1 July 2025 New Rules
1 July 2025 New Rules लागू होणार – काय बदलणार?
1 जुलै 2025 पासून देशभरात अनेक आर्थिक व सेवाविषयक नियमांत बदल होत आहेत. हे बदल सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम करणार आहेत. खाली प्रत्येक बदलाची माहिती दिली आहे.
एलपीजी सिलेंडरचे नवीन दर
- 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे दर नव्याने जाहीर होणार.
- दर महिन्याच्या पहिल्या दिवशी इंडियन ऑईल, एचपी, बीपीसीएल या कंपन्या दर जाहीर करतात.
- दरामध्ये वाढ किंवा कपात होऊ शकते – यामुळे गृहिणींवर थेट परिणाम.
1 July 2025 New Rules ATM शुल्क वाढणार
- ICICI बँकेच्या ग्राहकांनी इतर बँकांच्या ATM मधून महिन्यातून 3 पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
- अतिरिक्त व्यवहारांवर शुल्क – ₹23
- नॉन-फायनान्शियल ट्रांजॅक्शन – ₹8.50
रेल्वे तिकीट बुकिंगसाठी OTP सक्ती
- आता IRCTC वरून रेल्वे तिकिट बुकिंग करताना मोबाइल OTP सक्तीने टाकावा लागेल.
- OTP टाकल्याशिवाय बुकिंग पूर्ण होणार नाही.
- पहिल्या 30 मिनिटांत ‘तत्काळ’ तिकीट बुकिंग शक्य नाही.
Learn and Earn Scheme 2025 अंतर्गत 100 जागांसाठी भरती
क्रेडिट कार्ड बिल पेमेंटचे नवीन नियम
- RBI च्या सूचनेनुसार नवीन पेमेंट नियम लागू झाले.
- आता सर्व क्रेडिट कार्ड बिल भरावे लागेल BBPS (Bharat Bill Payment System) द्वारेच.
- फोनपे, गुगल पे, क्रेड अॅपसारख्या अॅप्सवरूनही पेमेंट BBPS द्वारे होईल.
- HDFC बँकेने क्रेडिट कार्ड पेमेंटवरच्या काही शुल्कांमध्ये बदल केला आहे.
पॅन-आधार लिंक सक्ती
- नवीन पॅन कार्डसाठी आता आधार लिंक करणे अनिवार्य आहे.
- आधीपासून असलेल्या पॅन आणि आधार दोन्ही लिंक असणे गरजेचे.
- डेडलाइन – 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे करणे बंधनकारक आहे.
रेल्वे भाड्यांत बदल
- नॉन-एसी प्रवासी (जनरल/पॅसेंजर): ₹1 प्रति किमी
- एसी प्रवासी: ₹2 प्रति किमी
- 500 किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
- मासिक/त्रैमासिक पासधारकांना हा दर लागू नाही

अतिरिक्त माहिती (Extra Updates):
बँकिंग बद्दल:
- SBI, Axis, HDFC, BoB सारख्या बँकांनी देखील सेवा शुल्क आणि मिनिमम बॅलन्सच्या अटींमध्ये बदल केले आहेत.
- ATM वापर मर्यादा आणि NEFT/IMPS व्यवहारांवरील शुल्क वाढवण्यात आले.
UPI व्यवहार:
- UPI पेमेंट व्यवहारामध्ये सध्या कोणताही बदल नाही, पण लवकरच UPI Credit Line सर्वांसाठी सुरु होणार आहे.
1 July 2025 New Rules हे तुमच्या आर्थिक आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट प्रभाव टाकणारे आहेत. त्यामुळे वरील सर्व गोष्टीची माहिती लक्षात घ्या आणि वेळेत पावले उचला. विशेषतः पॅन-आधार लिंकिंग, क्रेडिट कार्ड पेमेंट, रेल्वे बुकिंग OTP, आणि ATM व्यवहारांचे नवीन नियम हे नियम आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे आहेत.