्य करू शकता, जसे की फळांचे रस आणि सोडा. साखरेचे सेवन कमी केल्याने मधुमेहासारखे आजार होण्याची शक्यता कमी होते, हृदयरोग, स्ट्रोक आणि काही कर्करोग .
- अनावश्यक चरबी कमी करा. तुमच्या एकूण उर्जेपैकी फक्त 30% फॅट्स असावेत. ऑलिव्ह ऑईल, मासे, नट, बिया आणि एवोकॅडो यासारख्या असंतृप्त चरबीला चिकटून रहा. संतृप्त चरबी टाळा, जसे की लाल मांस, लोणी आणि चीज, तसेच ट्रान्स फॅट्स, जसे की भाजलेले पदार्थ आणि प्रीपॅकेज केलेले, खाण्यासाठी तयार पदार्थ टाळा.
2 दररोज भरपूर पाणी प्या.
मानवी शरीर हे 80% पाण्यापासून बनलेले आहे. त्यामुळे दिवसातून 8 ग्लास पाणी प्या. यामुळे आतड्यांचे कार्य स्नायुंची कार्यक्षमता, रोग प्रतिकारक शक्ती आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. पुरेसे पाणी न पिल्यान त्वचा कोरडी पडते, शरीरात थकवा जाणवतो त्यामुळे कायम हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
3. नियमित दररोज व्यायाम करा.
व्यायाम हा एकमेव कसलाही खर्च न करता येणारा आणि शरीरासाठी अत्यंत आवश्यक असा घटक आहे.त्यामध्ये तुम्ही अगदी सोप्यात सोपा म्हणल तर रोजच फेरफटका जरी मारायला गेलात तरीदेखील व्यायाम आपोआप होऊन जाईल. यामुळे तुमचा व्यायाम तर होईलच त्याचबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनालाही प्रसन्नता भेटेल. रोजच्या व्यायामामुळे तुम्हाला सर्दृढ निरोगी शरीर भेटेल.
4.पुरेशी विश्रांती घ्या .
झोप आणि अरोगी शरीर या खूप समानार्थी गोष्टी आहेत. तुम्ही जेवढी कमी झोप घ्याल तेवढाच तुम्ही आजारी पडण्याची शक्यता वाढत जाते.दररोज फक्त रात्री 7 ते 9 तास झोप घ्या. यामुळे तुम्हाला खूप फ्रेश वाटेल त्यामुळे तुमची दिवसाची कामे ताकतीने होतील. यामुळं तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले होईल.
5. दारूचे प्रमाण कमी करा.
अती अल्कोहोल सेवन केल्याने यकृताचे आजार आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्ही यापासून जेवढं लांब राहाल तेवढाच तुमचं शारीरिक आयुष्य मजबूत राहील.
6.धूम्रपान करू नका
जगभरात धूम्रपानामुळे दरवर्षी लाखो लोक आपल जीवन गमावतात. त्याच प्रमुख कारण म्हणजे फुफफुसाचा कर्करोग. जो धूम्रपान करतो त्याला तर कर्करोग होण्याची शक्यता असते पण त्याच्या धुरामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील फूफूसाचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे धूम्रपान हे शक्यतो टाळावे आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात जाऊ नये त्यापासून लांबच राहावे.
7.ज्या त्या ऋतूमध्ये शरीराची आवश्यक ती काळजी घ्या.
आपल्याकडे 3 ऋतू असतात त्यामध्ये पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा. यापैकी ही हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूमध्ये शरीराची जास्त काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यामध्ये थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, सर्दी ताप खोकला येणे मग यावर लवकर उपाय नाही केला तर मग त्याच रूपांतर टायफॉइड सारख्या आजारामध्ये होऊ शकतो. यासाठी हिवाळ्यामध्ये उबदार अन्न खा जसे की बाजरीची, ज्वारीची भाकरी, तील इत्यादी. बाहेर फिरताना शरीराला उबदार कपड्याने सुरक्षित ठेवा.तसेच उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिणे हा एकमेव रामबाण उपाय. त्याचबरोबर थंड पाण्याने आंघोळ करणे, शरीरासाठी नैसर्गिक शित प्येय पिणे. उन्हामध्ये फिरताना सूती कपडे परिधान करून फिरणे त्यामुळे उष्णता कमी जाणवते. अशा प्रकारे वेगवेगळ्या ऋतूमध्ये आपल्या शरीराची काळजी घ्या.
8. दैनंदिन जीवनात स्वच्छता पाळा.
निरोगी शरीरासाठी स्वच्छता पाळणे हा एक खूप मोठा पर्याय आहे असा म्हणता येईल. कारण खूप सारे आजार असतात जे फकत अस्वच्छतेमुळे होतात.बाहेरून घरी परतल्यावर हात सॅनिटायझर ने धुवावे. स्वयंपाक करताना स्वच्छता बाळगावी.
9. मानसिक ताण नियंत्रणात ठेवा.
अती तणाव हे हृदयविकाराचे सर्वात प्रमुख कारण आहे. जास्त तणाव घेतल्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. यामुळे देखील अनेक आजार उद्भभवण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून सतत उत्साही आणि सकारात्मक विचार करणे. तणाव देणाऱ्या गोष्टी आणि व्यक्ती दोंहीपासून दूर राहणे.
10. एकाकीपणा सोळा
आजकाल मोबाईल मुले किंवा कामाच्या तणावामुळे आपण एकटे पडत चाललोय हर देखील मानसिक आरोग्य बिघडवण्याचे कारण आहे. अगोदर गावामध्ये लोक दिवसभर काम करून आल्यानंतर निवांत बाहेर बसून किंवा कुटुंबासोबत मनसोक्त गप्पा मारायचे. त्यामुळे मनात जो काही ताण असतो तो विसरला जातो आणि समाजात संबंध पण वाढतात.
तर अशा प्रकारे वरील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जर आयुष्यात काटेकोर पणे पालन केलं तर आपण एक उत्तम आयुष्य नक्कीच जगाल.
1 thought on “10 WELLNESS HEALTHY TIPS”